असुरक्षित गर्भपात आणि त्यानंतर होणारा त्रास
झाडपाल्याचे उपचार करून वैदुंकडून किंवा गर्भपात करण्याची सरकारी मान्यता नाही. अशा डॉक्टरांकडून गर्भपात करून घेतल्यास तो गर्भपात बेकायदेशीर ठरतो. अशा गर्भपातानंतर बाईला त्रास होऊ शकतो. कारण अशा गर्भपाताच्या वेळी आवश्यक ती काळजी घेतली जात नाही. म्हणून गर्भपात नेहमी मान्यताप्राप्त डॉक्टरकडूनच करून घ्यायला हवा.
गर्भपातानंतर त्रास होण्याची तीन मुख्य कारणे असतात
- गर्भपाताच्या वेळेस नीट काळजी न घेतल्याने जंतूदोष होणे.
- अर्धवट गर्भ पडणे आणि त्यामुळे आईच्या गर्भाशयात जंतूदोष होणे.
- गर्भपाताच्या वेळेस गर्भाशयाला इजा होणे.
वारंवार आणि असुरक्षित गर्भपातांमुळे आरोग्यावर अनेक वाईट परिणाम होतात. ताप, ओटी पोटात दुखणे, चमका येणे. ओटीपोटावर सूज, उलटया, अंगावरून घाण वास येणारा स्त्राव जाने, अंगावरून लाल जाने, गर्भपातानंतरही बरेच दिवस पाळी येत नसेल तरी डॉक्टरकडे जायला पाहिजे. या सर्व परिणामांसाठी वैद्यकीय उपचार करणे अत्यंत गरजेचे असते. वरीलपैकी कोणताही त्रास असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार घेणे गरजेचे आहे.
थोडक्यात सांगायचे तर गर्भपात टाळण्यासाठी एक जबाबदार व्यक्ती म्हणून खालील गोष्टी करणे आवश्यक आहे.
गर्भपाताविषयी मार्गदर्शन व सल्ला
- एखादया स्त्रीला गर्भपातानंतर काही त्रास होत असेल आणि ती किंवा तिच्या घरचे उपचार घेण्यासाठी तयार होत नसतील तर तिला आणि तिच्या घरच्यांना सल्ल्याची गरज आहे.
- एखादया जोडप्याला कुटुंब नियोजनाची एखादी पद्धती आणि तर बाईला दिवस गेले असतील तर तिला सल्ला- मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे.
- एखादया स्त्रीला जे विवाह बाह्य संबंधातून दिवस गेले असतील तर तिला सल्ला मिळाला पाहिजे.
आपल्याला हवे तेव्हांच मूल होण्यासाठी
- नवरा बायकोने आपल्याला किती मुले व्हावीत हे चर्चा करून ठरवावे. दोन मुलांत सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी कुटुंब नियोजनाची योग्य पद्धत वापरावी.
- गरोदरपणात स्त्रीने योग्य काळजी घ्यावी त्यासाठी नवऱ्याने आवश्यक ते सहकार्य दिले पाहिजे कारण ते मुल ही दोघांची जबाबदारी आहे. यामुळे स्त्रीचे व पर्यायाने कुटुंबाचे आरोग्य व्यवस्थित राहण्यास मदत होईल.
स्त्रोत : गर्भपात, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 5/6/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.