अल्पसंख्याक समाजातील महिलांमध्ये नेतृत्वाचे गुण विकसित करण्यासाठी भारत सरकारच्या अल्पसंख्याक मंत्रालयाची 'नई रोशनी' ही योजना असून त्यात वर्ष 2015-16 मध्ये यादीवर समावेश करण्यासाठी पात्र संघटना/शिक्षण संस्था यांच्याकडून ऑनलाइन अर्ज मॅनेजमेंट सिस्टीम (ओएएमएस) मार्फत मागविण्यात येत आहेत.
याकरिता फक्त ऑनलाइन केलेले अर्जच स्वीकारण्यात येतील. ऑफलाइन अर्ज किंवा हार्ड कॉपीज हे मंत्रालय अजिबात स्वीकारणार नाही.
ज्या संस्थांनी यापूर्वी 2012-13, 2013-14 आणि 2014-15 वर्षात सदर योजनेअंतर्गत प्रकल्प राबविले होते, त्यांनासुद्धा आता यादीवर समावेश करण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावे लागतील.
ऑनलाइन अर्जाचे फॉर्म भरण्यासाठी दिलेल्या तपशीलवार पायऱ्या मंत्रालयाची वेबसाइट - www.minorityaffairs.gov.in येथे 'Whats New' यामधून डाऊनलोड करता येतील. त्यानुसार ऑनलाइन अर्ज भरावा व त्याची एक प्रिंटआऊट काढून ती जिल्हाधिकारी/डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट/उपायुक्त यांना सादर करावी व त्यासोबत त्यांच्या शिफारसीकरिता विहीत केलेला 'वन पेज फॉरमेट' आणि अन्य मान्यतापत्रे द्यावीत. हा 'वन पेज फॉरमेट' ओएएमएस यामधील ‘फॉर्म्स्’ यामध्ये उपलब्ध असून तो डाऊनलोड करावा.
ओएएमएस येथे पोहोचण्यासाठी मंत्रालयाच्या वेबसाईटवरील 'नई रोशनी' याची लिंक/बोधचिन्ह/आयकॉन यावर क्लिक करावे.
जिल्हाधिकारी/डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट/डेप्युटी कमिशनर यांनी अर्जदार संस्थेची शिफारस करताना त्या संस्थेचे अध्यक्ष/सचिव यांच्या पत्रावर योग्य ती पुष्टी दिली पाहिजे.
नंतर सदर संस्थेने या शिफारसपत्राची प्रत स्कॅन करुन ती पोर्टलवर अपलोड करावी आणि ऑनलाइन अर्जाचे सादरीकरण 'कन्फर्म' करावे.
ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर सदर अर्जाचा ॲप्लिकेशन आयडी आणि अर्ज सादर केल्याची तारीख निर्माण होईल. ती संस्थांनी भविष्यातील संदर्भासाठी जतन केली पाहिजे. अर्जाची स्थिती, यादीवर समावेश, मंजुरीबाबत अद्ययावत माहिती, मान्यता, आदेश काढणे इत्यादी फक्त ओएएमएसच्या पोर्टलवरच उपलब्ध केले जाईल.
एका संस्थेस एका जिल्ह्यास फक्त एकच ऑनलाइन अर्ज करता येईल. प्रत्येक जिल्ह्याकरिता जिल्हाधिकारी/जिल्हा मॅजिस्ट्रेट/डेप्युटी कमिशनर यांची वेगळी शिफारस असणे बंधनकारक आहे. मात्र एकापेक्षा जास्त जिल्ह्यांकरिता एकाच संस्थेचे अर्ज विचारात घेणे याबाबत निर्णय फक्त मंत्रालय घेऊ शकेल. याबाबत मंत्रालयाचा निर्णय अंतिम व संस्थेवर बंधनकारक असेल.
कोणतीही कारणे न देता, तसेच कोणतेही बंधन किंवा जबाबदारी याशिवाय कोणताही किंवा सर्व प्रस्ताव प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर स्विकारणे किंवा नाकारणे, प्रक्रिया किंवा तिचा कोणताही भाग यात सुधारणा करणे किंवा कोणत्याही वेळी कोणत्याही अटी व शर्ती यात बदल करणे याचे अधिकार मंत्रालय राखून ठेवीत आहे.
यासंबंधीच्या कोणत्याही माहितीसाठी संस्थानी 'खिदमत' या मंत्रालयाच्या हेल्पलाइन फोन क्र. 1800-11-2001 (विनामुल्य) किंवा ओएएमएस येथे दिलेल्या संपर्कावर कोणत्याही कामाच्या दिवशी सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 वाजेदरम्यान संपर्क साधावा.
लेखक - देवेंद्र भुजबळ
संचालक (माहिती)(प्रशासन)
माहिती स्त्रोत : महान्युज
अंतिम सुधारित : 6/29/2020
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र...
सदर योजना महाराष्ट्र राज्यात सन २००४-०५ पासून राबव...
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायत...
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्कम ...