অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बायोगॅस उभारणीबाबत माहिती द्यावी

बायोगॅस उभारणीबाबत माहिती द्यावी

बायोगॅसचे प्रकार

बांधकामाच्या रचनेवरून तरंगती गॅस टाकी संयंत्र आणि स्थिर घुमट संयंत्र असे बायोगॅसचे प्रकार आहेत.
तरंगत्या टाकीचा बायोगॅस चांगला चालतो; पण त्यासाठी बराच खर्च येतो. संयंत्रावर तरंगणारी लोखंडी टाकी गंजल्यास किंवा काही कारणांनी निकामी झाल्यास ती दुरुस्त करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी बराच खर्च येतो. सध्या महाराष्ट्रात स्थिर घुमट संयंत्र प्रकारातील दीनबंधू बायोगॅस संयंत्र बांधली जातात. बायोगॅस संयंत्र बांधणीसाठी लागणारे साहित्य हे उत्तम दर्जाचे असावे. शिवाय बांधणारा गवंडी कुशल कारागीर असावा. बायोगॅसमुळे एलपीजी व इतर पारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर कमी होतो. सेंद्रिय खतांची उपलब्धता वाढते. बायोगॅस संयंत्र शौचालयास जोडल्यास स्वच्छता राखण्यास मदत होते. 
बायोगॅस बांधण्यासाठी घराजवळची उंच, मोकळी, कोरडी व बराच वेळ सूर्यप्रकाश मिळणारी जागा निवडावी. जागा शक्‍यतो गोठ्याजवळ किंवा घराजवळ असावी. जमिनीखालील पाण्याची पातळी दोन मीटरपेक्षा खाली असावी. निवडलेल्या जागेजवळ पाण्याची विहीर व हातपंप नसावा, झाडे नसावीत. जनावरांची संख्या व कुटुंबातील व्यक्तींची संख्या विचारात घेऊन बायोगॅस संयंत्राचे आकारमान ठरवावे.


बायोगॅस संयंत्राची निगा

1) बायोगॅसच्या आकारानुसार (घ. मी.) प्रत्येक दिवशी लागणारे शेण (कि. ग्रॅ.) वापरावे. शेण व पाणी सम प्रमाणात घेऊन मिसळावे. त्यातून गोटे, रेती काढून संयंत्रामध्ये सोडावे. थंडीच्या दिवसांत शक्‍यतो कोमट पाण्याचा वापर करावा. 
2) संयंत्राच्या प्रवेश कक्षावर व निकास कक्षावर उघडझाप करणारी झाकणे बसवावीत, जेणेकरून त्यातून माणूस, प्राणी इत्यादींचा आत प्रवेश होणार नाही याची काळजी घ्यावी. 
3) संयंत्राच्या निकास कक्षातून पाचक यंत्रामधील द्रावण हलवावे, जेणेकरून शेणावर जमा होणारी साय ढवळली जाईल. 
4) घुमटाला नेहमी मातीने झाकून ठेवावे. 
5) संडास जोडला असल्यास संडास स्वच्छ करताना रासायनिक पदार्थांचा वापर करू नका. शक्‍यतो राखेचा वापर करावा. 
6) पाइपलाइनमध्ये पाणी साचू नये म्हणून पाणी काढण्याच्या नळीतून नियमित पाणी काढावे. 
7) दररोज रात्री शेगडी वापरात नसेल तर तेव्हा गेट व्हॉल्व्ह बंद करा. 
8) संयंत्राच्या निकास कक्षातून सुलभपणे खत बाहेर पडत नसल्यास जितके शेणपाणी प्रवेश कक्षातून आत घातले जाते, तितके खत निकास कक्षातून बादलीच्या साह्याने काढावे. 
9) खताचा खड्डा दोन ते तीन फुटांपेक्षा जास्त खोल खोदू नये. ओल्या खतामध्ये कोणी पडणार नाही, याची काळजी घ्यावी. त्यासाठी खड्ड्याभोवती कुंपण करावे. 

प्रा. प्रकाश बंडगर - 9764410633 
अपारंपरिक ऊर्जा स्रोत विभाग, 
पद्‌मश्री डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी 
व तंत्रज्ञान महाविद्यालय, तळसंदे, जि. कोल्हापूर

- रामगोंडा पाटील, जनवाड, जि.बेळगाव

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate