वॉटरबरी
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी कनेक्टिकट राज्यातील एक औद्योगिक शहर. लोकसंख्या १,०८,९६१ (१९९०). न्यू हेवन परगण्यातील हे शहर न्यू हेवनच्या वायव्येस सु. ३० किमी. वर नॉगॅटक व मॅड ह्या नद्यांच्या संगमावर वसले आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने कनेक्टिकट राज्यातील हार्टफर्ड, न्यू हेवन व ब्रिजपोर्ट या शहरांनंतर वॉटरबरीचा चौथा क्रमांक लागतो. शहराच्या पूर्व-पश्चिमेस ग्रॅनाइट दगडांच्या टेकड्या आहेत. शहरातून न्यू हेवन व हार्टफर्ड या शहरांकडे लोहमार्ग जातात.