बॅलॅनोग्लॉसस
बॅलॅनोग्लॉसस : हेमिकॉर्डेटा उपसंघाच्या एंटरोन्यूस्टा गणातील प्राण्यांच्या एक वंश. हे कृमीसारखे सागरी प्राणी सर्व समुद्रांच्या तळावर आढळतात. फक्त अंटार्क्टिक महासागरात ते आढळत नाहीत. या प्राण्याचे शरीर लांब, सडपातळ, दंडगोलाकार असून जातीपरत्वे त्याची लांबी २.५४ मिमी. ते २ मी. असते.