अन्नाची महत्त्वाची कार्ये
शक्ती/ उर्जेचा पुरवठा
शारीरिक वाढ आणि विकास
उपरोक्त कार्याचा विचार करून अन्नाचे तीन प्रकारच्या गटवारीत वर्गीकरण केले जाते.
अ) उर्जा पुरविणारे अन्न : या अन्न पदार्थात कार्बोदके आणि स्निग्ध द्रव्यांचे प्रमाण बरेच जास्त असते. ब) शरीराची वाढ करणारे अन्न : या प्रकारच्या अन्नपदार्थात प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. उदा. दुध, अंडी, मास, मासे, दली, तेलबिया इ. क) संरक्षक अन्न : अशा अन्न पदार्थात जीवनसत्त्व, क्षार आणि प्रथिनांचे प्रमाण भरपूर असते. उदा. दूध, हिरवी पालेभाजी, हे अन्न पदार्थ आपल्या शरीराचे जंतुसंसर्ग आजार आणि आरोग्यापासून संरक्षण करतात. म्हणून अशा अन्नपदार्थांना संरक्षक अन्न म्हणतात. या ठिकाणी एक मुद्दा निदर्शनास आणणे जरुरीचे आहे की, भारतीयांच्या आहारात अन्न पदार्थांचा समावेश बराच कमी झालेला असतो.
अन्नाचे घटक
प्रथिने स्निग्ध पदार्थ आणि कर्बोदके यांना उर्जा निर्मिणारे अन्न असे संबोधतात.
मानवी शरीरातील घटक पदार्थ :
पाणी : ६३%
प्रथिने : १७%
मेद : १२%
क्षार : ७%
कर्बोदके : १%
शरीराला प्रथिनांची गरज
वाढ व विकासासाठी
* शरीरातील उतीच्या डागडुजी व संवर्धनासाठी आपल्या शरीरातील प्रथिनांचे सतत विघटन होत असते त्याची जागा भरून काढण्यासाठी आहारातून त्याचा सतत पुरवठा झाला पाहिजे.
आनटीबॉडीज, अंतस्राव आणि विकाराच्या निर्मितीसाठी आनटीबॉडीज, अंतस्राव व विकाराच्या रचनेत प्रथिनाचा समावेश असतो. म्हणून शरीराला त्यांची निर्मिती करण्यासाठी प्रथिनांची गरज असते.
सोयाबीन डाळीत ४०% प्रथिने असतात.
टिप : गरोदर महिलांना दिवसाला १४ ग्राम प्रथिने स्तनदामातांना २५ ग्राम प्रथिने यांची आवश्यकता असते.
० ते ३ महिने - २.३ ग्राम दुधाच्या स्वरुपात
- ३ ते ६ महिने - १.८० ग्राम दुधाच्या स्वरुपात
- ६ ते ९ महिने - १.८० दुध वनस्पतीजन्य पदार्थ
- १ ते ३ वर्षे - १.८३ ग्राम
- ४ ते ६ वर्षे - १.५६ ग्राम
प्रथिनाच्या कमतरतेचे दुष्परिणाम
गरोदरपणात : मृत अर्भकाचा जन्म, रक्तक्षय आणि वजनाचे मूल
* बालक आणि मुले : सुख रोग, झुरणी रोग, खुंटलेली शारीरिक व मानसिक वाढ तसेच विकास अनेक मत आपले मुल आजारी पडले असतांना किंवा त्याला जुलाब होत असतांना सकस आहार देण्याचे थांबवतात, परिणामी मुलाचा अशक्तपणा अधिकाधिक वाढून ते मृत्युमुखी पडण्याचा सुद्धा धोका असतो. आजारी मुलांना पोषक आहाराची जास्त गरज असते. तो देण्यासाठी सतत प्रयत्न करायला हवे. कुपोषणाची सुरुवातीची लक्षणे कित्येक वेळा दुसरा एखादा रोग झालेला असतांना आपल्या नजरेस येतात. उदा. बरेच दिवस जुलाब होत असणाऱ्या मुलाच्या हातापायाला सुज येते. चेहरा सुजतो, पायावरील चामडी काळी पडून काळे निळे डाग पडू लागतात तेव्हा या सर्व गोष्टी कुपोषणामुळे होत असतात असे समजून त्याला सकस आहार देण्याची अतिशय गरज असते.
अधिक प्रथिने देणारी अन्ने
शरीराची बांधणी व वाढ यासाठी आवश्यक आहे. आपली हाडे, स्नायु, मेंदू आणि इतर अनेक अवयव सुदृढ होण्यासाठी त्याचा उपयोग होतो. वर दिलेल्या प्रमुख अन्नामध्ये असलेली प्रथिने आपल्या शरीराच्यागरजेच्या फक्त ५०% प्रमाणातच आपल्याला पुरवू शकतात म्हणून या अधिक प्रथिनयुक्त गटातील एक एक पदार्थ ताटी आपल्या अन्नात असणे आवश्यक आहे. प्रथिन असणारे पदार्थ : एकदल व द्विदल धान्य तेलबिया, हिरव्या पालेभाज्या. प्राणिज प्रथिने : दुध, दही, चीज, अंडी, मतान, मांस इ. सोयाबीन व शेंगदाणे जर खाल्ले तर शरीराला पुरेसे प्रथिने मिळतील. अधिक शक्ती देणारे खाद्यपदार्थ तेल तूपासारखे स्निग्ध पदार्थ आणि साखर म्हणजे छोटया आकारात साठविलेल्या जास्त शक्तीचे रुपांतर साखरेमध्ये करायला आपले शरीर समर्थ असते. म्हणून प्रत्येक जेवणात थोडातरी तेल तूपाचा समावेश करावा.
भरपूर जीवनसत्त्वे व खनिजे असणारे खाद्यपदार्थ
जीवनसत्त्व हे आपल्या शरीराचे राखणदार होत. आपल्या शरीराने काम नीट करावे यासाठी त्यांचा उपयोग होतो. त्याचा अभाव निर्माण झाल्यास अनेक आजार उदभवू शकतात. रक्त, हाडे व दात या गोष्टी चांगल्या होण्यासाठी खनिजांची गरज असते. तसेच जीवनसत्त्व असलेल्या खाद्यपदार्थांचीही गरज असते. उदा. पालक, शेवग्याची पणे, मेथी इ.
पिवळसर रंग असलेल्या चीच, लिंबू आणि संत्री यासारखी रसदार फळे मतान, अंडी, कोंबडी, मासे व दुध यासारखे प्राणिज पदार्थ.
स्त्रोत : पोषण आणि आहार : माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट