অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हृदय

मानवाचे हृदय कसे आहे

  • मानवाचे हृदय हा एक पोकळ, मांसपेशीयूक्त अवयव असून त्याचा आकार बंद मुठीइतका असतो.
  • आपलं हृदय हे छातीच्या पिंजर्‍याच्या मध्यभागी किंचित डाव्या बाजूला असते.
  • हृदयाचे कार्य कसे चालते ?

  • हे रोज जवळजवळ १ लाख वेळा आणि मिनटाला ६०-९० वेळा धडकते.
  • प्रत्येक ठोक्याबरोबर शरीरात रक्त पंप करण्याचं काम हृदय करते.
  • हृदयाला शुध्द रक्तपुरवठा करणाऱ्या हृदयधमन्या ह्याच हृदयाला प्राणवायू आणि अन्न पुरवतात
  • हृदय हे डावा व उजवा अशा दोन भागात विभागलेले असते. हृदयाला दोन कप्पे असतात  (ज्याला एट्रीयम आणि वेंट्रीकल म्हणतात) जे हृदयाच्या उजव्या व डाव्या बाजूस असतात. हृदयाला एकूण ४ कप्पे असतात.
  • हृदयाच्या उजव्या कप्प्यात अशुद्ध रक्त आत येते आणि ते फुफ्फूसात पंप केले जाते.
  • फुफ्फूसात रक्त शुद्ध होते आणि परत हृदयाच्या डाव्या कप्प्यात सोडले जाते. जेथून रक्त शरिराला पोहोचवले जाते.
  • हृदयाला चार झडपा (वॉल्व्ह) असतात: २ डाव्या बाजूला (मिट्रल आणि एऑर्टिक) आणि २ उजव्या बाजूला (पल्मनरी आणि ट्रायकस्पीड), ज्यामुळे रक्त प्रवाह एका दिशेला वाहतो.
  •  

     

    स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम्

    अंतिम सुधारित : 6/11/2020



    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate