सध्या बाजारपेठेत पूर्णपणे दुधापासून बनवलेले दही, प्रोबायोटिक दही आणि सिनबायोटिक दही असे प्रकार दिसून येतात. याचबरोबरीने मध व साखर मिसळून बनवलेले दही (गोड दही), विशिष्ट प्रकारचे विरजन वापरून तयार केलेले दही (आंबट दही), मिस्ती दहीदेखील बाजारपेठेत उपलब्ध झालेले आहे.
अ.न. ---- घटक ---- प्रमाण (टक्के)
१. ---- पाणी ---- ८५ ते ८८
२. ---- स्निग्धांश ---- ५ ते ७.५
३. ---- प्रथिने ---- ३.२ ते ३.४
४. ---- शर्करा ---- ४.६ ते ४.२
५. आम्ल ---- ०.५ ते ०.९
अ.न. ---- घटक ---- प्रमाण (टक्के)
१. ---- पोटॅशियम ---- १८.१
२. ---- कॅल्शिअम १४.४
३. ---- फॉस्फरस ---- २१.८
४. ---- मॅग्नेशियम ---- २.६
५. ---- क्लोरिन ---- ९.७
६. ---- लोह ---- ०.६
७. ---- सल्फर ---- १.३
८. ---- सोडिअम ---- ८.५
गायीचे किंवा म्हशीचे दोन लिटर दूध पातेल्यात पांढऱ्या कपड्याने गाळून घ्यावे. हे दूध ८० अंश सेल्सिअसला १५ मिनिटे गरम करावे. दूध तापवते वेळेस सतत एका चमच्याने हलवत राहावे, त्यामुळे दुधातील साय वर येणार नाही. त्यानंतर दूध ३२ ते ३५ अंश सेल्सिअसपर्यंत कोमट करावे. त्यानंतर दोन लिटर दुधासाठी ४० ग्रॅम चांगल्या दर्जाचे विरजण वापरावे. विरजण मिसळते वेळेस पहिल्यांदा एका ग्लासमध्ये १०० मि.लि. दूध घ्यावे. त्यात ४० ग्रॅम विरजन चांगले मिसळावे. त्यानंतर राहिलेल्या दुधात मिसळावे. विरजण सर्व दुधात एकजीव करावे. त्यानंतर ३० ते ३५ अंश सेल्सिअस तापमानाला १० ते १२ तास उबदार जागेत ठेवावे. अशा प्रकारे दही तयार होते. हे दही रेफ्रिजरेटर मध्ये ठेवावे.
१. रोग प्रतिकार क्षमता वाढते. लहान मुलांच्या शरीराची वाढ चांगली होते.
२. शरीराचे वजन कमी करते. कारण कोलेस्टेरॉल डायजेशन करते.
३. शेळीच्या दुधापासून तयार केलेले दही हे कावीळ व ॲनेमिया रोगावर उपयोगी आहे.
४. क्रीम विरहित दुधापासून बनवलेले दही हे हृदयरोग्यास उपयोगी आहे.
५. रक्तदाब कमी करते. क्षार शोषण्यास मदत करते.
संपर्क - डॉ. संदीप रामोड - ९८६०९११९३८
(लेखक गो संशोधन व विकास प्रकल्प,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत आहेत)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 6/5/2020
मानवी आरोग्य चांगले राहण्यासाठी आतड्याची प्रणाली च...