ग्रीस
ग्रीस : (हेलास किंवा एलास). यूरोपच्या बाल्कन द्वीपकल्पातील दक्षिणेचा प्राचीन देश; क्षेत्रफळ १,३१,९८६ चौ.किमी. लोकसंख्या ८७,६८,६४१ (१९७१). विस्तार ३४० ४८’ ०२’’ उ. ते ४१० ४४’ ५९’’ उ. आणि १९० २२’ ४१’’ पू. ते २९० ३८’ २७’’ पू. यादरम्यान. याच्या दक्षिणेस भूमध्य, पूर्वेस इजीअन व पश्चिमेस आयोनियन समुद्र असून वायव्येस अल्बेनिया, उत्तरेस यूगोस्लाव्हिया व बल्गेरिया आणि ईशान्येस व पूर्वेस तुर्कस्तान आहे.