फ्रेंच राज्यक्रांति
फ्रेंच राज्यक्रांति : इ.स. १७८९ मध्ये फ्रान्समध्ये झालेली ही राज्यक्रांती म्हणजे अठराव्या शतकातीलजगाच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची घटना होय. या क्रांतीमुळे निर्माण झालेल्या विचारप्रवाहांचायुरोपीय देशांवर निरनिराळ्या प्रमाणात प्रभाव पडून युरापची सरंजामशाही समाजरचना पूर्ण नष्ट झालीआणि भांडवलशाही समाजरचना औद्योगिक क्रांतीच्या पायावर उभारली जाऊ लागली; म्हणून आधुनिकयूरोपची उभारणी फ्रेंच राज्यक्रांतीपासून झाली असे मानतात.