অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

साथ आली तर काय करायचे?

साथ आली तर काय करायचे?

गावात कोणतीही साथ आली आहे असे वाटले तर आपण खालीलप्रमाणे कृती करायची आहे.

  1. साथ कोणत्या आजाराची/लक्षणाची आहे नमूद करा. उदा. हगवण, रक्ती आंव,थंडीताप, हाडमोडी ताप, इ.
  2. आपल्या उपकेंद्राच्या नर्सताई किंवा आरोग्य कर्मचारी बंधूंना फोनवर किंवा चिठ्ठीने कळवा. ग्रामपंचायतीस किंवा नगरपालिकेस पण कळवावे.
  3. प्राथमिक आरोग्यकेंद्राला पण असाच संदेश पाठवा.
  4. चिठ्ठीवर रुग्णाचे नाव, गाव, दिनांक, लक्षणे, इत्यादी मजकूर लिहावा.
  5. रुग्णावर प्राथमिक उपचार करावेत. पुढील उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा रुग्णालयात पाठवावे.
  6. रुग्ण जास्त आजारी (सिरीयस) असेल तर वाहनासाठी प्रयत्न करावेत.
  7. रुग्णाच्या घरात-कुटुंबात आजाराची माहिती द्यावी.
  8. असाच आजार त्या घरात किंवा शेजारीपाजारी असल्या-नसल्याची खात्री करून घ्यावी.
  9. योग्य ती प्रतिबंधक काळजी घ्यावी. यामुळे रोगप्रसार होणार नाही (तक्ता पाहा.)
  10. अफवा पसरू देऊ नये. तशा प्रकारची जाहीर सूचना लिहिल्यास लोकांना निश्चित माहिती मिळेल.

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्याविद्या

अंतिम सुधारित : 4/16/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate