विपाशा
विपाशा : भारतातील बिआस नदीचे प्राचीन नाव. ग्रीक लोक या नदीला हायफॅसिस, हिपानिस किंवा बिपासिस म्हणत. यास्क (तौलनिक भाषाशास्त्राचा आद्य पंडित) याने लिहिलेल्या प्राचीन शब्दकोशावरील निरुक्त या भाष्यात हिचा ‘उरुंजिरा’ या नावाने उल्लेख आढळतो; तर वेदोत्तर वाङ्मयात हिचा ‘विपाशा’ या नावाने उल्लेख आला आहे.