कोणत्याही जोडप्याला आपल्याला निरोगी मुले व्हावीत अशी इच्छा असतेच. पण काही वेळेला गरोदरपणामध्येच त्रास होऊन गर्भ पूर्ण वाढत नाही आणि बाईला गर्भपात होतो. कधीकधी मूल नको म्हणून सुद्धा गर्भपात करून घेतात. या दोन्ही म्हणून सुद्धा गर्भपात करून घेतात. या दोन्ही प्रकारच्या गर्भपातांबद्दलची जास्त माहिती आपण आता घेणार आहोत.
एकंदरीत गर्भपात कोणकोणत्या कारणांनी होतात आणि ते कसे टाळता येतील हे आपण बघूया. जर काळजी घेऊनही गर्भपाताची वेळ आलीच तर गर्भपाताची वेळ आलीच तर गर्भपातानंतरचा त्रास कमी कसा करता येईल त्यासाठी कोणते उपचार घ्यायचे याचीही आपण सविस्तर माहिती घेऊ.
आपण गर्भपात या विषयावरची एक गोष्ट आता बघणार आहतो. गोष्ट सांगून झाल्यावर या माहितीच्या आधारे काही प्रश्न विचारणार आहे.
सीमा तिच्या आईवडिलांची तिसरी मुलगी होती. तिला आणखी एक लहान बहीण आणि एक सर्वात लहान भाऊ होता. शेंडेफळ असल्याने अर्थातच तो सर्वांचाच लाडका होता. घरच्या गरीब परिस्थितीमुळे सीमालाही तिच्या मोठया दोन बहिणींप्रमाणे सातवीत असतांनाच शिक्षण बंद करावे लागले. मग सीमाने सुद्धा घरात आणि शेतीकामात आई- वडिलांना मदत करायला सुरुवात केली. तिच्या दोन्ही मोठया बहिणींची १६ व्या वर्षीच लग्न होऊन त्यांना मुलंही झाली होती. दोघींनाही एकेक मुलगा असल्याने त्यांच्या सासरची मंडळी खुश होती.
सीमा १५ वर्षांची झाली आणि तिच्या वडिलांची आर्थिक स्थिती आणखीनच ढासळली. लग्नासाठी पैसे आणायचे कुठून असा प्रश्न त्यांच्या समोर पडला. अशातच सीमासाठी मुलगा बघणेही एकीकडे चालू केले होते. शेवटी पैशांची फारशी अपेक्षा नसलेले एक स्थळ आले. मुलगाही बरा होता. मग त्याच्याशीच, म्हणजे देवरामशी, तिचे लग्न झाले. सीमाचे लग्न झाल्यानंतर लगेचच काही दिवसांनी तिच्या असे लक्षात आले की देवरामला मित्रांच्या नादाने बाहेर गेल्यावर एका बाईकडे जाण्याची सवय आहे. लग्नाला सहा सात महिने झाल्यावर एके दिवशी सीमाला मळमळायला लागले. तिची पाळी पण चुकली होतीलच. आता घरात नवीन छोटा पाहुणा येणार म्हणून सगळेजण आनंदात होते. अशातच दोन महिन्यांनी अचानक सीमाच्या अंगावरून जायला लागले. ती खूप घाबरली. डॉक्टरांकडे गेल्यावर तिला समजले की तिचा गर्भ पडला आहे. डॉक्टरांनी तिचे क्युरेटिंग केले व तिला काही दिवसांनी परत यायला सांगितले. पण नंतर सीमा कधीच तपासणीसाठी गेली नाही. सुरुवातीला आपला गर्भ पडला यांचे सीमाला वाईट वाटले पण काही दिवसांनी ती ठीक झाली.
सीमाचा नवरा तसा चांगला होता पण तिने जर कधी बाहेरगावी जाऊन काय करतो याची चौकशी करण्याचा प्रयत्न केला तर तो फारच वाईट वागत असे. सीमाला मग फार वाईट वाटायचे. पण ती बिचारी काय करू शकत होती ? ५-६ महिन्यांनी परत सीमाला दिवस गेले. यावेळी देखील मागल्यावेळेसारखेच होणार की काय याची तिला भीती वाटत होती. पण नऊ महिने पूर्ण भरून तिला एक छानशी मुलगी झाली.सर्वजण आनंदित झाले. पण पहिल्या वेळेला मुलगा झाला नाही म्हणून आत कुठेतरी बोच होतीच.
एक दीड वर्षांनी सीमाला परत दिवस गेले. यावेळी मात्र तिच्या घरच्यांना मुलगाच हवा असा हट्ट होता. म्हणूनच त्यांच्या दबावाखाली ती शेवटी गर्भजलपरीक्षेसाठी तयार झाली. या परीक्षेमुळे मुलगा की मुलगी हे आधीच समजणार होते. (सोनोग्राफीद्वारेही ही परिक्षा करतात) तिच्या नवऱ्याला, देवरामला, यावेळी मुलगाच हवा होता. तो म्हणाला जर मुलगा असेल तरच ठेवायचा. मुलगी असेल तर पाडून घेऊ. खरतर तपासणीसाठीसुद्धा सीमाच्या मनाची तयारी नव्हती. पण बिचारी सीमा नाही सुद्धा म्हणू शकत नव्हती. तपासणी झाली आणि दुर्दैवाने मुलगीच होती आणि सीमापुढे गर्भपाताशिवाय पर्यायच शिल्लक नव्हता. गर्भपात झाल्यावर ही आईसारखाच ही पण पोरींची माळ काढणार असे टोमणेही रोजच ऐकायला मिळू लागले.
काही दिवसातच ती पुन्हा गरोदर राहिली. पण यावेळीही ते मूल पाडले. आता तिचे पूर्ण आयुष्यच बदलले. आता तिच्यावर मुलासाठी सगळीकडूनच दबाव वाढायला लागला. दोन चार महिन्यातच ती पुन्हा गरोदर राहिली. आता याही वेळेस मुलगा की मुलगी ते पाहू असा विचार घरच्यांनी केला. आता मात्र सीमा मनातून खूपच हादरून गेली. मुलगा नसेल तर गर्भपाताला सामोरे जायचे का ? आणि जर मुलगीच होणार असेल तर नवरा दुसरे लग्न तर करणार नाही ? किंवा आपल्याला टाकून तर देणार नाही ? या आणि अशा विचारांनी सीमा अगदी थकून जायची. कसेही करून मुलगा हवाच या हट्टाला सीमाकडे उत्तर नव्हते.
१. सीमाचे गर्भपात होऊ नये म्हणून सीमा आणि तिच्या घरच्यांनी कोणते उपाय करायला पाहिजे होते ?
२. वारंवार होणाऱ्या गर्भपाताचे सीमाच्या आरोग्यावर काय परिणाम झाले असती?
३. तिच्या मानसिक स्थितीवर काय परिणाम झाला असेल ?
४. सीमाचे गर्भपात रोखण्यासाठी देवराम काय करू शकला असता ?
५. सीमाचे गर्भपात होऊ नयेत म्हणून सीमा आणि तिच्या घरच्यांनी कोणते उपाय करायला पाहिजे होते ?
स्त्रोत : गर्भपात, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 2/15/2020
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...