অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गर्भपात

गर्भपात

  1. नैसर्गिकरित्या झालेला गर्भपात
    1. नैसर्गिकरित्या गर्भपात कशामुळे घडून येतो?
    2. गर्भपाताची लक्षणे:
    3. ‘संपूर्ण’ गर्भपात:
    4. अपूर्ण गर्भपात
    5. वारंवार गर्भपात होणे
  2. घडवून आणलेला गर्भपात
  3. कायदेविषयक
    1. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट (MTP):
    2. कायदयामध्‍ये खालील परिस्थिति स्‍पष्‍ट करण्‍यात आलेल्‍या आहेत:
    3. MTP ऍक्‍टमध्‍ये 1975मध्‍ये दुरुस्ती करण्यात आली व खालील सुधारणा करण्‍यात आल्‍या.
    4. ह्यासाठी जवाबदार असणारे मुख्‍य घटक आहेत:
  4. गर्भपातापूर्वीची काळजी
    1. प्रजोत्‍पादन-मार्ग संसर्ग (RTIs)
    2. एक्‍टोपिक गर्भधारणा:
    3. सर्व्‍हायकल सायटोलॉजी
  5. माहिती आणि काउंसिलिंग
  6. निर्णय-सहाय्यक समुपदेशन
    1. गर्भपाताच्या पध्‍दतींची माहिती
    2. सांतती नियमन माहिती आणि सेवा
  7. संततीनियमन माहिती आणि सेवा
  8. गर्भपात करताना उदभवणार्या समस्यांचे प्रबंधन

सर्वच गर्भावस्‍था नऊ महिन्‍यांच्‍या (40 आठवडे) सामान्‍य काळानंतर परिणामी एका अर्भकास जन्‍म देतातच असे नाही. काही उदाहरणांमध्‍ये गरोदरपण (गर्भारपण) आपोआपच नष्‍ट होते; ह्यालाच नैसर्गिकरित्या झालेला गर्भपात असे म्‍हणतात. गर्भपात साधारणपणे 26 आठवड्यांपूर्वी होतात. काही केसेसमध्‍ये गर्भ नष्‍ट करण्‍यासाठी शस्‍त्रक्रिया करावी लागते; ह्यालाच घडवून आणलेला/ वैद्यकिय गर्भपात म्‍हणतात.

नैसर्गिकरित्या झालेला गर्भपात

प्रत्‍येक शंभर गरोदरपणांमधून, दहा किंवा वीस गर्भावस्थांमध्ये नैसर्गिकरित्या गर्भपात होतात. नैसर्गिकरित्या गर्भपात तेव्हा होतो जेव्हा तेव्‍हां होते जेव्‍हां अर्भकास जगण्‍याची संधी मिळण्‍यापूर्वीच गर्भ नष्‍ट होतो. बहुतेक गर्भपात गरोदरपणाच्‍या पहिल्या 12 आठवड्यात घडून येतात.

नैसर्गिकरित्या गर्भपात कशामुळे घडून येतो?

याबाबतीत आतापर्यंत माहित असलेले सर्वसाधारण कारण म्हणजे फलित अंडाणुला (बीज) काहीतरी इजा होणे. जर अशा अंडाणुची वाढ होवून त्‍यांचा विकास झाला असता, तर परिणामी गंभीर विकृति असलेले मूल जन्‍माला आले असते जसे की त्‍याचे अवयव वेडे-वाकडे निपजले असते किंवा अनुपस्थित असते (म्‍हणजे मुलास ते अवयवच नसते). त्‍यामुळे, कधी-कधी गर्भपात, असे विकृतीयुक्‍त जन्‍म थांबविण्‍याचा एक नैसर्गिक मार्ग असावा असे वाटते.

जर गरोदर स्त्रीला मलेरिया किंवा साफिलीससारखा गंभीर रोग झाला असेल किंवा ती जोरात पडली किंवा तिच्‍या प्रजोत्पादक अवयवांमध्‍ये काही समस्‍या असेल तर मिसकॅरेज होवू शकते/गर्भपात होवू शकतो. काही वेळा फलित अंडाणु गर्भाशयाव्यतिरीक्त फॅलोपियन नळी वा इतर दुसर्‍या ठिकाणी वाढू लागतो तेव्‍हांदेखील गर्भपात होवू शकतो. अशा प्रकारची गर्भारपणे बहुधा नेहमीच अपयशी ठरतात आणि फार घातक ठरू शकतात.

गर्भपाताची लक्षणे:

गर्भपाताची दोन मुख्‍य लक्षणे असतात – योनिमार्गातून रक्तस्‍त्राव आणि ओटीपोटात दुखणे. साधारणपणे रक्‍तस्‍त्राव सुरूवातीला थोडासा असतो, पण लवकरच त्‍याचे प्रमाण जास्‍त होते आणि त्यात मोठ्या गांठी दिसून येतात. रक्‍तस्‍त्राव आणि दुखण्याची तीव्रता एखाद्या जाचक मासिक पाळीसारखेच असते, विशेषत: गर्भावस्थेच्या सुरूवातीच्या काळात गर्भपातासाठी. ह्यामुळे एखादा गर्भपात केव्‍हा होईल हे सांगणे, विशेषकरून जर गर्भपात कधीच शंकास्‍पद नसल्‍यास, फार कठीण आहे.

‘संपूर्ण’ गर्भपात:

जेव्‍हां वाढ होत आलेल्‍या भ्रूणाच्या पेशी किंवा गर्भस्थ अर्भक आणि गर्भवेष्‍टन (वार) योनिमार्गाद्वारे बाहेर निघाले म्‍हणजे संपूर्ण गर्भपात झाला असे म्‍हणतात. संपूर्ण गर्भपात झाल्‍यावर, रक्‍तस्‍त्राव थोड्या दिवसांनी थांबतो. अशा वेळी स्‍त्रीने विश्रांती घ्‍यावी आणि कोणती ही जड वस्‍तु उचलणे टाळावे तसेच व्‍यायाम 2-3 आठवडे थांबवावा. स्‍त्रीने स्‍वत:ची स्‍वच्‍छता पाळावी आणि लैंगिक संबंध टाळावा.

अपूर्ण गर्भपात

भ्रूणाचा किंवा गर्भवेष्‍टनाचा काही भाग गर्भाशयामध्‍ये राहून गेल्‍यास त्‍याला अपूर्ण गर्भपात म्‍हणतात. गरोदरपणाच्‍या दहाव्या आणि विसाव्या आठवड्यादरम्यान गर्भपात झाल्‍यास तो बहुधा अपूर्ण गर्भपात असतो. रक्‍तस्‍त्राव निरंतर चालू राहतो आणि गर्भाशयामधील मृत उती/ पेशींपासुन संसर्ग होण्‍याचा ही मोठा धोका असतो, ज्‍यामुळे ताप येतो आणि ओटीपोटात दुखते. जेव्‍हां गर्भपात अपूर्ण असतो, एखाद्या प्रशिक्षित आरोग्‍य कार्यकर्त्‍या द्वारे किंवा एखाद्या इस्पितळात किंवा क्लिनिकमध्‍ये जावून गर्भाशय पूर्णपणे रिकामे व स्वच्छ करून घेतले पाहिजे. जर एखाद्या अपूर्ण गर्भपातास संसर्ग झाला, तर ताप येवू शकतो आणि प्रजोत्‍पादन अवयवांमध्‍ये सतत टिकून राहणारे दुखणे घर करते. जर संसर्गावर लवकर उपाय करण्‍यात आले नाही तर फेलोपियन नलिकेला ओरखडे पडतात ज्‍यामुळे स्‍त्रीला वंध्‍यत्‍व (वांझपण) येवू शकते. एखाद्या स्‍त्रीला अपूर्ण गर्भपात झाल्‍या नंतर संसर्गाची लक्षणे दिसून आल्‍यास, तिने ताबडतोब तपासणी करविण्‍यास जावे.

गर्भपाता नंतर, विशेषकरून अपूर्ण गर्भपातानंतर स्‍त्रीने पुनश्‍च गर्भधारणेचा प्रयत्‍न करण्‍यासाठी काही महिने थांबायला हवे. ह्या काळाच्या दरम्‍यान गर्भधारणा टाळण्‍यासाठी एखाद्या कुटंब नियोजन पध्‍दतीचा वापर करायला हवा.

वारंवार गर्भपात होणे

काही स्त्रियांचे वारंवार गर्भपात होतात. एक किंवा दोन गर्भपातांच्‍या नंतर स्‍त्रीला चिंतामुक्‍त राहण्‍यास सांगावे. पण गरोदरपणात उशीरा, तिसरा किंवा चौथा गर्भपात झाल्‍यानंतर स्‍त्रीला वैद्यकिय तपासणी करून घेण्यास प्रोत्साहन द्यावे व त्यांतून काही उपाय सापडतो का ते पहावे.

घडवून आणलेला गर्भपात



नैसर्गिक गर्भपातालाच ‘स्‍वाभाविक गर्भपात’ देखील म्‍हणतात, म्‍हणजे आपोआप होणारे गर्भपात होय. तरी पण, केव्‍हां तरी, अशी वेळ येते की स्‍त्री ‘गर्भपात घडवून आणून’ गरोदरपणाचा अंत करते (‘इन्‍ड्यूस्‍ड अबॉर्शन’). ह्या पध्‍दतीचा वापर गरोदरपणाच्‍या काळात लवकर करण्‍यात येतो, साधारणपणे पहिल्‍या तीन महिन्‍यांच्‍या आंत. स्‍त्रीला दुखणे कमी व्‍हावे म्हणुन इंजेक्‍शन देण्‍यात येते, आणि मग योनिमार्गातून आंत घातलेल्‍या उपकरणांच्‍या मदतीने डॉक्‍टर संपूर्ण गर्भाशय स्‍वच्‍छ करतो/करते. ही शस्‍त्रक्रिया बहुधा 15 मिनिटांत होते. एखाद्या प्रशिक्षित व्‍यक्‍तीने, योग्‍य त्‍या उपकरणांचा उपयोग करून, स्‍वच्‍छ वातावरणांत शस्‍त्रक्रिया केल्‍यास, ही घातक ठरत नाही.

वैद्यकियरित्या गर्भपात घडवून आणण्यासाठी एखाद्या असुरक्षित पध्‍दतीचा अवलंब करण्‍यात आला, तर स्‍त्रीला तिच्‍या प्रजोत्‍पादन अवयवांमध्‍ये संसर्ग होण्‍याचा फार संभव असतो.

एखाद्या स्‍त्रीने जर काही कारणास्‍तव गर्भपात करविला आणि तिच्‍यामध्‍ये ताप किंवा थंडी भरून येणे, ओटीपोटात दुखणे, कळा किंवा पाठदुखी किंवा योनिमार्गाद्वारे सतत होणारा रक्‍तस्‍त्राव किंवा योनिमार्गाद्वारे खूप दुर्गन्‍धीयुक्‍त स्‍त्राव किंवा सामान्‍य सामान्य मासिक पाली सुरू होण्यास सहा किंवा जास्त आठवड्यांचा कालावधी लागत असेल तर होत असेल, तर तिने ताबडतोब इस्पितळात जावून उपचार घेतला पाहिजे. उशीर केल्‍यास जीवाशी गांठ पडू शकते.

कायदेविषयक

नॅशनल पॉप्‍युलेशन पॉलिसी 2000 मधील लोकसंख्‍या स्थैर्याचा मुद्दा प्रभावीपणे आणि निर्भयपणे राबविण्यासाठी योग्य व बहुव्‍यापक कायदा असणे हे फार महत्‍वपूर्ण आहे. तथापि, दोन विशिष्‍टआहेत, ज्‍यांचे विशिष्‍ट उद्देश आहेत, आणि ते खालीलप्रमाणे आहेत:

द प्रीनेटल डायग्‍नोस्टिक टेक्‍नीकस् (प्रसूतीपूर्व लिंग परीक्षण) (रेग्‍यूलेशन एण्‍ड प्रिव्‍हेन्‍शन ऍक्‍ट) (नियमन व बंदी कायदा) 1994:

हा कायदा १ जानेवारी १९९६ मध्ये अंमलात आला. या कायद्यामध्ये ज्या परिस्थितींतर्गत गर्भातील विकृतींचे निदान करण्यासाठी प्रसूतीपूर्व लिंग परिक्षण पद्धती वापरता येऊ शकतात त्या परिअस्थितींचा उल्लेख केला आहे. गर्भाचे लिंग सांगणे हा कायद्यान्वये गुन्हा आहे. कायदेभंग केल्‍यास शिक्षेची तरतूद आहे.

प्रसूतीपूर्व लिंगपरिक्षण पद्धतींच्या गैरवापराचे नियंत्रण व प्रतिबंधन कायदाचा मुख्य उद्देश प्रसूतीपूर्व लिंग परीक्षणा नंतर होत असलेल्‍या, स्‍त्री भृणहत्‍येसारख्‍या सामाजिक दुष्कृत्यांचे निर्मूलन करणे हा आहे.

मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट (MTP):

गर्भपाताशी संबंधित विकार व मृत्यू यांचे प्रमाण कमी करण्यासाठी संसदेने गर्भपाताशी संबंधित विकार व मृत्यू यांचे प्रमाण कमी करण्यासाठी मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्‍नन्‍सी ऍक्‍ट (MTP) 1971 मध्‍ये संमत केला, ज्‍याचे कार्यान्‍वयन जम्‍मू व काश्‍मीर वगळून संपूर्ण भारतात 1 एप्रिल 1972 पासून करण्‍यात आले, जम्‍मू व काश्‍मीरमध्‍ये याचे कार्यान्‍वयन नोव्‍हेंबर 1976 मध्‍ये करण्‍यात आले.

ज्‍या परिस्थितिंमध्‍ये गर्भपात केला जावू शकतो, कोणत्‍या व्‍यक्‍ती तो करू शकतात, कोणत्‍या जागी ते करण्‍यात येवू शकतात याबद्दल MTP कायदा, 1971 मध्‍ये स्‍पष्‍ट करण्‍यात आलेले आहे.

कायदयामध्‍ये खालील परिस्थिति स्‍पष्‍ट करण्‍यात आलेल्‍या आहेत:

मातेची वैद्यकीय अवस्‍था (परिस्थिति): (
जेव्‍हां माता एखाद्या शारीरिक किंवा मानसिक आरोग्‍य समस्‍येने ग्रस्‍त असेल किंवा गरोदरपणाच्‍या दरम्‍यान तिला काही धोका असेल किंवा बाळंतपणादरम्यान तिच्या जीवाला धोका असेल किंवा गरोदरपण तिच्‍या शारीरिक किंवा मानसिक आरोग्‍यासाठी घातक असेल
सुप्रजननशास्त्र: जेव्हा अर्भकाला जन्मतःच विषाणु संसर्गामुळे, प्रमाणाबाहेर औषधे घेतल्यामुळे, क्ष-किरणांच्या किंवा किरणोत्सर्गाच्या संपर्कात आल्यामुळे रक्ताची कमतरता, मानसिक अस्थिरता यांसारख्या शारिरीक किंवा मानसिक विकृतींचा धोका संभवत असेल तर.

मानवतावादी दृष्टिकोनातून: (Humanitarian) जेव्‍हां बलात्‍कारानंतर गरोदरपण येते

गरोदरपण: कुटुंब नियोजन साधनांच्‍या त्रुटिमुळे गरोदरपण येणे. ह्या कलमान्‍वये स्‍त्रीने विनंती केल्‍यास गर्भपातास संमति मिळते.

सामाजिक-आर्थिक परिस्थिति: अशी परिस्थिति जी मातेच्‍या आरोग्‍यास घातक ठरेल. हे एक कलम आहे, ज्‍यायोगे विनंती केल्‍यावर गर्भपात करण्‍यासाठी अनुमती मिळू शकते.

कायद्यान्वये, OBG चा पुरेसा (कयद्यान्वये ठरवून दिलेला) अनुभव असणारी व अधिकृतरित्या नोंदणी केलेली वैद्यकिय क्षेत्रातील व्यक्तीच केवळ MTP अन्वये गर्भपाताची शस्त्रक्रिया करू शकते. गर्भावस्था 12 आठवड्यांपेक्षा कमी असल्‍यास डॉक्‍टर इतर डॉक्‍टरांच्‍या सल्‍ल्‍याविना गर्भपात करू शकतात. पण गर्भावस्थेस १२ आठवड्यांहून जास्त कालावधी लोटला असेल तर मात्र गर्भापात करण्याचा निर्णय दोन डॉक्टरांनी मिळून घेणे अनिवार्य असते. दोघांपैकी कोणता ही डॉक्टर गर्भपात करू शकतो. आणीबाणीच्या परिस्थितीत , जर गर्भ २० आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीचा असेल तर एक डॉक्टरदेखिल दुसर्‍या डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय मान्यता नसलेल्या दवाखान्यात वा इस्पितळातही गर्भपाताची शस्त्रक्रिया करू शकतो.

मात्र यासाठी स्त्रीची लेखी परवानगी घेणे फार आवश्‍यक आहे. स्‍त्री अल्‍पवयीन असल्यास किंवा तिला मानसिक धक्का बसला असल्यास किंवा तिचे मानसिक संतुलन बिघडले असल्यास तिच्‍या पालकांकडून लेखी परवानगी घेणे आवश्‍यक आहे. MTP ऍक्‍ट 1971 च्‍या अंतर्गत गर्भपात ही वैयक्तिक बाब असून सेवा प्रदात्‍यांच्‍या द्वारे कठोर गुप्‍तता राखण्‍यात आली पाहिजे, स्‍त्रीची ओळख गुप्‍त ठेवण्‍यात आली पाहिजे.

डॉक्‍टरने सावधगिरी आणि योग्‍य ती सर्व काळजी घेतलेली असल्‍यास, गर्भपाता नंतर कोणत्‍या ही प्रकारची समस्‍या किंवा त्रास उद्भवल्‍यास, कोणत्‍या ही प्रकारच्‍या कायदेशीर दाव्‍यांपासून डॉक्‍टर सुरक्षित राहतो.­ पण कोणता ही कायदेभंग झाल्‍यास, डॉक्‍टरला शिक्षा होवू शकते ज्‍यामध्‍ये रू.1000/- च्‍या दंडाचा समावेश आहे.

वैद्यकीय आणि सुप्रजननशास्‍त्राच्‍या आधारावर गर्भपात करविणे माता व मूल दोघांच्‍या ही दृष्टिने चांगले आहे पण विशेषत: स्त्री भ्रूणास नष्‍ट करण्‍यासाठी, जे अनैतिक आणि असामाजिक देखील आहे, ह्याचा उपयोग होवू नये ह्या बाबत सावधगिरी बाळगावी लागेल. लागोपाठ होणारे गर्भपात मातेच्‍या आरोग्‍याकरीता घातक ठरू शकते आणि ह्याचा परिणाम मृत्यू व विकारांचे प्रमाण वाढण्यात होवू शकतो. स्त्रियांना हे समजावून सांगायला हवे आणि संततीनियमनाच्‍या इतर पध्‍दतींचा वापर करण्‍यासाठी प्रवृत्त करण्‍यात आले पाहिजे.

MTP ऍक्‍टमध्‍ये 1975मध्‍ये दुरुस्ती करण्यात आली व खालील सुधारणा करण्‍यात आल्‍या.
  • गर्भपात करण्‍यासाठी डॉक्‍टरला आवश्‍यक योग्‍यतेचा दाखला देण्‍यासाठी मुख्‍य जिल्‍हा वैद्यकीय अधिकारी (चीफ डिस्ट्रिक्‍ट मेडिकल ऑफिसर) यांना अधिकार देण्‍यात आले. यापूर्वी हे काम प्रमाणपत्र महामंडळाकडून केले जात असे.केले जात असे.
  • गर्भपात करण्‍यासाठी आवश्‍यक शैक्षणिक योग्‍यता; a) जर RMP ने 25 MTPs करण्‍यात सहकार्य (हाताखाली काम केले असल्‍यास) केले असेल तर, b) जर डॉक्‍टरने OBG मध्‍ये सहा महिने हाउसमनशिप केली असेल तर, c) जर तो OBG मध्‍ये स्नातकोत्तर असेल तर, d) जर एखादा डॉक्‍टर 1971 ऍक्‍ट लागू होण्‍या आधी स्‍नातक झाला असेल, आणि OBG मध्‍ये 3 वर्षांचा अनुभव असेल तर, e) आणि जो ऍक्‍ट लागू झाल्‍यानंतर स्‍नातक झाला असेल, आणि OBG मध्‍ये 1 वर्षाचा अनुभव असेल तर.
  • गैर-सरकारी संस्‍था (एनजीओ) देखील मुख्‍य जिल्‍हा वैद्यकीय अधिकारी (चीफ डिस्ट्रिक्‍ट मेडिकल ऑफिसर) कडून परवाना (लायसन्‍स) घेतल्‍यानंतर गर्भपात सेवा प्रदान करू शकतात.


MTP ऍक्‍ट 1971 (1975 च्या दुरूस्तीनंतर) नंतरदेखिल त्‍याच्‍या अंतर्गत दूरवरच्‍या पर्वतीय आणि आदिवासी क्षेत्रांत आणि नागरी क्षेत्रात सुध्‍दा, प्रदान करण्‍यात येत असलेल्‍या सेवा त्‍या लोकांच्‍या द्वारे देण्‍यात येत आहेत जे कुशल नाहीत किंवा ह्या कायद्यान्वये अधिकृत देखील नाहीत.

ह्यासाठी जवाबदार असणारे मुख्‍य घटक आहेत:
  • ग्रामीण आणि दूरवरच्‍या पर्वतीय व आदिवासी क्षेत्रांत क्लिनिकची उपलब्‍धता नसल्‍यामुळे तसेच नागरी क्षेत्रातील क्लिनिकमध्‍ये येण्‍यासाठी आर्थिक साधनांचा तोटा असल्‍यामुळे सुरक्षित गर्भपाताचे प्रमाण कमी आहे.
  • सुरक्षित गर्भपात सेवांच्‍या उपलब्‍धतेबाबत माहितीचा अभाव,
  • MTP सेवांकरीता सरकारी क्लिनिक्स् किंवा इस्पितळांमध्‍ये खाजगीचा अभाव आणि अव्‍यक्तिगत वातावरण,
  • अविवाहित आणि विधवा स्त्रियांच्‍या इस्पितळात जाण्‍यास अवरोध.

गर्भपातापूर्वीची काळजी

सर्वांत आधी स्त्री खरेच गरोदर आहे का आहे का हे निश्चित करणे, आणि जर असे असेल तर, गर्भाचा अवधि निश्चित करणे आणि गर्भ सुरक्षित आहे हे पहाणे होय. गर्भपाताशी संबंधीत धोके लक्षात घेणे, जसे कमी दिवसांचा गर्भ पाडण्यात कमी धोका असतो मात्र जास्त दिवसांचा गर्भ पाडण्यात जास्त धोका असतो. (ग्राइम्‍स् एण्‍ड कास्‍टस् 1979). या प्रमाणे गर्भपाताची योग्‍य पध्‍दत निवडण्‍याकरीता गरोदरपणाचा अवधि निश्चित करणे फार महत्‍वाचा घटक आहे.­

प्रत्‍येक आरोग्‍य सेवा केंद्रामध्‍ये स्‍त्रीचा इतिहास जाणून त्‍याप्रमाणे बायमॅन्‍युअल परीक्षण करण्‍यासाठी (आंतून तपासणे) प्रशिक्षित आणि कुशल कर्मचारीगण असणे आवश्‍यक आहे. ज्‍या आरोग्‍य केंद्रांमध्‍ये इंड्यूस्‍ड गर्भपात करण्‍यासाठी आवश्‍यक असलेला कर्मचारीगण आणि साधने नसल्‍यास त्‍यांनी स्‍त्रीला गर्भपात करण्‍यासाठी जवळच्‍या सेवा केंद्रात जाण्‍यास सांगण्‍यास समर्थ असायला हवे. स्‍त्रीला तिच्‍यासाठी इतर पर्याय सांगून सल्‍ला देण्‍यासाठी कर्मचारीगण सक्षम हवा. शारीरिक तपासणीच्‍या दरम्‍यान, आरोग्‍य कर्मचा=याने गर्भाशयाची स्थितिदेखील पहायला हवी (गर्भ एंटीव्‍हर्टेड, रिट्रोव्‍हर्टेड किंवा योग्‍य त्‍या अवस्थितित) आणि लैंगिक संबंधातून पसरणारे रोग व रीप्रॉडक्टिव्‍ह ट्रॅक्‍ट संसर्गाचे उपाय तसेच ऍनिमिया किंवा मलेरिया ज्‍यांमध्‍ये जास्‍त काळजी किंवा अतिरिक्‍त सेवांची आवश्‍यकता पडते अशा बाबतींत वैद्यकीय संगोपन देण्‍यास सक्षम असायला हवे. ज्‍या केसेसमध्‍ये गंभीर सर्व्‍हायकल पॅथोलॉजीची गरज आढळून आली असेल, त्‍या स्‍त्रीला पुढील परीक्षणांसाठी योग्‍य त्‍या सुविधा घेण्‍यास सांगण्‍यात यावे.

अल्‍ट्रासाउंड स्‍कॅनिंग
RCOG 2000 म्‍हणजेच अल्‍पकालीन गर्भपातासाठी अल्‍ट्रासाउंड स्‍कॅनिंगची गरज नसते. जेथे ही सोय उपलब्‍ध असेल, तेथे तिचा उपयोग 6 आठवड्यांपेक्षा जास्‍त काळाच्‍या अवयव-विस्‍थापनजन्‍य गरोदरपणाचे निदान करण्‍यास मदतीची ठरते. काही प्रदातांना ही पध्‍दत गर्भपाताच्‍या आधी किंवा दरम्‍यान तसेच जास्‍त काळाच्‍या गरोदरपणाच्‍या गर्भपाताच्‍या वेळी मदत करणारी वाटते. जेथे अल्‍ट्रासाउंडचा वापर केला जातो, शक्‍य असल्‍यास, सेवा वितरण स्‍थळांनी, गर्भपात करविणा=या स्त्रिया व पूर्व-मातृत्‍व संगोपन प्राप्‍त करीत असणा=या स्त्रियांसाठी वेगवेगेळ्या जागांची व्‍यवस्‍था करायला हवी.

पूर्व-विद्यमान परिस्थिति:
गरोदरपण आणि गरोदरपणाचा काळ निश्चित करण्‍याच्‍या जोडीला, आरोग्‍य कर्मचा=यांनी स्‍त्रीचा संपूर्ण वैद्यकीय इतिहास जाणून घ्‍यायला हवा ज्‍याचा परिणाम गर्भपाताच्‍या प्रक्रियेच्‍या दरम्‍यान होवू शकतो तसेच स्‍त्री जर कोणती ही औषधे इत्‍यादि घेत असल्‍यास त्‍याबाबत माहिती कर्मचा=यांस असायला हवी.

वैद्यकीय दृष्टिकोनाप्रमाणे, गर्भपात करवित असलेल्‍या स्‍त्रीला देखील तितक्‍याच काळजी व संगोपनाची गरज असते जितकी इतर वैद्यकीय/शल्‍यक्रिया प्रक्रियांमध्‍ये असते. जर स्‍त्री HIV पॉझिटिव्‍ह असल्‍याचे कळून आले तर, तिची विशेष काळजी घेण्‍याची गरज आहे.

प्रजोत्‍पादन-मार्ग संसर्ग (RTIs)

गर्भपाताच्‍या वेळी निम्‍न प्रजोत्‍पादन मार्गातील संसर्ग पोस्‍ट-प्रोसिजरल RTIs मध्‍ये धोक्‍याचा ठरू शकतो. गर्भपाताच्‍या वेळी एंटीबायोटिक्‍सचा नियमित उपयोग केल्‍यास हा धोका निम्‍म्‍याने कमी होत असल्‍याचा अहवाल आहे. तथापि, जेव्‍हां प्रोफायलॅक्‍टिक्‍स उपयोगासाठी एंटीबॉडीज् उपलब्‍ध नसतात तेव्‍हां देखील गर्भपात करता येतो. कोणत्‍या ही परिस्थितित, पोस्‍ट-प्रोसिजरल संसर्गापासून बचावासाठी स्‍वच्‍छता आणि डिसइन्‍फेक्‍शन पध्‍दतींचे कठोर अवलंबन आवश्‍यक आहे.

जर वैद्यकीय लक्षणे संसर्गाचा संकेत देत असतील, तर स्‍त्रीला ताबडतोब एंटीबॉडीज् देण्‍यात यायला हवे आणि मग त्‍या नंतर गर्भपात केला जावू शकतो, जेथे RTIs करीता परीक्षणे नियमितपणे केली जातात आणि संसर्गाची लक्षणे आढळत नाहीत तेथे गर्भपात करण्‍यासाठी परीक्षणांचा परिणाम येईपर्यंत वेळ लावण्‍याची गरज नाही.

एक्‍टोपिक गर्भधारणा:

जेव्‍हां एक फलित अंडाणु गर्भाशयाच्‍या पोकळीच्‍या बाहेर एका विकृतीमय भ्रूणाच्‍या स्वरूपात विकास पावू लागतो, तेव्‍हा त्‍या स्थितिला एक्‍टोपिक प्रेग्नन्‍सी म्‍हणतात.
बहुतेक एक्‍टोपिक गर्भधारणा फेलोपियन नलिका, ओव्‍हरी, डगलस पाउच (गर्भाशयाच्‍या मागची जागा) यांसारख्‍या जागी विकास पावतात.

एक्‍टोपिक गर्भधारणा जीवघेणी ठरू शकते. गर्भाशया व्‍यतिरिक्‍त इतर जागी प्रेग्‍नन्‍सीचे संकेत मिळणे हे भ्रूणाच्‍या अपेक्षित लांबीच्‍या मानाने गर्भाशयाचा आकार लहान असणे आणि ओटीपोटातील दुखणे यामुळे कळून येते, विशेषकरून, जर योनिमार्गाद्वारे रक्‍तस्‍त्राव किंवा रक्ताचे डाग, चक्‍कर येणे किंवा डोके गरगरणे, निस्‍तेजपणा आणि, काही स्त्रियांमध्‍ये, जर एक्‍टोपिक प्रेग्‍नन्‍सीची शंका असेल तर, एक ऍडनक्‍सल आकार आढळल्‍यास ताबडतोब निश्‍चत निदान करणे आवश्‍यक आहे आणि स्‍त्रीला ताबडतोब औषधोपचार देणे सुरू करण्‍यात यावे किंवा शक्‍य तितक्‍या लवकर निश्चित निदान आणि औषधोपचार सुरू करण्‍याची सोय असलेल्‍या जागी हलविण्‍यात यावे.

सर्व्‍हायकल सायटोलॉजी

सर्व्‍हायकल सायटोलॉजी आणि STIs ची उच्‍च व्‍यापकता असतांना गर्भपात करण्‍याची विनंती म्‍हणजे स्त्रियांच्‍या सर्व्‍हायकल सायटोलॉजीचे मूल्‍यांकन करण्‍याची संधी ठरू शकते. तथापि, अशा प्रकारच्‍या सेवांचा स्‍वीकार करणे स्‍त्रीसाठी गर्भपात करण्‍यासाठी अट नसावी आणि गर्भपात सुरक्षितपणे करण्‍यासाठी ह्या सेवांची आवश्‍यकता नाही.

माहिती आणि काउंसिलिंग

माहिती पुरविल्‍या जाणे हा एका चांगल्‍या गर्भपात सेवांचा आवश्‍यक भाग आहे, सूचना संपूर्ण, अचूक आणि सहज समजेल अशा असाव्‍यात, आणि स्‍त्रीची खाजगी (निजता) व गोपनीयता यांचा सन्‍मान कायम राहील अशा पध्‍दतीने देण्‍यात याव्‍यात.

निर्णय-सहाय्यक समुपदेशन


स्‍त्रीला तिच्‍यापाशी असलेल्‍या पर्यायांमधून निवड करणे आणि दबावापासून मुक्‍त राहून निर्णय घेण्‍यासाठी समुपदेशन हे फार महत्‍वाचे आहे. समुपदेशन स्‍वयंस्‍फूर्त, सहज आणि प्रशिक्षित व्‍यक्‍तीकडून करण्‍यात यावे.

स्‍त्रीने गर्भपात करणे निवडल्‍यास, आरोग्‍य कर्मचा=यांनी त्‍या बाबत काही कायदेशीर आवश्‍यकता असल्‍यास तिला समजावून सांगावे. स्‍त्रीला निर्णय घेण्‍यासाठी जितका पाहिजे तितका वेळ देण्‍याची गरज आहे, म्‍हणजे अगदी तिने परत जावून पुन्‍हां येणे हे सुध्‍दा करावे. तथापि, गर्भपात लवकर करण्‍यामागील सुरक्षितता आणि प्रभावात्‍मकता यांच्‍या बाबतसुध्‍दा समजावून सांगावे. आरोग्‍य कर्मचारा=यांनी गरोदरपण पूर्णपणे निभावणे आणि/किंवा मूल दत्तक घेण्याविषयी विचार करणे, त्‍याचबरोबर योग्‍य संबध्‍दता यांबाबत निर्णय घेणे हे स्त्रियांना समजावून सांगावे.

काही परिस्थितिंमध्‍ये स्‍त्री गर्भपात करविण्‍यास इतर कुटुंबीय किंवा तिचा साथीदार यांजकडून दबावाखाली असू शकते. विशेषकरून अवि‍वाहित किशोरी आणि HIV पॉझिटिव्‍ह असलेल्‍या स्त्रिया अशा प्रकारच्‍या दबावासाठी सहज-साध्‍य असतात. HIV पॉझिटिव्‍ह स्त्रियांनी त्‍यांच्या स्‍वत:च्‍या प्रकृतीकरीता आणि त्‍यांच्या स्‍वत:च्‍या तर्फे त्‍यांच्या अर्भकामध्‍ये HIV चा संसर्गाचा धोका याबाबत समजावून घेण्‍याची आवश्‍यक आहे. त्‍यांनी त्‍यांच्‍या स्‍वत:च्‍या उपचारासाठी आणि त्‍यांच्‍या अर्भकास संसर्गापासून बचाव देणा=या उपलब्‍ध औषधोपचाराबाबत माहिती करून घेणे आवश्‍यक आहे ज्‍यायोगे गरोदरपण नेटास नेणे किंवा कायदेसंमत असल्‍यास गर्भपात करविणे याबाबत निर्णय घेण्‍यास त्‍यांना मदत होईल. त्‍यांनी अतिरिक्‍त काउंसिलिंगची मागणी करावी. जर स्‍त्रीवर लैंगिक अत्याचार झाले असतील किंवा ती इतर अन्यायाची बळी असल्याचे असल्‍याचे कर्मचा=यांना आढळले किंवा तशी शंका आली तर त्‍यांनी तिला इतर प्रकारच्‍या योग्‍य काउंसिलिंग व औषधोपचाराचा सल्‍ला द्यावा. प्रबंधकांनी आरोग्‍य व्‍यवस्‍थेत व समुदायांमध्‍ये अशी साधने आहेत याची माहिती कर्मचा=यांना आहे याची खात्री करून घ्‍यावी.

गर्भपाताच्या पध्‍दतींची माहिती

स्‍त्रीला, कमीत कमी खालील बाबतींची माहिती असायला पाहिजे:
  1. प्रक्रियेच्‍या दरम्‍यान आणि नंतर काय काय केले जाईल
  2. तिला कसा अनुभव येणार आहे (उदा. मासिक पाळीसारख्‍या कळा, दुखणे आणि रक्‍तस्‍त्राव)
  3. ह्या प्रक्रियेस किती वेळ लागेल
  4. तिला कोणते पीडा-निवारण प्रबंधन उपलब्‍ध करवून देण्‍यात येईल
  5. पध्‍दतीशी निगडित धोके आणि जटिलता
  6. ती आपल्‍या सामान्‍य क्रियाविधि, संभोग इत्यादी, केव्‍हां करू शकेल
  7. पाठ-पुरावा/मागोवा संगोपन

गर्भपाताच्‍या प्रक्रियांमध्‍ये निवड करणे शक्‍य असल्‍यास, स्‍त्रीला गर्भपाताच्‍या योग्‍य पध्‍दतीबद्दल माहिती देण्‍यास, ज्‍यामध्‍ये गर्भाची एकूण लांबी आणि स्‍त्रीचा वैद्यकीस इतिहास आणि संभाव्‍य धोके यांचा ही समावेश असतो, प्रदाते अत्‍ंयत दक्ष असायला हवेत.

सांतती नियमन माहिती आणि सेवा

संततीनियमन माहिती आणि सेवा


संतती नियमनाच्‍या माहितीची उपलब्‍धता आणि सेवा गर्भपाताच्‍या केसच्‍या बाबतीत फार महत्‍वाच्‍या असतात कारण त्‍यामुळे स्‍त्रीला भविष्‍यात अवांछित गर्भधारणा टाळण्‍यास मदत मिळते.

गर्भपाता नंतर बीजधारणा दोनच आठवड्यांनी होवू शकते ज्‍यायोगे स्‍त्रीला, जर तिने संतती नियमनांचा वापर केला नसेल तर पुन्‍हां गरोदरपणाचा धोका असतो. स्‍त्रीला तिच्‍या आवश्‍यकतेप्रमाणे योग्‍य त्‍या संततीनियमन साधनाचा वापर करण्‍याबाबत माहिती देण्‍यात आली पाहिजे. संततीनियमन साधनांच्या अपयशी वापरामुळे गर्भपात करत असेल तर प्रदात्‍यांनी तिच्‍याशी साधनाच्‍या वापराच्‍या पध्‍दतीबाबत चर्चा करावी आणि तिने ते साधन योग्‍य प्रकारे वापरलेले नसल्‍यास तिला योग्य पध्‍दत शिकवावी, किंवा तिला साधन बदलायला सांगावे. साधन/पध्‍दतीची निवड सरते शेवटी स्‍त्रीनेच करायची असते.

स्‍त्रीला गर्भपात सेवा प्रदान करतांना तिने संततीनियमनाची साधने वापरावीत अशी अट नसावी.

गर्भपात करताना उदभवणार्या समस्यांचे प्रबंधन

प्रशिक्षित व्‍यक्‍तीने गर्भपात केल्यास, बिघाड किंवा गुंतागुंतीचे प्रकार तुरळकच सामोरे येतात. तरी सुध्‍दा, प्रत्‍येक आरोग्‍य प्रणालीच्‍या प्रत्‍येक पातळी आवश्यक त्या सर्व उपकरणांसह सुसज्जित असायला हवी आणि गर्भपातातील समस्‍या ओळखून स्‍त्रीला योग्‍य संगोपन देणारा प्रशिक्षित वर्ग (वर्ल्‍ड हेल्‍थ ऑर्गनायझेशन 1994), दिवसाचे 24 तास स्त्रियांसाठी गर्भपात प्रबंधनाच्‍या सोयी आणि कुशलता सेवा ह्या गर्भपात करविणा=या स्‍त्रीकरीता देखील तितक्‍याच आवश्‍यक आहेत जितक्‍या मिसकॅरेज झालेल्‍या स्‍त्रीसाठी असतात.

अपूर्ण गर्भपात
जेव्‍हां एखादी प्रशिक्षित व्‍यक्‍ती गर्भपात करते तेव्‍हां व्‍हॅक्‍यूम ऍस्पिरेशनचा वापर अप्रचलित ठरतो. हे सामान्‍य वैद्यकीय पध्‍दतीनेच करावे लागते. योनिमार्गाद्वारे रक्‍तस्‍त्राव, ओटीपोटात दुखणे आणि संसर्गाची लक्षणे आढळतात.
गर्भपाताच्‍या दरम्‍यान निष्‍कासित ऊतकांवरून जर गर्भावस्‍थेच्‍या काळाचे आकलन होत नसेल तर, संशयास्‍पद स्थिति असण्‍याचा संभव असतो. प्रत्‍येक आरोग्‍य केंद्राचे कर्मचारी प्रशिक्षित आणि साधन-सज्ज असायला हवेत म्‍हणजे ते अपूर्ण गर्भपाताच्‍या दरम्‍यान व्‍हॅक्‍यूम ऍस्पिरेशनने, हेमरेज किंवा संसर्गाच्‍या बाबतीत काळजी घेत, गर्भाशय पूर्णपणे रिकामा करण्‍यास सक्षम असतील.

अयशस्‍वी गर्भपात
शस्‍त्रक्रिया किंवा वैद्यकीय पध्‍दतीने गर्भपात करविलेल्‍या स्त्रियांमध्‍ये अयशस्‍वी गर्भपात आढळू शकतो. जर, कोणत्‍या ही पध्‍दती नंतरच्‍या पाठ-पुरावा भेटीच्‍या वेळी, गर्भावस्‍था टिकून असेल, सेकंड-ट्रायमेस्‍टर गर्भपात करण्‍यासाठी व्‍हॅक्‍यूम ऍस्पिरेशन किंवा D&E ची गरज भासते.

हॅमरेज
गर्भाचे राहिलेले अंश, सर्व्हिक्‍सला आघात किंवा हानि पोचणे, किंवा क्‍वचितपणे, गर्भाशयाला छिद्रे पडणे, यांच्‍यामुळे हॅमरेज होवू शकते. कारणाप्रमाणे, योग्‍य औषधोपचारात गर्भाशय रिक्‍त करणे आणि रक्‍तस्‍त्राव थांबविण्‍याकरीता यूटरोटॉनिक औषधे देणे, गंभीर केसेसच्‍या बाबतीत इंट्राव्‍हेनस फ्लूड रिप्‍लेसमेंट, ब्‍लड ट्रान्‍सफ्यूजन लेप्रोस्‍कोपी किंवा एक्‍सप्‍लोरेटरी लेप्रोटॉमी करण्‍यात येवू शकतो. हॅमरेजच्‍या केसेस कमी करण्‍यासाठी नियमितपणे ऑक्सिटॉक्सिनचा वापर करण्‍याची शिफारस करण्‍यात येते. तथापि, प्रत्‍येक डिलिव्‍हरी साइट/सेवा वितरण स्‍थळ स्‍त्रीला शक्‍यतो लवकर उपचार देण्‍यास किंवा स्‍टेबल करण्‍यास समर्थ असायला हवे.

संसर्ग
गर्भपात नीटनेटका केल्‍यास सहसा संसर्ग होत नाही. साधारण लक्षणे म्‍हणजे ताप किंवा थंडी भरून येणे, योनिमार्गाद्वारे दुर्गंधीयुक्‍त स्‍त्राव जाणे, ओटीपोटातील दुखणे, योनिमार्गातून दीर्घकालीन रक्‍तस्‍त्राव किंवा नुसतेच डाग लागणे, गर्भाशय नाजुक/दुखरा होणे, किंवा/आणि रक्‍तातील पांढ=या पेशींची वाढ होणे. संसर्ग आहे हे निदान झाल्‍यास, आरोग्‍य कर्मचा=यांनी एंटीबायोटिक्‍स द्यावेत किंवा काही अंश पोटात राहून गेले म्‍हणून संसर्ग झाला आहे असे वाटल्‍यास गर्भाशय पुन्‍हा रिकामा करावा. गंभीर संसर्ग असल्‍यास स्‍त्रीला इस्पितळात दाखल करावे लागेल. या पूर्वीच चर्चा केल्‍याप्रमाणे, एंटीबायोटिक्‍सचे प्रोफायलॅक्टिक प्रिस्क्रिब्‍शन गर्भपातानंतरच्‍या संसर्गाचा धोका कमी करते असे आढळले आहे आणि म्‍हणून ते जेथे उपलब्‍ध असेल तेथे द्यावे.

गर्भाशयाला छिद्र पडणे
साधारणपणे, गर्भाशयास छिद्रे पडली असल्‍याचे निदान देखील होत नाही आणि त्‍यावर काही औषधे घेण्‍याची ही गरज पडत नाही कारण ही समस्‍या आपोआपच दूर होते. फर्स्‍ट-ट्रायमेस्‍टर गर्भपात आणि लेप्रोस्‍कोपिक स्‍टरलायझेशन (निर्जंतुकीकरण) करविणा=या 700 पेक्षा जास्‍त स्त्रियांमधून 14 मधील 12 स्त्रियांमध्‍ये यूटरिन आकार एवढा लहान होता की लेप्रोस्‍कोपी करण्‍यात आली नसती तर त्‍यांच्‍याबद्दल कळले ही नसते. जेथे उपलब्‍ध असेल तेथे तपासणीची पध्‍दत म्‍हणून लेप्रोस्‍कोपीचीच निवड करावी लागते. लेप्रोस्‍कोपिक तपासणीच्‍या दरम्‍यान आणि/किंवा रूग्‍णाच्‍या परिस्थितिनुसार जर पोट, रक्तनलिका किंवा इतर भागांना इजा झाल्‍याची शंका असेल तर, लेपरोटॉमीची गरज भासण्‍याची शक्‍यता आहे.

ऍनेस्‍थेसिया-संबंधी कॉम्प्लिकेशन्स्
पहिल्या तिमाहीत व्‍हॅक्‍यूम ऍस्पिरेशन आणि दुसर्‍या तिमाहीत डायलेटेशन आणि इव्‍हॅक्‍यूएशनसाठी दोन्‍ही प्रकारांमध्‍ये लोकल ऍनेस्‍थेसिया हा जनरल ऍनेस्‍थेसियापेक्षा जास्‍त सुरक्षित असतो. जेथे जनरल ऍनेस्‍थेसियाचा वापर केला जातो,
तेथील कर्मचारीगण ह्र्दय व श्वासोच्छवासात काही बिघाड आढळल्यास बिघाड झाल्‍यास त्याचे नियंत्रण करण्यात निष्‍णात असायला पाहिजे. नार्कोटिक रिव्‍हर्सल एजंट देखील नेहमी तयार ठेवायला पाहिजेत.

दीर्घकालीन परिणामी रोगोद्भव

ज्‍या स्त्रियांचे नीटनेटके इंड्यूस्‍ड अबॉर्शन झाले आहे त्‍यांतील बहुतेकांना दीर्घकालीन परिणामी रोगोद्भव होणार नाही. मात्र ज्‍यांच्‍या गर्भपाताच्‍या दरम्‍यान काही गंभीर गुंतागुंती झाल्‍या असतील त्या स्त्रिया यास अपवाद ठरू शकतात. सुरक्षित प्रकारे करण्‍यात आलेल्‍या तिमाहीतील गर्भपात आणि अनुक्रमित गरोदरपण यांच्‍यात काही ही संबंध नसल्‍याचे संशोधनाअंती आढळले आहे. साऊंड एपिडेमियोलॉजिकल डाटा ह्या स्त्रियांमध्‍ये स्‍तन कर्करोगाचा धोका नसल्याचे दर्शवितो आणि पूर्वीच्‍या परिस्थितिंचे सातत्‍य कायम असल्‍यासारखे वाटते.

गर्भपातानंतर घ्‍यावयाच्‍या काळजीबद्दल सूचना/निर्देश

आरोग्‍य केंद्रातून घरी गेल्‍यावर स्‍वत:ची काळजी कशी घ्‍यावयाची त्‍याबाबत गर्भपात करविणा=या स्त्रियांना स्‍पष्‍ट, सोप्‍या, तोंडी आणि लेखी सूचना द्याव्‍यात, ज्‍यांमध्‍ये वैद्यकीय मदतीची गरज लागेल अशा समस्‍या जाणून घेणे ह्याचा ही समावेश आहे. गर्भपात पूर्ण झाल्‍यावर, स्त्रियांनी इतर डॉक्‍टरकडे किंवा आरोग्‍य कर्मचा=याकडे जाण्‍यास सक्षम असावे जो त्‍यांच्‍या प्रनांची उत्तरे देवू शकतो.

सद्य परिस्थितिचे मूल्‍यांकन
क्‍वचितच, असे दिसून येईल की काही प्रदाता किंवा संभाव्‍य प्रदाता, गर्भपाताबद्दल नकारात्‍मक विचार बाळगून आहेत, विनंतीनुसार तो कायदेशीर असला तरी ही. ह्या बाबतीत, कार्यक्रमाच्‍या योजकांनी पात्र स्त्रियांना ह्या सेवा मिळू शकतील अशा मार्गाचा अवलंब करण्‍याची गरज भासेल.

राष्‍ट्रीय सिध्‍दान्‍त आणि मानके स्‍थापित करणे
कायद्या-मान्‍य असलेल्‍या सीमेपर्यंत उत्तम गुणवत्ता गर्भपात सेवा उपलब्‍ध आहेत ह्याची खात्री करून घेण्‍यासाठी सिध्‍दान्‍त आणि मानके यांची संरचना करण्‍यात आली पाहिजे.
सार्वजनिक, खाजगी आणि गैर-सरकारी संस्था कडून उत्तम गुणवत्ता गर्भपातासाठी आवश्‍यक असलेले घटक पुरविण्‍यासाठी विशिष्‍ट संकेत ठरविण्‍यात आले पाहिजेत, ज्‍यामध्‍ये समाविष्‍ट आहेत

  • गर्भपात सेवांचे प्रकार आणि त्‍यांची उपलब्‍धता
  • आवश्‍यक उपकरणे, आपूर्ति औषधोपचार आणि सुविधा सक्षमता
  • संबंधित यंत्रणा
  • स्त्रियांच्‍या सूचित निर्णायकपणा, राजकीय स्‍वातंत्र्य, विश्‍वसनीयता आणि गोपनीयता/खाजगी, त्‍या बरोबरच किशोरवयीनांच्‍या विशेष गरजांकडे लक्ष पुरविणे

बलात्‍कारित स्त्रियांसाठी विशेष सोयी

गर्भपात सेवांचे प्रकार आणि त्‍यांची उपलब्‍धता/ते कोठे उपलब्‍ध होतील
प्राथमिक पातळीवर लवकर गर्भपात प्रदान करणा=या सेवांची स्‍थापना गर्भपात करू इच्छिणार्‍या स्त्रियांसाठी मोठी उपलब्धी ठरेल. प्राथमिक पातळीवर लवकर गर्भपात सेवा देण्‍यासाठी आरोग्‍य व्‍यावसायिकाचे प्रशिक्षण व साधन-सज्‍जा आणि अचूक शिफारस करणे हे अत्‍यंत महत्‍वाच्‍या निवेशांतील एक ठरेल. जेथे प्राथमिक पातळीवर गुणवत्ता प्रजोत्‍पादन सेवा देण्‍याची क्षमता नष्‍ट होते, तेथे प्राथमिकपासून उच्‍च पातळीपर्यंत प्रभावी संबंधित यंत्रणेची रचना करण्‍यासाठी एक लहानसे पाऊल पुरेसे आहे.

समुदाय पातळी
समुदाय आधारित आरोग्‍य कर्मचारी स्त्रियांना अवांछित गरोदरपण टाळण्‍यासाठी सूचना व संततीनियमन साधने पुरवितात आणि, त्‍यांना असुरक्षित गर्भपाताचे परिणाम सांगतात, ते फार महत्‍वाची भूमिका पार पाडत आहेत. त्‍यांनी स्त्रियांना सुरक्षित, कायदेशीर रीत्या मान्‍य आणि अविलंब गर्भपात कसा करावा, आणि असुरक्षित गर्भपाताच्‍या समस्‍या आणि योग्‍य ती काळजी कशी घ्‍यावी याबाबत सूचना देण्‍यास सक्षम असावे.

प्राथमिक आरोग्य सुविधा पातळी

प्राथमिक आरोग्‍य सुविधा केंद्रांमध्‍ये सामान्‍यपणे मूलभूत वैद्यकीय क्षमता आणि काही प्रशिक्षित आरोग्‍य कर्मचारी असतात. ह्या पातळीवर गर्भपाताच्‍या व्‍हॅक्‍यूम ऍस्पिरेशन आणि वैद्यकीय पध्‍दत ह्या दोन्‍ही पध्‍दतींचा वापर केला जावू शकतो, कारण यांमध्‍ये रात्रीचा मुक्‍काम करण्‍याची गरज नसते.

रा्ष्ट्रिय सिध्‍दान्‍त आणि मानके स्‍थापित करणे
परिचारीका, आया, आरोग्‍य सहाय्यक, आणि काही बाबतींत, फिजिशियन यांचा समावेश कर्मचारी वर्गात असतो. असे आरोग्‍य विषयक कर्मचारी ज्‍यांनी बायमॅन्‍युअल पेल्व्हिक परीक्षणाचे प्रशिक्षण घेतलेले आहे ज्यांनी गरोदरपण निश्चितीची लक्षणे आणि ट्रान्‍ससर्व्‍हायकल पध्‍दत जसे IUD इन्‍झर्शन करण्‍यात आपली क्षमता सिध्‍द केली आहे; अशांना व्‍हॅक्‍यूम ऍस्पिरेशनसाठी प्रशिक्षण दिले जावू शकते. जेथे गर्भपाताच्‍या वैद्यकीय पध्‍दती मान्‍य आणि उपलब्‍ध आहेत, असा कर्मचारी वर्ग औषधोपचार देवू आणि त्‍याचे निरीक्षण ही करू शकतो.

सामान्‍य जन्‍म आणि स्‍वाभाविक गर्भपाताच्‍या प्रबंधना बरोबर, शिफारस करण्‍यात आलेल्‍या व्‍यवस्‍था कुशल, उच्‍च पातळी संगोपन देण्‍यासाठी जागच्‍या जागी असायला हव्‍यात. गरज पडल्‍यास, ह्या कारणास्‍तव, आरोग्‍य केंद्राच्‍या वेळेनंतर आणि वेळेच्‍या दरम्‍यान प्रशिक्षित स्‍टाफ उपलब्‍ध असायला हवा.

जिल्‍हा इस्पितळ (प्रथम शिफारस) पातळी:
जिल्‍हा पातळी सुविधांनी बाह्यरेखांकित केलेल्‍या सर्व प्रा‍थमिक-संगोपन गर्भपात सेवा पुरवाव्‍यात, अगदी जेथे ह्या सेवा देखील निम्‍न संगोपन पातळीवर उपलब्‍ध आहेत, विशिष्‍ट घटकांची गरज गर्भपाताकरीता क्‍वचितच लागते आणि गर्भपात सेवा वितरणाचा नियमित भाग नसावा, विशेषत: जेथे सीमित साधने आहेत. उदा. लवकर गर्भपातासाठी अल्‍ट्रासाउंडसारख्‍या विशिष्‍ट उपकरणाचा नियमित वापर आरोग्‍य प्रकियेचा खर्च वाढवितो आणि लवकर गर्भपातासाठी ह्याची गरज लागत नाही.
प्राथमिक अवस्‍थेतील/लवकर गर्भपातासाठी जरनल अनेस्‍थेशियाचा वापर करू नये कारण त्‍यामुळे प्रक्रियेचे खर्च आणि धोका दोन्‍हींमध्‍ये वाढ होते. इस्पितळाने गर्भपाताच्‍या केसेस एखाद्या बाह्यरूग्‍ण पध्‍दती प्रमाणे हाताळाव्‍यात ज्‍यामुळे सुरक्षित न्‍यूनतम खर्चात स्‍त्रीला जास्‍त सुविधा मिळतात.

द्वितीय आणि तृतीय शिफारस करण्‍यात आलेली इस्पितळे
द्वितीय आणि तृतीय प्रकारच्‍या इस्पितळांमध्‍ये सर्व प्रकारच्‍या सोयी व त्‍यांचा उपयोग कय शकणारा स्‍टाफ असायला हवा जो कायद्यान्‍वये मान्‍य असलेले गर्भपात करण्‍यात निष्‍णात असावा आणि असुरक्षित गर्भपातासंबंधी समस्‍यांना तोंड देण्‍यास सक्षम असावा. गर्भपाताबद्दल घ्‍यावयाच्‍या काळजीसंबंधी इस्पितळांमध्‍ये प्रशिक्षण दिले जाणे हे विशेषत: फार महत्‍वाचे आहे ज्‍यायोगे क्लिनिकल प्रशिक्षण आवर्तनांमध्‍ये संबंधित आरोग्‍य व्‍यवसायिकांचे कौशल्‍य वाढत असल्‍याची निश्चिती होईल आणि गर्भपात सेवा प्रदान करण्‍याची क्षमता वाढेल.

 

स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम

अंतिम सुधारित : 7/11/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate