অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

निराधारांना मिळालीय सावली..!

निराधारांना मिळालीय सावली..!

निराधार.. ज्याला कोणाचाही आधार नाही असा माणूस ! रस्त्यावर भीक मागणारी, मिळेल ते काम करुन जगणारी अनेक मुले-मुली तुम्ही पाहिली असतील. या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून आपल्या देशाचे भविष्य अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न अहमदनगर येथील नितेश बनसोडे करीत आहेत. त्यांच्याविषयी…

जगात अनेक समस्या आहेत. या समस्या निवारणासाठी शासकीय यंत्रणांसह काही सामाजिक संस्थाही सातत्याने धडपड आहेत.. अशांपैकीच एक आहेत नितेश बनसोडे..

नितेश २००१ पासून अहमदनगर जिल्ह्यातील केडगांव परिसरात निराधार मुलामुलींसाठी प्रकल्प चालवित आहेत. त्यांनी संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून ३ निराधार मुलांना 'सावली' देवून आपल्या कार्याला सुरुवात केली. आज त्यांच्या सावली प्रकल्पात ५० पेक्षा जास्त मुले- मुली आनंदाने राहत आहेत. लहानपणीच आईबाबा देवाघरी गेलेले.., आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे सोडून दिलेले.., शिक्षण न देता चोऱ्या आणि इतर गुन्हेगारी स्वरुपाच्या कामात गुंतवलेले.. वय वर्षे ६ पासून वयाच्या १८ वर्षांपर्यंतची मुलेमुली सावलीमध्ये आहेत. अहमदनगर मुख्य शहरापासून जवळच असलेल्या केडगांव- भूषण नगर परिसरात सावली प्रकल्प कार्यरत आहे. नितेश यांच्या या सामाजिक कार्याला अनेक अडचणीला तोंड द्यावे लागते. नितेश आणि त्यांचे मित्र वेगवेगळ्या माध्यमातून सावलीसाठी निधी उभारण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

वेगवेगळ्या कारणांमुळे समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दुर गेलेल्या शेकडो मुलामुलींना सावलीने घडविले आहे. सावलीत राहणाऱ्या प्रत्येकाच्या अशा काही कहाण्या आहेत ज्या ऐकून आपण निशब्द होतो. नितेश यांनी सावलीच्या माध्यमातून या निराधार मुलामुलींना नुसताच आश्रय दिला नाही, या प्रकल्पात राहणारी मुले- मुली जवळपास असलेल्या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. हा प्रकल्प चालविण्यासाठी दररोज सरासरी ५ हजार रुपये खर्च येतो. त्यात जेवण, कपडे, वीज बिल, वैद्यकीय सुविधा आणि इतर खर्च आहे. या मुलामुलींना संगणक प्रशिक्षणासोबतच गाण्याचे आणि स्वसंरक्षणाचे प्रशिक्षणही दिले जात आहे. या मुलामुलींनी अहमदनगर परिसरात पर्यावरण संवर्धनाची चळवळ सुरू आहे. प्रबोधनासोबत वृक्षारोपण सारख्या कृतीमधून सावली इतरांसाठी आदर्श निर्माण करीत आहे. या सामाजिक उपक्रमाला तुम्ही नक्की भेट द्या.

 

माहिती संकलन - परशुराम कोकणे

अंतिम सुधारित : 8/14/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate