(१) ज्या इलेक्ट्रॉनिकी उद्योगांसाठी साहाय्यभूत उद्योग सुरू करता येण्याजोगे आहेत, असे उद्योग सार्वजनिक क्षेत्रात किंवा संयुक्त क्षेत्रात स्थापावेत, याबद्दल शासनाला सल्ला देणे;
(२) इलेक्ट्रॉनिकी औद्योगिक घटकांना संशोधन व प्रगती आणि इतर तांत्रिक सोयी तसेच त्यांच्या मालाला मजबूत विक्री संघटना उपलब्ध करून देणे;
(३) अर्ध-संवाहक शक्तिसाधनांचे उत्पादन करण्यासाठी ‘अर्ध-संवाहक मर्यादित’ ही एका विख्यात फ्रेंच कंपनीशी सहयोग करून वेगळी कंपनी नासिक येथे चालविणे;
(४) व्यावसायिक फीतमुद्रकांचे आपल्या श्राव्य-द्दश्य विभागातर्फे उत्पादन करणे;
(५) बिनतारी संदेश यंत्रसामग्रीचे एका विख्यात स्विस कंपनीच्या तांत्रिक सहयोगाने उत्पादन करणे;
(६) दूरध्वनीसाठी कार्यालयात लागणाऱ्या स्विच-फलकांचे उत्पादन करणे व
(७) आपल्या मध्यवर्ती विक्री विभागातर्फे राज्याच्या विकसनशील भागांतील कंपन्यांना सहयोगी करून घेऊन त्यांचा माल खपविणे, त्यांच्या मालाचे अचूक गुणवत्ता-नियंत्रण होत आहे, याची खात्री करणे व गुणवत्ता वाढविण्यासाठी उपाययोजना करणे. हे महामंडळाचे सर्वाधिक सर्जनशील कार्य असून त्याकरिता त्याच्या १९ कंपन्या सहयोगी आहेत.
लेखक - वि. गो. पेंढारकर
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 6/5/2020
महाराष्ट्र राज्याचे नवीन व नवीकरण उर्जा स्त्रोत (...
महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण विभागाच्या प्रशासकीय...
सार्वजनिक प्रशासनाविषयी अधिक माहिती देणे व कामकाजा...