मंगळवेढे
मंगळवेढे : सोलापूर जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १६,८०२ (१९८१). हे पंढरपूरच्या आग्नेयीस सु. २५ किमी. व सोलापूरच्या नैर्ऋत्येस ६७ किमी. आहे. बहमनीपूर्व काळात मंगल नावाच्या हिंदू राजाने याची स्थापना करून ती आपली राजधानी केली. त्यावरून या ठिकाणाला मंगळवेढे हे नाव पडले असावे.