विद्युतऊर्जेचा म्हणजेच विजेचा वापर कमी करा, खर्च कमी करा.
आज भारतामध्ये 80% वीज सरळसरळ वाया जाते - कारण आपण वापरतो ते दिवे तसेच इतर उपकरणे कार्यक्षम नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात वीजवापर करतात.
कॉम्पॅक्ट फ्लूरोसंट लाइट ऊर्फ सीएफ्एल प्रकारचे दिवे आपला विजेवरील खर्च वाचवतात. सीएफ्एल प्रकारचा दिवा नेहमीच्या दिव्याच्या पाचपट जास्त प्रकाश देतो.
पारंपारिक पद्धतीच्या दिव्याच्या तुलनेमध्ये सीएफ्एल दिव्याचे आयुष्य आठपटींनी जास्त असते.
फ्लूरोसंट ट्यूबलाइट व सीएफ्एलना वीज तर कमी लागतेच शिवाय ते जास्त गरम होत नाहीत.
उदाहरणार्थ, 60 वॅटच्या जुन्या प्रकारच्या दिव्याच्या जागी आपण 15 वॅटचा सीएफ्एल बसवू शकता. त्यामुळे दर तासाला होणारा विजेचा खप 45 वॅट्सनी कमी होईल म्हणजेच दर महिन्याला आपण 11 युनिट वीज वाचवू शकाल व आपला खर्च कमी होईल.
सीएफ्एल कमीतकमी 5 ते 8 महिने चालतातच.
आपण अशारीतीने ऊर्जेची व विजेची बचत केलीत तर आजही वीज न मिळालेल्या अनेक खेड्यांमध्ये विजेचा प्रकाश पोहोचवण्यासाठी आपण मोलाची मदत करू शकाल.
तपशील | 60 वॅटचा दिवा | 15 वॅटचा सीएफ्एल | बचत |
---|---|---|---|
दिव्याची किंमत | 10/- रु | 116/- रु | --- |
वॅटेज | 60/- रु | 15/- रु | 45 |
वापर, तासांमध्ये | 6 महिने, 1000 तास | 4 वर्षे, 8000 तास | --- |
दर वर्षीचा वीजवापर | 115 | 36 | 108 |
दर वर्षीचा प्रतियुनिट खर्च | 396/- | 99/- | 297 /- |
रु. 2.75/- प्रमाणे | |||
चार वर्षांसाठीचा एकूण खर्च | 1624 /- | 512 /- | 1112 /- |
अंतिम सुधारित : 1/30/2020
पावसाच्या पाण्याची साठवण म्हणजे घरांच्या छपरांवर प...
पाणी तापवण्याच्या सौर हीटर्समुळे वीजेची तसेच पैशां...
एलपीजी हे स्वयंपाकासाठी एक अत्यंत सुरक्षित, स्वस्त...
घराभोवती सहजगत्या उपलब्ध असलेल्या साध्या वस्तूंच्य...