युआन-शृ-खाय्
युआन-शृ-खाय् : ( ? १८५९−६ जून १९१६). प्रजासत्ताक चीनचा पहिला अध्यक्ष (१९१२ −१६), मुत्सद्दी व लष्करी नेता. हूनान् प्रांतातील श्यांग छंग् येथे एका जमीनदार कुटुंबात जन्म. विद्यार्थिदशेत त्याचा ओढा अभ्यासापेक्षा इतर अवांतर उलाढाली करण्याकडे जास्त होता; तथापि त्याच्यात धूर्तपणा आणि संघटक वृत्ती होती.