राजपुतांचा इतिहास
राजपुतांचा इतिहास : मध्ययुगात राजस्थान आणि त्याच्या आसपासच्या भागात वर्चस्व प्रस्थापित करणारे बहुविध राजवंश. राजस्थानात उदयास आलेल्या राजवंशांना राजपुत्र अशी संज्ञा आहे. राजपूत हा तिचा अपभ्रंश होय. संस्कृतातील ‘राजन्य’ शब्दासारखाच राजपूत याचा क्षत्रिय या अर्थी उपयोग होतो.