অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सामान्य लैंगिक समस्या

 

स्त्री-पुरुषांच्या सामान्यपणे आढळणा-या लैंगिक समस्या खालील प्रमाणे आहेत.

- पुरुषांचे इंद्रिय/शिश्न ताठ न होणे

- शिश्नाचा ताठपणा पुरेसा काळ न टिकणे (शीघ्रपतन)

- स्त्री-पुरुष यापैकी कोणालाही/दोघांनाही लैंगिक क्रियेत आनंद न वाटणे

- वीर्यपतन व्हायला उशीर लागणे.

- योनी व शिश्न यांचा नीट संबंध न होणे (योनिप्रवेशात अडचण)

- धातू जाणे (वीर्य वाया जाणे) अशक्तपणा

- झोपेत/स्वप्नात वीर्यपतन होणे.

- योनिप्रवेशाचेवेळी वेदना (विशेषतः स्त्रियांना)

- मूल न होणे.

- लैंगिक इंद्रियांना सूज/व्रण/पू/गाठ होणे.

नीट माहिती घ्या/माहिती द्या

 

यापैकी ब-याच तक्रारी नीट माहिती नसल्यामुळे होतात. आपले काम म्हणजे या समस्यांची नीट माहिती घेऊन, समस्या समजावून घेणे व 'योग्य' माहिती देणे. या पुस्तकाच्या निरनिराळया प्रकरणातून आपल्याला बरीच उपयुक्त माहिती मिळालेली आहे,त्यापैकी प्रमुख प्रकरणे म्हणजे स्त्रीजननसंस्था, पुरुषजननसंस्था या संस्थांचे आजार,लिंगसांसर्गिक आजार, गरोदरपण, बाळंतपण आणि संततीनियमन. याशिवाय व्यायाम आणि आहार हीही महत्त्वाची प्रकरणे आहेत, कारण त्याशिवाय निरोगीपण व ऊर्जा टिकवता येत नाही. या प्रकरणात आता आपण 'लैंगिक क्रियेबद्दल' थोडी माहिती पाहणार आहोत.

लैंगिक संबंधाबद्दल बरेच गैरसमज असतात. विशेषकरून पुरुषजननेंद्रियाचा आकार,शिश्नाचा ताठरपणा टिकण्यासंबंधी अवास्तव कल्पना, धातूनाशाबद्दल भीती, लैंगिक'अशक्तपणा'ची कल्पना, लिंगसांसर्गिक आजारांबद्दल तसेच मासिक पाळीबद्दलचे गैरसमज सामान्यपणे आढळतात.

 

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर

(MBBS, MD community Medicine)

 

संदर्भ : आरोग्याविद्या

अंतिम सुधारित : 8/13/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate