অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रक्त तपासणी


रक्ततपासणी हा शब्द आपण ब-याच वेळा ऐकला असेल. हल्ली रक्ततपासणी शिवाय उपचार केले जात नाहीत. (मात्र प्रत्येक रुग्णाच्या बाबतीत रक्ततपासणीची गरज नसते.)

रक्ततपासणी या गोष्टींसाठी केली जाते

  • रक्तातील रक्तद्रव्य,तांबडया पेशी, पांढ-या पेशींची संख्या व प्रमाण तपासणे.
  • रक्तस्राव किती वेळात थांबेल व रक्त किती वेळात गोठते हे पाहणे.
  • रक्तातील प्रथिने, साखर, स्निग्ध पदार्थ क्षार, प्राणवायू, कार्बवायू, यूरिया,बिलिरुबीन, (काविळीत वाढते ते द्रव्य) आणि इतर अनेक घटकांचे प्रमाण पाहणे. (अर्थातच ही पाहणी नेहमी करावी लागत नाही)
  • रक्तातल्या प्रतिघटकांची पातळी आणि प्रकार (म्हणजे रोगजंतूंविरुध्द तयार होणारे संरक्षक पदार्थ) पाहणे. उदा. विषमज्वरासाठी 'विडाल'तपासणी, लिंगसांसर्गिक रोगांसाठी 'व्हीडीआरएल'तपासणी, एचआयव्ही एड्स तपासणी अशा अनेक तपासण्या आहेत.
  • रक्तगट (ए, बी, ओ) व आर-एच तपासणे.
  • रक्तातील जंतूंचे पृथक्करण करणे; त्यावर कोठली औषधे चालतात हे पाहणे, विशेषतः दीर्घकाळ ब-या न होणा-या तापात अशी तपासणी करतात.
  • कावीळ, यकृतदाह, प्लीहासूज, हृदयविकार, इत्यादी आजारांत वाढणारी रासायनिक द्रव्ये तपासणे.

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्याविद्या

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate