অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हे-बॉक्स (Hay Box)

इंधन बचतीचे कमी खर्चाचे तंत्रज्ञान

हे-बॉक्स म्हणजे इंधन बचत करणारे कमी खर्चाचे एक साधन आहे. मदुराई येथील होम सायन्स एक्स्टेंशन, होम सायन्स कॉलेज अॅन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, टीएनएयू ह्यांनी हे बॉक्सचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. हे साधन एक ऊष्णता-अवरोधित (थर्मली इन्शुलेटेड) मोठे खोके असल्याने खोक्याच्या आतील ऊष्णता बाहेर जाऊ शकत नाही आणि ह्यामुळे अन्न शिजवण्यासाठी अथवा वस्तू गरम करण्यासाठी आवश्यक ऊष्णता साठवून, पुरवून वापरली जाऊ शकते. हे बॉक्समध्ये शेतीमधून मिळणारा स्थानिकरित्या उपलब्ध असलेला कचरा, टरफले, गवत इ. चा वापर केला जातो.

हे बॉक्स तयार करणे
he box

१. आवश्यक साधनसामग्री

  • पुढील मापाचे खोके - लांबी ४५ सेंमी, रुंदी ४५ सेंमी, उंची सेंमी (हे खोके जाड कागदाचे बनवलेले असू शकते. बांबूची टोपली अथवा सिमेंटचा छोटा टँकदेखील चालेल.)
  • ऊष्णतारोधक (इन्शुलेटिंग) पदार्थ - गवत / खाचरातील टरफले / लाकडाच्या झिलप्या / भुस्सा
  • तागाचे पोते

२. बॉक्सची जोडणी

जाड कागदाचे खोके घ्या.  खोक्यामध्ये गवत भरा,  साधारणपणे ह्या खोक्याच्याच आकारची तागाची पिशवीदेखील गवताने भरा

अन्न शिजवण्याची पद्धत (उदाहरणार्थ- तांदूळ)

धुतलेला तांदूळ एका भांड्यामध्ये घ्या. त्याच भांड्यामध्ये तांदुळाच्या दुप्पट प्रमाणात पाणी भरा. हे भांडे १० मिनिटे विस्तवावर ठेवा. हे बॉक्सच्या मध्यभागी भांड्यासाठी जागा करा.ह्या जागेवर विस्तवातून काढलेले भांडे ठेवा त्यावर गवताने भरलेली पिशवी ठेवा.४५ मिनिटांमध्ये तांदूळ स्वतःच्याच ऊष्णतेमुळे शिजतात.(व ते ५-६ तास गरम राहू शकतात)

खर्च व फायद्याचे विश्लेषण

 

 

तपशीलगॅस-स्टोवहे-बॉक्स
शिजवण्यासाठीचा वेळ दरदिवशी २ तास दरदिवशी १ तास
इंधनाचा खर्च दरदिवशी ५/- रु दरदिवशी २.५/- रु

 

अशारीतीने इंधन व इंधनाचा खर्च ह्यामध्ये सुमारे ५०% बचत होऊ शकते.

देखभाल

हे- बॉक्सच्या देखभालीचा खर्च फारसा येत नाही. 
फक्त खालील बाबींकडे लक्ष द्यावे लागते

  • गवत स्वच्छ राखणे, अन्नपदार्थ अथवा काजळी इ. सोबत त्याचा संपर्क होऊ न देणे
  • दर पंधरा दिवसांनी गवत सूर्यप्रकाशात १-२ तास सुकवणे.

फायदे

  • सुरक्षित व सोपी हाताळणी
  • किफायती व सुलभ देखभाल
  • शिजण्याचा वेळ कमीतकमी ह्या पद्धतीमुळे उकळणे व अन्नपदार्थ शिजवणे ह्या क्रियांसाठी कमीतकमी  वेळ लागतो.
  • तापमान कायम राखणे हे बॉक्स वापरून शिजवलेल्या अन्नाचे तापमान ६ तास कायम राखणे शक्य असते. हे बॉक्समध्ये शिजवून ५ तास त्या मध्येच ठेवलेल्या भाताचे तापमान ६१ अंश C वर कायम राहिलेले आढळले तर बाहेर ठेवलेल्या भाताचे तापमान ६१ अंश C पर्यंत घसरले.
  • उत्कृष्ट दर्जाचे अन्न इतर पद्धतींनी शिजवलेल्या अन्नापेक्षा हे बॉक्स वापरून बनवलेले अन्नपदार्थ चव, रंग, पोत इ. बाबतीत सरस असतात.
  • पोषणमूल्यांचा अत्यल्प र्हास शिजवण्याचे माध्यमच अन्नपदार्थांमध्ये शोषले जात असल्यामुळे पोषणमूल्यांची हानी अत्यल्प होते.
  • विविध स्रोतांची बचत ह्या तंत्रज्ञानामुळे इंधन, पैसे, अंगमेहनत, वेळ अशा विविध स्रोतांची बचत तर होतेच शिवाय आरोग्यासही धोका पोहोचत नाही. अन्न शिजवण्यास लागणारा वेळ ५८ टक्क्यांनी तर इंधनावरील खर्च ४४ टक्क्यांनी कमी झालेला आढळला.

 

स्रोत: डिपार्टमेंट ऑफ होमसायन्स एक्स्टेन्शन, होमसायन्स कॉलेज अॅन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, टी.एन.ए.यु., मदुराई ६२५ १०४

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate