जिल्हा परिषदेची कामे
खेडोपाडी राहणाऱ्या लोकांच्या गरजा विचारात घेऊन त्या गरजांचे निवारण केले तर लोकांचा विकास होईल या हेतूने खेडोपाडी राहणा-या लोकांच्या संभाव्य गरजांच्या याद्या जिल्हा परिषदेचा कायदा करतांना तयार केल्या त्या याद्या करतांना ज्या गरजांची पूर्तता ग्रामपंचायत करू शकेल त्या गरजा वगळल्या उरलेल्या गरजांच्या दोन याद्या केल्या त्या अशा :
जिल्हा परिषदेकडून पूर्तता करावयाच्या गरजा जिल्हा परिषदेकडून पूर्तता करावयाच्या गरजांची संख्या सुमारे १०६ केलेली असून त्या गरजांचे वर्गीकरण व त्या अंतर्गत येणारी कामे खालील प्रमाणे
अ.क्र. | वर्गीकरण | अंतर्गत येणारी कामे संख्या |
१ |
शेती |
१२ |
२ |
पशुसंवर्धन व दुग्धशाळा |
८ |
३ |
वने |
१ |
४ |
समाजकल्याण |
मागासवर्गीय शैक्षणिक विकास - २ ,आर्थिक विकास-५,अस्पृश्य निवास-४ ,मागासवर्गीययांचे कल्याण -१०,मागासवर्गीय यांना प्रशिक्षण -२ |
५ |
शिक्षण |
५ |
६ |
वैद्यकीय |
६ |
७ |
आयुर्वेद |
२ |
८ |
सार्वजनिक आरोग्य |
११ |
९ |
इमारती व दळणवळण |
६ |
१० |
सार्वजनिक आरोग्य |
४ |
११ |
पाटबंधारे |
१ |
१२ |
प्रसिद्ध |
४ |
१३ |
सामुहिक विकास |
२ |
१४ |
समाजशिक्षण |
१३ |
१५ |
ग्रामीण गृहनिर्माण |
१ |
१६ |
इतर |
२४ |
या प्रत्येक क्षेत्रात जिल्ह्या परिषद कोणकोणती कामे करू शकते त्यांची यादी अशी .-
शेतीची कामे
- पीक स्पर्धा
- पीक संरक्षण
- पीक मोहिमा
- मिश्र खते व स्थानिक खते
- रासायनिक खते, शेतीची अवजारे आणि शेतीसाठी लागणारे लोखंड, पोलाद आणि सिमेंट यांचे
- वाटप
- सुधारित कृषिपद्धतीचे प्रात्याक्षिक
- आदर्श प्रात्याक्षिक किंवा दुय्यम बीज क्षेत्रे
- सुधारीत बियाणांची आयात व वाटप
- गोदामे बांधणे आणि ती सुस्थितीत ठेवणे
- शेतीची अभिवृद्धी व सुधारणा .
- वायू संपीडके .
- खार जमीन विकास
पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकासाची कामे
- पशुवैद्यकीय सहाय्य
- गुरांच्या, घोड्याच्या आणि इतर जनावरांच्या पैदाशीची सुधारणा
- सुधारित पैदाशीच्या कोंबड्याचे वितरण करणे
- गुंरांचे प्रदर्शन व मेळावे भरविणे
- डुकरांचा प्रकर्षित विकास
- गुराढोरांचा प्रकर्षित विकास
- दुग्धशाळा विकास
वने
- गायराने व कुरणे
समाजकल्याणाची कामे
मागासवगचा शैक्षणिक विकास
- मागासवर्गाच्या विद्याथ्र्यांना शिष्यवृत्त्या फी माफी व परीक्षेची फी देणे आणि
- मागासवर्गाच्या विद्याथ्र्यांकरीता वसतिगृहे व शाळा स्थापन करणे व त्या चालविणे.
मागासवर्गाचा आर्थिक विकास - यात पुढील बाबींचा समावेश होतो.
- शेतीची साधनसामग्री खरेदी करण्यासाठी एकेका शेतक-यास कर्जाच्या व अर्थसहाय्या च्या स्वरूपात वित्तीय सहाय्य देणे.
- विमुक्त जातींना चरखे पुरविणे
- मागास क्षेत्रात दळणवळणाचा विकास करणे
- हस्तव्यवसाय केंद्रे स्थापन करणे आणि
- गुरांच्या पैदाशीचा आणि कोंबड्या पाळण्याचा क्षेत्रात विकास करणे
-
अस्पुश्यता निवारण, यात पुढील गोष्टींचा समावेश होतो.
- हरिजन सप्ताह साजरे करणे .
- झुणका भाकर कार्यक्रम
- सवर्ण हिंदू आणि हरिजन यांच्यातील आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणे आणि
- अस्पृश्यता निवारण्यासाठी उत्कृष्ट काम करणा-या गावांना बक्षिसे देणे.
-
मागासवर्गाच्या कल्याणाचे कार्यक्रम, यात पुढील गोष्टींचा समावेश होतो.
- महिलांच्या आणि बालकांच्या कल्याणाचे कार्यक्रम किंवा प्रकल्प.
- बालवाड्यांच्या स्थापना करणे
- मागासवर्गाच्या कल्याणासाठी प्रचाराचे व प्रसिद्धीचे काम हाती घेणे
- मागासवर्गासाठी संस्कार केंद्र, सामूहिक करमणुकीची केंद्रे आणि सामूहिक सभागृहे... ।
- विमुक्त जातींना कपडे पुरविणे
- औषधे खरेदी करण्यासाठी व्यक्तींना वित्तीय सहाय्य देणे आणि स्वेच्छा संस्थाना त्यांनी वैद्यकीय मदत देण्यासाठी अनुदाने देणे .
- मागासवर्गातील व्यक्तींसाठी घरांची तरतूद करणे, आणि
- पिण्याच्या पाण्याच्या विहिरींची तरतूद करणे .
मागासवर्गाच्या प्रशिक्षण देणे, यात पुढील गोष्टींचा समावेश होतो.
- प्रशिक्षण शिबीर आयोजित करणे
- तंत्र प्रशिक्षण आणि परंपरागत व्यवसायाच्या सुधारित पद्धतीचे प्रशिक्षण देणे
शिक्षणाची कामे
- अनुदान प्राप्त शाळांना अनुदान देणे, यासहित प्राथमिक शाळांची आणि मूलोद्योग शाळांची स्थापना व्यवस्थापन त्या चालविणे, त्यांची तपासणी करणे आणि त्यांना भेटी देणे.
- माध्यमिक शाळांची स्थापना, व्यवस्थापन, त्या चालविणे, त्यांची तपासणी करणे, आणि त्यांना भेटी देणे, खाजगी माध्यमिक शाळांची अनुदाने व कर्जे याबाबत केवळ शिफारस करणे आणि शिक्षण संचालकांची मंजुरी मिळाल्यानंतर त्यांचे वाटप करणे.
- प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या संबंधित विद्याथ्र्यास कर्जे व शिष्यवृत्ती देणे.
- जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या इमारती बांधणे त्या सुस्थित ठेवणे.
- इतर शैक्षणिक उद्दिष्टे
वैद्यकीय कामे
- तालुका दवाखाने आणि तालुका दवाखान्यांच्या दर्जात वाढ करणे .
वेद्यकीय कामे
- तालुका दवाखाने आणि तालुका दवाखान्यांच्या दर्जात वाढ करणे .
- जिल्हा व कुटीर रूग्णालये, तसेचं जिल्हा याप्रमाणे असलेली इतर मोठी सरकारी वगळून इतर रुग्णालये
- वैद्यकीय व्यवसायाची अर्थसहाय्यीत केंद्रे .
- ग्रामीण वैद्यकीय सहाय्य केंद्रे आणि सार्वजनिक वैद्यकिय सहाय्य
- कुत्रा चावल्याने होणा-या विषबाधेवर गरीब व्यक्तींवर उपचार करणा-या संस्थांना वित्तीय सहाय्य देणे.
आयुर्वेद पद्धतीने औषधोपचाराची कामे
- आयुर्वेदीय, युनानी व समचिकित्सा दवाखाने
- आयुर्वेदीय, युनानी व समचिकित्सा औषधांच्या पेट्यातील औषधांचा साठा पुन्हा भरून काढणे
सार्वजनिक आरोग्यासंबंधी कामे
- प्राथमिक आरोग्य केंद्रे
- फिरती आरोग्य पथके
- प्राथमिक आरोग्य पथके
- देवी प्रतिबंधक लस टोचणे
- शालेय आरोग्य सेवा
- यौन रोगाविरूद्ध उपचारासाठी उपाय योजना
- गावात औषधांच्या पेट्या ठेवणे
- आरोग्य शिक्षणासाठी सुविधा
- ग्रामीण स्वच्छता
- . सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ती उपाययोजना करणे .
- अनारोग्यकारक वस्त्यांची पूर्ववत सुधारणा
इमारती व दळणवळणाची कामे पुढील रस्त्यांचे व पुलांचे बांधकाम करणे, ते सुस्थितीत राखणे व त्यांची दुरूस्ती करणे
- ग्रामीण रस्ते
- इतर जिल्हा रस्ते
- प्रमुख जिल्हा रस्ते आणि
- वर उल्लेख केलेल्या रस्त्यांवरील पूल.
- ग्रामीण उपवने व उद्याने (राष्ट्रीय उपवने व उद्याने वगळून)
- जिल्हा परिषदेच्या गरजांच्या संबंधात प्रशासकीय आणि इतर इमारतींचे बांधकाम
- रस्त्यांव्यतिरित दळणवळणाचे इतर मार्ग
- सार्वजनिक बांधकामे
सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकीची कामे
- ग्रामीण पाणीपुरवठा
- ग्रामीण विभागातील जत्रांसाठी संरक्षित पाणीपुरवठा
- ग्रामीण जलनिस्सारण
- पिण्यासाठी, स्नानासाठी किंवा स्वयंपाकासाठी लागणारे पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून त्याचे संरक्षण करण्यासाठी काम
पाटबंधारयाची कामे
लहान पाटबंधा-याची कामे
प्रसिद्धीची कामे
- फिरत्या प्रसिद्धी गाड्या
- जिल्हा प्रदर्शने आयोजित करणे
- करमणुकीच्या कार्यक्रमांद्वारे प्रसिद्धी
- ग्रामीण ध्वनिक्षेपण
सामूहिक विकासाची कामे
- सामूहिक विकास कार्यक्रम .
- स्थानिक विकास कामांचा कार्यक्रम
समाज शिक्षणाची कामे
- सामूहिक करमणुक केंद्रे
- प्रौढ़ साक्षरता केंद्रे
- क्रीडा, खेळ, क्रीडांगणे, साधनसामृग्री आणि कल्याणकारी संघटना
- किसान मेळावे
- राज्यामधील नियोजित सहली आणि राज्य शासनाच्या पूर्वपरवानगीने, राज्याबाहेरील नियोजित सहली
- माहिती प्रस्तुत करणे
- महिला संघटना व महिला कल्याण
- शिशु संघटना व शिशु कल्याण
- फिरत्या चित्रपट गाड्या
- ग्रंथालये व वाचनालये
- जत्रा, चित्रपट दाखविणे व प्रदर्शन
ग्रामीण गृहनिर्माणाची कामे
- ग्रामीण गृहनिर्माण
इतर कामे
- ग्रामोद्धार
- आदर्श गावे वसविणे (त्या प्रयोजनासाठी द्यावयाची अनुदाने व कर्जे धरून)
- गावाचे आर्थिक कल्याण w लोकांचे आरोग्य, सुरक्षितता, सुखसोयी यांची ज्यामुळे वाढ होण्याचा संभव आहे अशी स्थानिकस्वरुपाची बांधकामे किंवा उपाययोजना
- बाजार
- धर्मशाळा, विश्रांतीगृहे, प्रवाशांसाठी बंगले, पाणपोई वगैरे
- चवडया -
- इतर सार्वजनिक परिसंस्था
- औद्योगिक बेकारी वगळून इतर स्थानिक बेकारी
- . गावठाणाची सुधारणा व विस्तार (त्या प्रयोजनासाठी द्यावयाची अनुदाने व कर्जे धरून) .
- नवीन गावठाणे बसविणे (त्या प्रयोजनासाठी द्यावयाची अनुदाने व कर्जे धरून) .
- जिल्हा परिषदांच्या कर्जचा-याकरीता (घरासाठी जागांची किंवा घरांची) तरतूद .
- सार्वजनिक मैदाने व उद्याने यामध्ये झाडे लावणे व त्यांची जोपासना करणे
- रानटी जनावरांचा नाश करण्याबद्दल बक्षिसे
- . जाहीर स्वागत समारंभ व समारंभ आणि मनोरंजन
- स्थानिक यात्रांबाबतची व्यवस्था करणे
- दफन भूमि व दहन भूमि
- स्थानिक भटक्या गरीब लोकांसाठी सहाय्य
- गरीबांची घरे सुस्थितीत ठेवणे .
- जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये डाक, तार विभागाला ना परतावा, अंशदान देण्याची तरतूद करून तेथे
- प्रायोगिक डाक कार्यालयाच्या सुविधा उपलब्ध करून देणे. ग्रामपंचायतींना पुरेशा व सबळ कारणांमुळे शक्य झाले नसेल तेथे अशा सुविधा उपलब्ध करून देणें किंवा त्या चालू ठेवणे
- ग्रामदान व भूदान चळवळीचा प्रचार करणे
- पंचायत राज प्रशिक्षण केंद्रे
स्त्रोत - जिल्हा परिषद व पंचायत समिती (वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट)
अंतिम सुधारित : 7/27/2020
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.