অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गर्भपातासाठी सल्ला केव्हा?

  1. डॉक्टरांनी वैद्यकीय गर्भपाताचा सल्ला दिला आहे आणि दुसऱ्या कोणीतरी वेगळाच सल्ला दिला तर अशा वेळी काय करावे ते समजत नसेल तर अशा वेळी त्या जोडप्याला मार्गदर्शनाची गरज आहे.
  2. आपले मुल अपंग होईल की काय याचे जोडप्यावर टेन्शन आले असेल आणि त्यांच्या मनात काही भीती असेल तर अशा वेळी त्यांना सल्ला आणि मार्गदर्शनाची गरज असते.
  3. एखादया जोडप्याला मूल हवे असतांना जर सारखे सारखे गर्भपात होत असतील तर त्या जोडप्याला सल्ला मार्गदर्शनाची गरज आहे.

आपोआप किंवा नैसर्गिक होणारे गर्भपात रोखण्यासाठीच्या गोष्टी

जर अगोदरच्या गरोदरपणात बाईला कोणताही त्रास झाला असेल किंवा अगोदर एखादा गर्भपात झाला असेल तर नंतरच्या गरोदरपणात खालील काळजी घ्यायलाच हवी –

  • गरोदर स्त्रीची नियमित वैद्यकीय तपासणी व्हायलाच हवी.
  • तिच्या रक्ताची तपासणी व्हायला हवी.
  • तिला पुरेशी विश्रांती मिळायला हवी.
  • डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित सोनोग्राफी व्हायला हवी.
  • गरोदरपणात बाईने जड कष्टाची कामे शक्यतो करू नयेत.
  • गरोदरपणात बाईने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नये.
  • गरोदर राहिल्यानंतर पहिल्या तीन महिन्यात शक्यतो लांबचा प्रवास करू नये.
  • जंतूसंसर्ग होऊ नये म्हणून तिने आपली जनेन्द्रिये स्वच्छ ठेवायला हवीत तसेच आतले कपडे स्वच्छ वापरावेत.

मूल नको म्हणून करण्यात येणाऱ्या गर्भपातालाच वैद्यकीय गर्भपात असेही म्हणतात.

मूल नको असण्याची वेगवेगळी करणेही आपण पहिली. मात्र आपण एक लक्षात ठेवायला हवे की गर्भपात हा शक्यतो टाळलेलाच बरा! पण काही कारणाने गर्भपाताची वेळ आलीच तर आपण नीट काळजी घ्यायला हवी.

 

स्त्रोत : गर्भपात, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट

अंतिम सुधारित : 1/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate