संमती व्यवस्थापन -उद्योगांचे श्रेणीकरण (लाल/नारिंगी/हिरवा)
"लाल" श्रेणी अंतर्गत येणा-या उद्योगांची सूची
अ. पर्यावरण व वने मंत्रालय, भारत सरकार यांनी निवडलेले अति प्रदूषण करणारे तसेच केन्द्रीय कार्यवाही योजने अंतर्गत येणारे उद्योग, जसे:ई "लाल" श्रेणी अंतर्गत येणा-या उद्योगांची सूची
- मद्यार्कासह शुद्धकरण उद्योग
- साखर (खांडसरी वगळता)
- कृत्रिम खते (मुळ) (सूत्रीकरण वगळता)
- लगदा व पेपर (लगद्यासह किंवा लगदा वगळता पेपर उत्पादन)
- मुळ औषधी
- औषधीउत्पादन (सूत्रीकरण वगळता)
- रंगद्रव्ये किंवा डाय-इंटरमेडिएटस
- जंतुनाशके (तांत्रिक) (सूत्रीकरण वगळता)
- तेल शुद्धीकरण कारखाने (खनिज तेल किंवा पेट्रोल शुद्धीकरण)
- कातडे उद्योग
- पेट्रोरासायनिक (केवळ कच्च्या मालाच्या रुपात उपयोग न करता उत्पादन करणे)
- सिमेंट
- औष्णिक विद्यृत केन्द्र
- लोखंड व पोलाद (अशुद्ध धातू/भंगार/एकीकृत पोलाद संयंत्रापासून प्रक्रियेसहित)
- जस्त वितळविणे
- तांवे वितळविणे
- अल्युमिनियम वितळविणे
- शिसे प्रक्रिया उद्योग व बॅटरी रिकंडीशनिंग आणि उत्पादन (शिसे वितळविण्यासह)
ब. खालील उत्पादनांची निर्मिती किंवा त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग
- टायर किंवा ट्युब (व्युलकॅनायजेशन/रिट्रीटींग/मोल्डींग वगळता)
- सिंथेटिक रबर
- काच किंवा फायबर ग्लास उत्पादन आणि प्रक्रिया
- ईलेक्ट्रोड्स आणि ग्रॅफिट ब्लॉक, क्रियाशील कार्बन, कार्बन ब्लॅक ईत्यादी सह औद्योगिक कार्बन
- पेन्ट आणि वार्निशिंग (ब्लेंडिंग व मिक्सिंग वगळता)
- पीग्मेंट आणि इंटरमेडीएट्स
- सिंथेटिक रेसिंस
- संग्रहण, स्थानांतरण व प्रक्रियेसह पेट्रोलियम उत्पादने
- ल्युब्रिकेटिंग ऑईल्स, ग्रीस किंवा पेट्रोलियमवर आधारीत उत्पादने
- रेयॉन, टायर कॉर्ड, पॉलिएस्टर फिलामेंट यार्न यासह सिंथेटिक फायबर्स
- प्रोफिलॅक्टीक्स व लॅटेक्स सह सर्जिकल व वैद्यकिय उत्पादने
- सिंथेटिक डिटर्जेंट व साबन
- फोटोग्राफिक फिल्म व रसायने
- सल्फुरीक ऍसीड, नायट्रीक ऍसीड, फॉस्फोरीक ऍसीड ईत्यादी सारख्या ऍसीडच्या उत्पादनासह केमिकल, पेट्रोकेमिकल व ईलेक्ट्रोकेमिकल कारखाने
- औद्योगिक किंवा अ-सेंद्रिय वायु
- क्लोरॅट्स, पर्चीओरॅट्स आणि पेरॉक्सीडस
- डिंक व जिलेटीन
- स्कोरींग, ब्लिचिंग, डाईंग, प्रिंटींग किंवा इतर धुळ/कचरा निर्माण करणारी प्रक्रियेसह तंतु आणि वस्त्र प्रक्रिया
- सॉल्हेंट एक्स्ट्रॅक्टेड ऑईल, हायड्राजनेटेड ऑईल या सह वनस्पती तेल
- पिक्लिंग, सर्फेस कोटिंग, पेन्ट बॅकिंग, पेन्ट स्ट्रीपिंग, हिट ट्रिटमेंट, फॉस्फेटिंग किंवा फिनिशिंग सारख्या मेटल ट्रिटमेंट किंवा प्रक्रियेसह उद्योग किंवा प्रक्रिया
- ईलेक्ट्रोप्लॅटिंग ऑपरेशन करणारे उद्योग किंवा प्रक्रिया
- ऍसबेस्टॉस किंवा ऍसबेस्टॉस आधारीत उद्योग
- कत्तलखाने किंवा मांस प्रक्रिया उद्योग
- यीस्ट, बिअर ईत्यादींचे उत्पादन करणा-या उद्योगासह मद्यार्क उद्योग
- ब्लॉस्ट फर्नेस, ओपन हर्थ फर्नेस, इंडक्शन फर्नेस किंवा आर्क फर्नेस ईत्यादी उपकरणांचा उपयोग किंवा हिट ट्रिटमेंट, ऍसीड पिक्लींग, रोलिंग अथवा गॅल्वानायझिंग ई. सारखे प्रचालन किंवा प्रक्रियांचा समावेश आहे अशा कोक संयंत्रासह पोलाद व पोलाद उत्पादन
- इन्सीनेरॅशन प्लॅन्ट
- विद्यृत निर्मिती केन्द्र (डी.जी. संच वगळता)
- चुना उत्पादन
- सिगारेट व तंबाखु प्रक्रियेचा समावेश असलेले तंबाखु उद्योग.
- ओर सिंटेरिंग, पॅल्लेटीझाशन ई सारखे कोळसा/खनिज प्रक्रिया उद्योग .
- फॉस्फेट खडक प्रक्रिया उद्योग.
- कोक तयार करणे, कोल लिक्वेफॅक्शन, कोल्टर डिस्टीलेशन किंवा फ्युएल गॅस तयार करणे.
- फॉस्फोरस खडक प्रक्रिया संयंत्र.
- डिटोनेटर्स ईत्यादीचा समावेश असलेले स्फोटक उद्योग.
- फटाके.
- क्लोरिनेटेड हायड्रोकार्बनचा समावेश असलेल्या प्रक्रिया.
- क्लोरीन, फ्ल्युओरीन, ब्रोमाईन, आयोडीनआणि त्यांचे घटक.
- हायड्रोसायनीक ऍसीड आणि त्याचे साधीत रुपे.
- दुग्ध प्रक्रिया व डेअरी उत्पादने (एकीकृत प्रकल्प).
- फाउंड्री ऑपरेशन असलेले उद्योग व प्रक्रिया.
- अल्कहोलच्या ब्लेंडिंग किंवा शुद्धीकरणाद्वारे पिण्यास योग्य अल्कहोल (आयएमएफएल).
"नारिंगी" श्रेणी अंतर्गत येणा-या उद्योगांची सूची
अ पर्यावरण व वने मंत्रालय, भारत सरकार यांनी "पिवळ्या" श्रेणी अंतर्गत निवडलेले उद्योग
- शीट ग्लास आणि फोटोफ्रेमिंग पासून आरश्यांचे उत्पादन करणारे उद्योग
- कापसापासून सूत कातणे व विणकाम करणे
- ऑटोमोबाइल सर्विसिंग व रिपेअर स्टेशन
- हॉटेल व रेस्टॉरन्ट
- पीठाच्या गीरण्या (घरगुती आट्याच्या चक्क्या वगळता)
- माल्टेड फुड
- फळे व पालेभाज्या प्रक्रियेसह अन्न
- कॉफी बिन्सचे मद्यार्क
- कॉफीवरील प्रक्रिया, इन्स्टंट चहा/कॉफी
- विना अल्कहोलची पेय (सॉफ ड्रिंक्स)
- सुवासिक द्रव्य किंवा औद्योगिक सुगंधी द्रव्य
- अन्नात मिसळले जाणारे पदार्थ, पौष्टिक किंवा चवी
- मासे प्रक्रिया
- सेंद्रीय पौष्टिक पदार्थ
- धुळ/धुर निर्माण करण्याची प्रक्रिया नसलेले सर्जिकल व वैद्यकिय उत्पादने
- प्रयोगशाळा-सामग्री
- वायर ड्रॉविंग (कोल्ड प्रोसेस) एन्ड बेलिंग स्ट्रॅप्स
- दगड तोडणाऱ्या खाणी
- शुद्धीकरण प्रक्रियेचा समावेश असलेली प्रयोगशाळा रसायने
- टायर व ट्युबचे व्युल्कॅनीझेशन, रिट्रेडिंग मोल्डींग
- जंतुनाशक/किटनाशक/बुरसीनाशक कृषीरसायनीक संयोगीकरण
- एनपीके फर्टिलायजर्स/ग्रॅन्युलॅशन
- औषधीनिर्माण संयोगीकरण
- खांडसरी साखर
"हिरव्या" श्रेणी अंतर्गत येणाऱ्या उद्योगांची सूची
क . महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सामान्यकृत नाहरकत प्रमाणपत्र/संमती देण्यासाठी
पर्यावरण विभाग, महाराष्ट्र सरकारच्या जीआर नं.ईएनव्ही/1088/672/सीआर-185 डेस्क-1 दिनांक 18/3/1992 च्या अनुसूची अंतर्गत सूचविलेल्या श्रेणीतील लघु, गृह/ग्राम उद्योग
ख "लाल" किंवा "पिवळ्या" श्रेणीमध्ये समावेश नसलेले सर्व प्रक्रिया उद्योग. निर्मिती प्रक्रिये मध्ये धुळ/धुर निर्माण करीत नाहीत असे उद्योग. उदाहरणांची सूची दिलेली आहे.
- वापरलेल्या वाळुचा हैड्रालिक डिसचार्ज द्वारे वॅस्टींग
- पीठाच्या गीरण्या
- तांदूळाच्या गीरण्या
- कडधान्याची प्रक्रिया
- खनिजीकृत पाणी
- दाळ गीरण्या
- बेकरी उत्पादने, बिस्कीट व कन्फेक्शनरी
- ग्राउंडनट डिकोर्टीकॅटिंग (ड्राय)
- सुपारी व मसाला चक्की
- शीतकरण संयंत्रे व शीतगृहे
- आइस क्रिम व आइस क्रिम बनविणे
- टेलरिंग व गारमेंट तयार करणे
- कॉटन व वुलन होजायरी
- परिधान तयार करणे
- हातमागावर विणकाम
- शूलेस उत्पादन करणे
- सोने व चांदीचे धागे जरीकाम करणे
- सोने व चांदीवर सोनाराचे काम करणे
- पादत्राणे व चामड्याची उत्पादने टॅनिंग व हाईड प्रक्रिया वगळून
- संगीत उपकरणांचे उत्पादन करणे
- क्रिडा साहित्य
- बांबू व केनची उत्पादने (केवळ ड्राय ऑपरेशन)
- कार्डबोर्ड किंवा कोरोगेटेड बॉक्स व पेपर उत्पादने (पेपर किंवा लगदा उत्पादन वगळता)
- इन्सुलेशन व अन्य कोटेड पेपर (पेपर किंवा लगदा उत्पादन वगळता)
- वैज्ञानिक व गणितीय उपकरणे
- फर्निचर (लाकडी व स्टील)
- घरगुती विद्यृत उपकरणांची (असेम्ब्ली) जुळवणी करणे.
- रेडीओ (असेम्ब्लींग) जुळवणी करणे.
- फाउंटेन पेन
- इक्ट्रुशन/मोल्डींग द्वारे पॉलिथीन, प्लॅस्टीक व पीव्हीसी वस्तू
- दोरी (कापूस किंवा प्लॅस्टीक)
- चटई विणणे
- एअर कुलर्स, कंडीश्नर्सची जुळवणी करणे
- सायकल, लहान मुलांची सायकल किंवा अन्य लहान नॉन-मोटोराइज्ड वाहनांची जुळवणी करणे.
- ईलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची जुळवणी करणे.
- खेळणी
- वॉटर सॉफ्टेनिंग व डीमिनरलीज्ड संयंत्र
- पेन्ट (केवळ मिश्रण प्रक्रिये द्वारे)
- मेणबत्ती
- सुतारकाम (सॉ मिल्स वगळून)
- ऑइल जिनिंग / एक्पेलिंग (हाड्रोजेनॅशन किंवा रिफिलिंग नाही)
- जॉबींग व मशीनिंग
- स्टील पेट्या व सुटकेसचे उत्पादन
- पेपर टाचण्या व यु क्लीप्स
- प्रिंटींग साठी ब्लॉक तयार करणे.
- ऑप्टीकल फ्रेम्स
- पॉवरलुम्स/ हातमाग (डाईंग व ब्लिचिंग शिवाय)
- प्रिंटींग प्रेस
- गारमेंट शिलाई व टेलरिंग
- थर्मोमिटर तयार करणे
- पादत्राणे (रबर)
- प्लॅस्टीक प्रक्रियाकृत उत्पादने
- वैद्यकिय व सर्जिकल उपकरणे.
- ईलेक्ट्रॉनिक्स व ईलेक्ट्रीकल उत्पादने
- रबर वस्तुंची उत्पादने
सूचना
1. वर नमूद केलेल्या 3 श्रेणी पैकी कोणत्याही श्रेणीमध्ये न येणाऱ्या उद्योगांच्या श्रेणी बाबत मुख्यालय स्तरावरील एपीएई/डब्ल्युपीएई/पीएसओ चा समावेश असलेल्या समिती द्वारे निर्णय घेतला जाईल.
2. "हिरव्या" श्रेणी मधील "क" व "ख" अंतर्गत मोडणाऱ्या उद्योगांच्या संदर्भात कोणते ही डुप्लीकेशन/रिपीटेशन होत असल्यास, तो उद्योग कोणतेही संमती शुल्क न आकारता कायमची सामान्यकृत संमती मिळविण्यासाठी पात्र असलेल्या श्रेणी "क" मध्ये मोडत असल्याचे समजल्या जाईल.
स्त्रोत : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन