অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

किडणीची रचना आणि कार्य

प्रस्तावना

किडनी हा मानवी शरीरातील एक महत्वपूर्ण अवयव आहे. याची तुलना सुपर कॉम्पुटरशी करणे उचित ठरेल, कारण किडनीची रचना खूप अनोखी आहे आणि तिचे कार्य अतिशय गुंतागुंतीचे आहे. किडनी शरीरातील रक्त साफ करून मुत्राची निर्मिती करते. शरीरातून मुत्र बाहेर टाकण्याचे कार्य मुत्रवाहिनी (Ureter) मूत्राशय (Urinary Bladder) आणि मुत्रनलिका (Urethra) यांच्याद्वारे केली जाते.

किडणीची स्थान आणि रचना

  • स्त्री आणि पुरुष दोघांच्याही शरीरात साधारणत : दोन किडण्या असतात.
  • किडणी पोटात्यचा आत, मागील बाजूला कमरेच्या हाडाच्या दोन्ही बाजूंना (पाठीच्या भागात ) छातीच्या फासल्यांच्या मागे सुरक्षित स्थितीत असते.
  • किडणीचा आकार काजुसारखा असतो. मोठ्या व्यंक्तीमध्ये किडणीचा आकार सर्बसाधारण १० सेमी लांब , ५ सेमी रुंद,आणि ४ सेमी जाडीचा असतो.किडणीचे बजन १५० ते १७० ग्रॅम दरम्यान असते.
  • किडणीत निर्माण झालेले मुत्र मुत्राशयापर्यंत पोहोचवणाऱ्या नलिकेला मुत्रावाहिनी म्हणतात. हि नलिका साधारण २५ सेंटीमीटर लांबीची असते आणि विशिष्ठ प्रकारच्या लवचिक मासपेशींची बनलेली असते.
  • मूत्राशय म्हणजे पोटाच्या खालच्या बाजूला समोरच्या दिशेला असलेली स्नायूंची एक पिशवी असते ज्यात मुत्र जमा होते.
  • जेंव्हा मूत्राशयात ३०० ते ४०० मिलीलीटर मुत्र जमा होते, तेंव्हा व्यक्तीला मुत्रविसर्जनाची भावना होते.
  • मुत्रनलीकेद्वारे मूत्र शरीराबाहेर टाकले जाते.

शरीरात किडणीची गरज आणि महत्व काय आहे?

  • प्रत्येक व्यक्ती घेत असलेल्या आहारच्या प्रकारात आणि त्याच्या प्रमाणात दर दिवशी बदल होत असतो .
  • आहारातल्या विविधतेमुळे शरीरात पाण्याचे प्रमाण, आम्ल तसेच क्षार पदार्थाच्या प्रमाणात सातत्याने बदल होत असतात.
  • आहाराचे पचन होत असतांना अनेक अनावश्यक पदार्थ शरीरात तयार होतात.
  • शरीरात पाणी,आम्ल,क्षार, आणि रसायने आणि शरीरातून उत्सर्जित होणा-या इतर पदार्थाचे संतुलन बिघडलेले किंवा त्यात बाधा आली तर ते जीवघेणेही ठरू शकते.
  • किडणी शरीरातील अनावश्यक द्रव्य आणि इतर पदार्थांना मुत्राच्या रुपात बाजूला करून रक्ताचे शुद्धीकरण करते .तसेच शरीरात क्षार आणि आम्लाचे संतुलन ठेवते ,रक्तातले त्यांचे योग्य प्रमाणही कायम राखते. अशा रीतीने किडणी शरीराला स्वच्छ् आणि निरोगी ठेवते.

किडनीचे मुख्य कार्य

  1. रक्ताचे शुद्धीकरण - किडणी कायम कार्यरत राहून शरीरात निर्माण होणाऱ्या अनावश्यक विषारी पदार्थांना मूत्राशयाद्वारे बाहेर टाकते.
  2. शरीरातील पाण्याचे संतुलन : किडनी शरीरासाठी आवश्यक त्या पाण्याची मात्र कायम ठेवते. अधिक जमा झालेले पाणी मूत्राद्वारे बाहेर काढून टाकते
  3. आम्ल आणि क्षारांचे संतुलन : किडणी शरीरात सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फ रस, बायकार्बोनेट वगैरेचे प्रमाण यथायोग्य ठेवण्याचे कार्य करते. हे सर्व पदार्थ शरीरात आम्ल तसेच क्षारांच्या प्रमाणासाठी जबाबदार असतात. सोडियमचे प्रमाण वाढले किंवा कमी झाले तर हृद्य आणि स्नायूंच्या हालचालीवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
  4. रक्तदाबावर नियंत्रण : किडणी अनेक हार्मोन्स (संप्रेरक) निर्मित करते जसे एंजियोटेन्सीन, एल्डोस्टोरेन, प्रोस्टागेल्डीन, वगैरे.  या हार्मोन्सच्या मदतीने किडणी शरीरात रक्तदाब योग्य राखण्याचे कार्य करते
  5. रक्तकणांच्या निर्मितीत सहाय्य : रक्तात असलेल्या लाल रक्तकणांचे उत्पादन एरीथ्रोपेएटीनच्या मदतीने अस्थिमज्जा (Bone Marrow )मध्ये होते.  एरीथ्रोपेएटीन किडणीमध्येच तयार होते.  किडणीची कार्यक्षमता कमी होण्याने व किडणी निकामी होण्याने  ह्या पदार्थांची निर्मिती कमी होते व पूर्णपणे बंदही होते.  यामुळे लाल रक्ताची निर्मिती कमी होते आणि अॅनिमिया  (रक्ताची कमतरता ) हा रोग होतो.
  6. मजबूत हाडे : किडणी शरीरात सक्रीय असलेले 'ड' जीवनसत्व निर्माण करण्यास मदत करते.  हे जीवनसत्व शरीरात कॅलशिअम  आणि फॉस्फरसचे योग्य प्रमाण राखण्यात तसेच हाडे आणि दातांच्या वाढीसाठी आणि मजबुतीसाठी महत्वपूर्ण कार्य करते.
  7. किडणीच्या रक्ताच्या शुद्धीकरणनंतर लाघवी कशी तयार होते? किडणी शरीराला आवश्यक ते पदार्थ शरीरात ठेवून अनावश्यक पदार्थ मूत्राद्वारे शरिरातून बाहेर टाकते.  हि एक आगळीवेगळी, अद्भुत आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे.

सुरक्षा किडणीची

  • आपल्याला माहित आहे का?  शरीरातल्या दोन्ही किडन्यामध्ये प्रत्येक मिनिटाला १२०० मिलीलिटर रक्त शुद्ध होण्यासाठी येते. हे रक्त हृद्याद्वारे शरीरात पोहोचणार्या संपूर्ण रक्ताच्या २० टक्क्याएवढे असते.  या प्रकारे २४ तासात साधारण १७०० लिटर रक्ताचे शुद्धीकरण केले जाते.
  • रक्त शुद्ध करून मुत्र तयार करणाऱ्या किडणीच्या सर्वात छोट्या आणि बारीक भागाला 'नेफ्रोन' म्हणतात जी झडपेसारखी असते.
  • प्रत्येक किडणीत १० लाख नेफ्रोन असतात. प्रत्येक नेफ्रोनचे दोन भाग असतात. पहिला ग्लोमेरुल्स आणि दुसरा ट्युबुल्स.
  • आपल्याला हे समजल्यावर आश्चर्य वाटेल कि, ग्लोमेरुल्स नावाने ओळखली जाणारी झडप प्रत्येक मिनिटाला १२५ मिलीलीटर प्रवाही करून पहिल्या टप्प्यात २४ तासात १८० लीटर मुत्र तयार करते.
  • या १८० लिटर मूत्रात अनावश्यक पदार्थ, क्षार आणि विषारी पदार्थहि असतात. त्याचबरोबर शरीराला अनावश्यक ग्लुकोज आणि अन्य पदार्थही असतात.
  • ग्लोमेरुल्स मध्ये तयार झालेले मुत्र नंतर ट्युब्युल्समध्ये जाते. तेथे त्यापैकी ९९% द्रवपदार्थ पुन्हा शोषले जातात.

ट्युबुल्समध्ये होणाऱ्या शोषणाला बुद्धिपूर्वक शोषण का म्हटले जाते ?

  • शोषणाला बुद्धिपूर्वक म्हटले जाते कारण, १८० लिटर  एवढ्या मोठ्या प्रमाणात तयार होणाऱ्या मुत्रातले आवश्यक पदार्थ आणि पाणी पुन्हा शरीरात शोषले जाते.  केवळ १ किंवा २ लिटर मूत्रातून पूर्ण कचरा आणि अनावश्यक क्षार बाहेर फेकले जातात.
  • अशा प्रकारे किडणीत अतिशय गुंतागुंतीच्या प्रक्रियेद्वारे झालेल्या सफाईनंतर निर्माण झालेले मुत्र मुत्रवाहिनीद्वारे मूत्राशयात जाते आणि मूत्रनलीकेद्वारे शरिरातून बाहेर पडते.

निरोगी किडणी असणार्या व्यक्तीमध्ये मुत्राचे प्रमाण कमी किंवा जास्त असू शकते का ?

  • होय मुत्राचे प्रमाण, प्यायलेल्या पाण्याचे प्रमाण आणि वातावरणातील तापमानावर अवलंबून असते.
  • जर कोणी व्यक्ती पाणी कमी पीत असेल तर फक्त अर्धा लिटर इतके पण घट्ट मुत्र तयार होते.  जास्त पाणी प्याले तर जास्त आणि पातळ मुत्र तयार होते.  उन्हाळ्यात जास्त घाम आल्यामुळे लघवीचे प्रमाण कमी होते आणि थंडीत घाम येत नसल्यामुळे लघवीचे प्रमाण वाढते.
  • सर्वसाधारण प्रमाणात पाणी पिणाऱ्या व्यक्तीला अर्ध्या लिटरहून कमी किंवा ३ लिटरहून अधिक लघवी होत असेल, तर हि किडणीच्या रोगाची सुरवात झाल्याची लक्षणे आहेत.

 

स्त्रोत : Kidney Education Foundation

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate