सर्वसाधारणपणे प्रौढ व्यक्तींचा रक्तदाब १३०/८० असतो. जेव्हा रक्दाब १४०/९० पेक्षा जास्त होतो, तेव्हा त्याला उच्च रक्तदाब किंवा हाय ब्लडप्रेशर म्हणतात.
उच्च रक्दाब असलेल्या रोग्यांपैकी केवळ १०% रोग्यांमध्ये रक्तदाबातील वाढीला कुठलातरी रोग कारणीभूत असतो. त्याबाबतची माहिती पुढीलप्रमाणे आहे. या कारणांपैकी ९०% रोग्यात आढळणारे महत्वपूर्ण कारण किडनीचे रोग असतात.
१) किडनीचे रोग
२) किडणीत रक्त पोहोचवणारी मुख्य नलिका आक्रसली असेल (रेनल आर्टरी स्टेनोसिस)
३) किडणीमधील अँड्रीनल नावाच्या ग्रंथित गाठ होणे (Pheochromocytoma)
४) शरीराच्या खालच्या हिश्यात रक्तपुरवठा करणारी महाधामानी आक्रसणे(Coractation of Aorta)
५) स्टीरॉइड्स सारख्या अनेक औषधांचे दुष्परिणाम
छोट्या मुलांतील उच्च रक्तदाबाला किडणीतील सूज , (अँक्युट ग्लोमेरूलोनेफ्रायटीस ) क्रॉनिक ग्लोमेरूलोनेफ्रायटीस आणि जन्मतःच खराब मुत्रमार्ग असणे (Vesico Ureteric Reflux) हि कारणे जबाबदार असतात.
प्रौढ वयात उच्च रक्तदाब होण्याला मधुमेहामुळे किडनीचे होणारे नुकसान ( डायबीटीक नेफ्रोपँथी) क्रॉनिक ग्लोमेरूलोनेफ्रायटीस, पॉलीसिस्टिक किडणीडिसीज ,किडणीत रक्तपुरवठा करणारी धमनी आक्रसणे , हि कारणे मुख्यतः जबाबदार असतात.
किडनीच्या कारणांमुळे रक्तदाब उच्च होण्याची शक्यता पुढील लक्षणांत अधिक असते.
१) तीस वर्षापेक्षा कमी वयात उच्च रक्तदाब असणे
२) रक्तदाब खूप उच्च असणे व औषधे घेऊनही तो नियंत्रणात न येणे
३) रक्तदाबामुळे डोळ्याच्या पडद्यावर परिणाम होणे व कमी दिसणे
४) उच्च रक्तदाबाबरोबरच सकाळच्या वेळी चेहऱ्यावर सूज, अशक्त पणा , जेवणावरची वासना उडणे असे त्रास किडनी रोग असल्याचे संकेत देतात.
सर्वसाधारणपणे लघवीची तपासणी , रक्तातील क्रीअँटीनिनची तपासणी, पोटाचा एक्सरे आणि किडनीची सोनोग्राफीद्वारे तपासणी केल्याने बहुतेक किडनी रोगांबाबत प्राथमिक निदान होऊ शकते. ह्या तपासण्यानंतर इंट्राव्हीनस पायलोग्राफी ,कलर डॉपलर स्टडी आणि रेनल आँजीओग्राफी आदि तपासन्यानमधील आवश्यक असतील त्या तपासण्या केल्या जातात. अशा तऱ्हेने कुठल्या कारणांमुळे उच्च रक्तदाब आहे हे निश्चित केले जातात. आणि त्यानुसार उपचार ठरवले जातात.
किडनीच्या रोगांमुळेच रक्तदाब उच्च आहे ह्याचे त्वरित निदान होणे अत्यंत गरजेचे आहे.ह्याचे लाभ पुढीलप्रमाणे आहेत.
१) किडनीचे अनेक रोग त्वरित निदान आणि उपचारांनी ठीक होऊ शकतात.
२) कोणत्या प्रकारचा किडणीरोग झाला आहे हे लक्षात घेऊन योग्य आणि परिणामकारकरित्या उपचार करता येतात.
३) लहान मुलांच्या किडनीला जेव्हा सूज (अँक्युट ग्लोमेरूलोनेफ्रायटीस) येते तेव्हा,त्वरित पण कमी वेळासाठी रक्तदाब वाढायला लागतो , ज्याचा मेंदूवर विपरीत परिणाम येतो व त्यामुळे संपूर्ण शरीराला ताठरता येऊ शकते व मुल बेशुद्ध पडू शकते . या उच्च रक्तदाबाचे योग्य वेळी निदान झाल्यास आणि उपचार केल्यास मुलांना या गंभीर त्रासापासून वाचवता येते.
४) उच्च रक्तदाब हा क्रॉनिक किडणी फेल्युअरसारख्या गंभीर रोगाचे सर्वात पहिले व एकमात्र लक्षण असू शकते. क्रॉनिक किडणी फेल्यूअरमध्ये उच्च रक्तदाबावर योग्य नियंत्रण राखून आणि इतर उपचार करून किडनीचे संभाव्य नुकसान टाळता येते. तसेच क्रॉनिक किडणी फेल्युअरची गंभीर अवस्था ,ज्यात डायलिसीसची गरज असते,ती बराच काळ लांबणीवर तक्ता येते.
१) तात्कालिक वाढलेल्या रक्तदाबावरील उपचार
मुख्यतः मुलांच्यात आढळणारा (अँक्युट ग्लोमेरूलोनेफ्रायटीस) ह्या रोगात जेवणातले पातळ पदार्थ व मिठाचे प्रमाण कमी करणे,लघवीचे प्रमाण वाढवण्यासाठी औषधे घेणे व रक्तदाब कमी करण्याची औषधे घेण्यामुळे रक्तदाब हळूहळू कमी होऊन सामान्य होतो व त्यानंतर उपचारांची कोणतीही गरज भासत नाही.
किडनीच्या कारणामुळे होणाऱ्या उच्च रक्तदाबावरील उपचार आजाराच्या प्रकारांवर आधारित असतात.
२) कायम राहणाऱ्या उच्च रक्तदाबावरील उपचार
क्रॉनिक किडणी फेल्युअर : (Chronik Kidney Failure) :
या रोगामुळे निर्माण झालेल्या उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी जेवणात मिठाचा कमी वापर करावा, शरीरावरील सूज लक्षात घेऊन वैद्यकीय सल्ल्यानुसार पाण्याचे प्रमाण कमी करावे आणि रक्तदाब कमी करण्याची योग्य औषधे घ्यावी. अशा प्रकारच्या रोगात उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेऊन त्यामेले किडनीला होणारे नुकसान टाळता येते.
किडनीचा रक्तपुरवठा करणारी धमनी आक्रसल्यामुळे रक्तदाब उच्च राहत असेल ,तर त्वरित उपचार करून हा दाब कायमस्वरूपी नॉर्मल करता येतो. ह्या उपचारासाठी पुढील पर्याय उपलब्ध आहे.
अ) रीनल अँजीयोप्लासटी ( Renal Angioplasty)
या उपचारामध्ये शस्त्रक्रियेशिवाय कँथेटरमध्ये असलेल्या फुग्याच्या मदतीने मोठे केले जाते.बहुतांश रोग्यात आक्रसलेल्या भाग पुन्हा मोठा केल्यानंतर तो परत आक्रसू नये म्हणून धमनीच्या आत स्टेंट हि विशेष प्रकारची पातळ नळी घातली जाते.
ब ) शस्त्रक्रियेद्वारे उपचार (Auto Transplant))
या उपचारात शस्त्रक्रिया करून धमनीचा आक्रसलेल्या भाग बदलला जातो किंवा रोग्याची किडनी दुसऱ्या जागी असलेल्या धमणीशी जोडली जाते.(किडणी प्रत्यारोपनाप्रमाणे )
स्त्रोत - Kidney Education Foundation
अंतिम सुधारित : 4/17/2020
अनियंत्रित पेशी-विभाजनामुळे उद्भवणारा एक रोग. या र...
य विभागात गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र ...
खरुज एक त्वचा रोग आहे जे सार्कोप्टीस स्केबीज नावाच...
कंपवात : उतार वयात होणाऱ्या व हळूहळू वाढत जाणाऱ्या...