मेलबर्न
मेलबर्न: ऑस्ट्रेलियातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आणि व्हिक्टोरिया राज्याची राजधानी. या शहराला जोडून अनेक उपनगरे वसली आहेत. मुख्य शहर आग्नेय किनाऱ्यावर यॅरा नदीमुखाशी फिलिप उपसागराच्या टोकाला वसले आहे. महानगरीय मेलबर्नचे क्षेत्रफळ ५४९ चौ. किमी. असून त्याची लोकसंख्या २८,८८,४०० (१९८४) होती.