मी सौ. संगीता रामचंद्र फटांगरे मी सारोळेपठार गावामध्ये वौटर संस्थेने राबविलेल्या वातावरणातील बदल व स्वकृती या प्रकल्पामध्ये गाव पातळीवर वसुंधरा सेविका म्हणून काम करते. सर्व प्रथम गावामधील महिलांना एकत्र आणण्यासाठी घरोघरी भेट देऊन महिलांना बचत गट स्थापन विषयी मार्गदर्शन केले व त्यातून महिला तयार करून काही गट स्थापन केले. गटाचे फायदे त्यांना समजावून सांगितले. त्यातून गावामध्ये १० गट स्थापन झाले. गट सुरळीत चालविण्यासाठी दर महिन्याला गटाची बैठक घेतली जाते. यामुळे महिलांच्या गरजा भागू लागल्या आहेत व थोडी थोडी बचत होऊ लागली. तसेच काही महिला घराच्या बाहेर येत नवत्या. बाहेरचे व व्यवहाराचे ज्ञान नव्हते अशा महिला एकत्र येऊ लागल्या व आपल्या अडचणी एकमेकींना सांगू लागल्या.
गावामध्ये रक्त तपासणी शिबीर घेण्यात आले. त्यामध्ये पहिल्या वेळी ३१६ लोकांनी रक्त तपासले. ज्या लोकांचे महिलांचे रक्त कमी होते ज्या लोकांचे, महिलांचे रक्त कमी होते त्यांना लोहाच्या गोळ्या दिल्या व आहार कसा असावा या विषयी माहिती सांगितली व आहार प्रत्याषिक करून दाखविले त्यामध्ये अलीवाचे लाडू महिलांना आवडले व त्यांनी घरीही बनविले. ज्यांना लोह कमी आहे अश्या महिलांनी त्याचा उपयोग करून घेतला.
० ते ५ वयोगटातील मुलांचे आरोग्य यामध्ये लसीकरण आहार वजन उंची या गोष्टी घेतल्या जातात. दर महिना वजन उंची घेऊन तो मुलगा किव्वा मुलगी कोणत्या श्रेणीत आहे हे त्यांच्या आई ला सांगितले जाते. त्यामुळे महिलांना कोणत्या श्रेणीत आहे हे कळते व त्या आपल्या मुलांची काळजी घेतात त्यांना व्यवस्तीत आहार स्वच्छता या गोष्टींची माहिती दिली जाते. आपले आरोग्य सुधारावे व कुपोषण दूर व्हावे यासाठी महिलांना परसबाग करण्याचा सल्ला दिला. ज्यांना जागा व पाणी आहे अश्या महिलांनी परसबाग तयार केल्या. त्यातून त्यांना ताजा भाजीपाला मिळू लागला. महिलांना परसबागेचे महत्व कळले. सांडपाणी वाया न घालता ते बागेसाठी उपयोगात येऊ लागले.
महिलांना दुषित पाण्यामुळे होणारे आजार या विषयी माहिती सांगितली. त्यामुळे महिलांनी पाणी गाळून घेणे त्यात मेडीक्लोर टाकणे या गोष्टी करू लागल्या. महिलांचा कामाचा बोजा कमी करण्यासाठी जो उपक्रम राबवला त्यामध्ये महिलांनी पाण्याचे फिल्टर घेतले. त्यामुळे त्यांना शुद्ध पाणी मिळू लागले. काही महिलांनी पाण्याच्या टाक्या घेतल्या. त्यामुळे महिलांचा पाणी साठविण्याचा प्रश्न सुटला व महिलांना दोन तीन दिवस पाणी नाही आले तरी महिलांना अडचण येत नाही. त्यामुळे त्यांना त्याचा पुरेपूर फायदा झाला. ज्या महिलांनी सायकल घेतली त्या महिलांना शेतात कामासाठी तसेच घरगुती कामासाठी त्याचा उपयोग झाला.
आशय लेखिका : सौ. संगीता रामचंद्र फटांगरे, सरोळेपठार (संगमनेर)
अंतिम सुधारित : 7/21/2020
१९८९ च्या प्रकरण दोनमधील विभाग तीन मध्ये अत्याचारा...
दलित व आदिवासींच्या विरोधातील अत्याचारांची व्याख्य...
अर्थसंकल्प तयार करण्यास आणि ग्रामसभेकडून तो मान्य ...
राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे गठण अनुसूचित ज...