অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात येणारे पुरस्कार

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात येणारे पुरस्कार

राज्यातील संस्कृतीचे जतन करण्यासाठी तसेच त्यामध्ये काम करण्या-या कलावंतांना तसेच संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत पुढीलप्रमाणे पुरस्कार देण्यात येतात.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार

महाराष्ट्रातील सर्वोच्च नागरीक सन्मान करणारा पुरस्कार म्हणून महाराष्ट्र भूषण पुरस्कार असून सदर पुरस्कार सन १९९७ पासून देण्यात येत आहे. कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणा-या व मानर्वी  जीवन उंचावण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींचा या पुरस्कारासाठी विचार करण्यात येतो सद्यस्थितीत शासननिर्णय क्र. मभूपु २०१२/सुनिष्ठ/प्र.क्र.१४३/सांगा.का.४. दि.१ सप्टेंबर, २०१२ अन्वय या पुरस्काराच स्वरूप व निकष खालीलप्रमाणे आहेत.

पुरस्काराचे स्वरूप

अ) रु. १० लाख रोख
ब) शाल व श्रीफळ
क) स्मृतीचिन्ह व मानपत्र

क्षेत्र: कोणत्याही क्षेत्रामध्ये उच्चतम कामगिरी करणा-या व्यक्तीचा सन्मान

पुरस्कारासाठी पात्रता/निकष

  • संबंधित व्यक्तीने त्याच्या क्षेत्रात किमान २० वर्षे सातत्याने सेवाभावी वृत्तीने तसेच वैशिष्टयपूर्ण/ उल्लेखनीय कार्य केलेले असावे.
  • संशोधनाद्वारे, नवीन शोध लावला असल्यास तसेच क्रिडा क्षेत्रात अव्वल दर्जाचे अनेक पुरस्कार प्राप्त खेळाडूच्या बाबतीत विचार करुन हा नियम शिथिल करण्यात येईल.
  • महाराष्ट्रात किमान १५ वर्षे वास्तव्य असावे.
  • पद्मपुरस्कार प्राप्त मान्यवरांना सदर पुरस्कारासाठी प्राधान्य देण्यात येईल.

तुकाराम जीवन गौरव पुरस्कार

सदर पुरस्कार सन २००७ पासून देण्यात येत आहे.अखिल भारतीय स्तरावर संत साहित्यावर उत्कृष्ट साहित्य / वाड्.मय लिहिणा-या लेखकास प्रतिवर्षी दिला जातो. सद्यस्थितीत शासन निर्णय क्र. सासंन २०००/प्र.क्र.१७७/सांगा.का.२, दि. ४ जून, २००२ अन्वये या पुरस्काराचे स्वरूप व निकष खालीलप्रमाणे

पुरस्काराचे स्वरूप

अ) रु. ५ लाख रोख
ब) शाल व श्रीफळ
क) स्मृतीचिन्ह व मानपत्र

क्षेत्र :- संत साहित्यावर उत्कृष्ट लेखन करणारे साहित्यिक

पुरस्कारासाठी पात्रता/निकष :-

  1. संत साहित्यावर अधोरेखित विशेषत: अध्यात्मिकतेचा विशेष दीर्घकाळ अभ्यास करणारे तसेच सातत्याने प्रदीर्घ काळ लेखन व सेवा करीत आहेत अशा ज्येष्ठ, व्यक्ती या पुरस्कारासाठी पात्र आहेत.
  2. अशी व्यक्ती सध्या प्रकाशात नसली तरी त्या क्षेत्रात कार्यरत असणारी असावी.
  3. त्या लेखकाची/व्यक्तीची संतसाहित्य क्षेत्रातील कर्तृत्वाची ज्येष्ठता सिध्द असावी.
  4. लेखक/ साहित्यीक महाराष्ट्र राज्यातील किमान १५ वर्षे रहिवाशी असला पाहिजे.केवळ जन्मत: महाराष्ट्रीय असल्याचा विचार मर्यादित न ठेवता ज्या इतर प्रांतीय लेखक / साहित्यीकाने महाराष्ट्रात स्थायीक होऊन संतसाहित्याची सेवा केली आहे अशांचाही विचार केला जातो.

लता मंगेशकर जीवन गौरव पुरस्कार

गायन/संगीत या कलाक्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य केलेल्या कलाकारांना सदर पुरस्कार सन १९९२ पासून देण्यात येत आहे. सद्यस्थितीत शासननिर्णय क्र. पूरक२०११/प्रक्र१५०/सांका४,दि.१३/४/१२ अन्वये या पुरस्काराचे स्वरूप व निकष

पुरस्काराचे स्वरूप

अ) रु. ५ लाख रोख
ब) शाल व श्रीफळ
क) स्मृतीचिन्ह व मानपत्र

क्षेत्र : गायन व संगीत

पुरस्कारासाठी पात्रता/निकष

  1. चिकाटी/ एकनिष्ठेने सातत्याने प्रदीर्घ काळ काम करीत आहेत असा ज्येष्ठ, ख्यातनाम कलाकार पुरस्कारासाठी पात्र आहे.
  2. असा कलाकार सध्या प्रकाशात नसला तरी कार्यरत असणारा असावा.
  3. कलाकाराचे त्याच्या कलाक्षेत्रातील कर्तृत्व व ज्येष्ठता.
  4. पुरुष कलाकार ५० वर्ष व स्त्री कलाकार ४० वर्ष यापेक्षा कमी वयाचा नसावा.
  5. कलाकार महाराष्ट्र राज्यातील किमान १५ वर्षे रहिवाशी असला पाहिजे केवळ जन्मतः महाराष्ट्रीय असल्याचा विचार मर्यादित न ठेवता ज्या इतर प्रांतीय कलाकारांनी महाराष्ट्रात स्थायिक होऊन गायन /संगीत कलेची सेवा केली आहे अशाचाही विचार केला जातो.

प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार

सन २००६ पासून रंगभूमीवरील उत्कृष्ट कामगीरी (Lifetime Achievement) ज्येष्ठ नाट्य कलाकारास नटवर्य प्रभाकर पणशीकर यांच्या नांवे रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात ते सद्यस्थितीत शासन निर्णय क्र. पुरक २०११/प्र.क्र.१५०/सां.का.४. दि.१३ एप्रिल, २०१२ अन्वये या पुरस्काराच स्वरूप व निकष खालीलप्रमाणे आहेत.

पुरस्काराचे स्वरूप

अ) रु. ५ लाख रोख
ब) शाल व श्रीफळ
क) स्मृतीचिन्ह व मानपत्र

पुरस्कारासाठी पात्रता/निकष

  1. नाट्यक्षेत्रात चिकाटीने एकनिष्ठेने सातत्याने प्रदिर्घ काम केलेला ज्येष्ठ रंगभूमी कलाकार पुरस्कारासाठी पात्र आहे.
  2. कलाकाराचे त्याच्या कलाक्षेत्रातील कर्तृत्व व ज्येष्ठता.

संगीताचार्य कै. बलवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार

संगीत रंगभूमीवरील उत्कृष्ट काम गेरी (Lifetime Achievement) करणा-या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. शासन निर्णय क्र. पुरक २०११/प्र.क्र.१५०/सां.का.४. दि.१३ एप्रिल, २०१२ अन्वये या पुरस्काराचे स्वरूप व निकष खालीलप्रमाणे आहेत.

पुरस्काराचे स्वरूप

अ) रु. ५ लाख रोख
ब) शाल व श्रीफळ
क) स्मृतीचिन्ह व मानपत्र

पुरस्कारासाठी पात्रता/निकष

  1. संगीत क्षेत्रात चिकाटीने,एकनिष्ठेने,सातत्याने प्रदीर्घ काम केलेला ज्येष्ठ संगीत रंगभूमी
  2. कलाकार पुरस्कारासाठी पात्र आहे. २. कलाकाराची त्याच्या कलाक्षेत्रातील कर्तृत्व व ज्येष्ठता.

राज्य सांस्कृतिक पुरस्कार

सदर पुरस्कार सन १९७६ पासून देण्यात येत आहे.सांस्कृतिक क्षेत्रात विशेष कार्य करणा-या कलावंत व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. शासन निर्णय क्र. पुरक २०११/प्र.क्र.१५०/सांगा.का.४. दि.१३ एप्रिल, २०१२ अन्वये या पुरस्काराचे स्वरूप व निकष खालीलप्रमाणे आहेत.

पुरस्काराचे स्वरूप

अ) रु. १ लाख रोख
ब) शाल व श्रीफळ
क) स्मृतीचिन्ह व मानपत्र

क्षेत्र :- पुढील १२ क्षेत्रातील व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो.

१. नाटय़ २. कंठ संगीत ३. वाद्यसंगीत ४. चित्रपट ५. तमाशा  ६. किर्तन  ७. शाहिरी ८. लोककला ९.नृत्य  १०. क्लादन  ११. उप शास्त्रीय संगीत १२. आदिवासी गिरीजन कला

पुरस्कारासाठी पात्रता/निकष :-

  • त्या त्या क्षेत्रात मोलाचे योगदान दिलेली मान्यवर व्यक्ती या पुरस्कारासाठी पात्र आहे.
  • अशी व्यक्ती सध्या प्रकाशात नसली तरी त्या क्षेत्रात कार्यरत असणारी असावी.
  • त्या मान्यवर व्यक्तीची त्या क्षेत्रातील कर्तृत्वता/ ज्येष्ठता सिध्द असावी.
  • पुरुष किमान ५० वर्ष व स्त्री ४० वर्ष यापेक्षा कमी वयाचा नसावा.
  • मान्यवर व्यक्ती महाराष्ट्र राज्यातील किमान १५ वर्षे रहिवाशी असली पाहिजे. केवळ जन्मत: महाराष्ट्रीय असल्याचा विचार मर्यादित न ठेवता ज्या इतर प्रांतीय मान्यवर व्यक्तीनी महाराष्ट्रात स्थायीक होऊन सांस्कृतिक क्षेत्रात विशेष सेवा केली आहे अशांचाही विचार केला जातो.

राज कपूर जीवन गौरव व विशेष योगदान पुरस्कार

सदर पुरस्कार सन १९९८पासून देण्यात येत आहे.हिंदी चित्रपट सृष्टीत ज्यांनी दीर्घकाळ आपले आयुष्य घालविले आहे तसेच चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन इत्यादी अष्टपैलूगुणांनी त्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे अशा व्यक्तीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. शासन निर्णय क्र पुरक २०११/प्र.क्र.१५०/सांगा.का.४. दि.१३ एप्रिल, २०१२ अन्वये या पुरस्काराचे स्वरूप व निकष खालीलप्रमाणे

पुरस्काराचे स्वरूप

अ) जीवन गौरव रु. ५.०० लाख विशेष योगदान रु.३.०० लाख
ब) प्रत्येकी शाल व श्रीफळ
क) प्रत्येकी स्मृतीचिन्ह व मानपत्र

क्षेत्र :- हिंदी चित्रपटसृष्टी

पुरस्कारासाठी पात्रता

हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षांसाठी दीर्घकाळ आपले आयुष्य घालविले आहे तसेच चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन इत्यादी अष्टपैलूगुणांनी त्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारी व्यक्ती.

चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव व विशेष योगदान पुरस्कार

मराठी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षासाठी ज्यांनी दीर्घकाळ आपले आयुष्य घालविले आहे तसेच चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन इत्यादी अष्टपैलूगुणांनी त्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे अशा व्यक्तीस सन १९९४ पासून या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. शासन निर्णय क्र. पुरक २०११/प्र.क्र.१५०/सांगा.का.४, दि.१३ एप्रिल, २०१२ अन्वये या पुरस्काराचे स्वरूप व निकष खालीलप्रमाणे आहेत.
पुरस्काराचे स्वरूप

अ) जीवन गौरव रुपये ५.०० लाख विशेष योगदान रु.३.०० लाख
ब) प्रत्येकी शाल व श्रीफळ
क) प्रत्येकी स्मृतीचिन्ह व मानपत्र

क्षेत्र :- मराठी चित्रपट सृष्टी

पुरस्कारासाठी पात्रता
मराठी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षासाठी ज्यांनी दीर्घकाळ आपले आयुष्य घालविले आहे तसेच चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन इत्यादी अष्टपैलू गुणांनी त्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारी व्यक्ती.

तमाशासम्राज्ञी कै विठाबाई नारायणगांवकर जीवन गौरव पुरस्कार

सदर पुरस्कार सन २००५ पासून देण्यात येत आहे.महाराष्ट्रातील लोकप्रिय तमाशा या क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणा-या ज्येष्ठ कलाकारास विठाबाई नारायणगांवकर जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांनी दिलेल्या योगदानाचा यथोचित सत्कार करणे हे उद्दिष्ट आहे. शासन निर्णय क्र पुरक २०११/प्र.क्र.१५०/सांगा.का.४, दि.१३ एप्रिल, २०१२ अन्वये या पुरस्काराचे स्वरूप व निकष खालीलप्रमाणे आहेत.

पुरस्काराचे स्वरूप
अ) रु. ५ लाख रोख
ब) शाल व श्रीफळ क) स्मृतीचिन्ह व मानपत्र

क्षेत्र :- तमाशा

पुरस्कारासाठी पात्रता

  1. तमाशा क्षेत्रात चिकाटीने/ एकनिष्ठतेने, सातत्याने प्रदीर्घ काळ काम करणा-या ज्येष्ठ व लोककला क्षेत्रात आदराचे स्थान असणारा कलाकार पुरस्कारासाठी पात्र आहे.
  2. असा कलाकार सध्या प्रकाशात नसला तरी कार्यरत असणारा असावा.
  3. कलाकाराची त्याच्या कलाक्षेत्रातील कर्तृत्वाची ज्येष्ठता सिध्द असावी.
  4. पुरुष कलाकार किमान ५० वर्ष व स्त्री कलाकार ४० वर्ष यापेक्षा कमी वयाचा नसावा.
  5. कलाकाराने किमान १५ ते २० वर्षे तमाशा क्षेत्रात स्थायीक होऊन एकनिष्ठतेने या लोककलेची सेवा केली असली पाहिजे.

भारतरत्न पं. भीष्मोन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार

सदर पुरस्कार शाय्त्रीय संगीत क्षेत्रात गायन व वादन यामध्ये प्रदीर्घकाळ उल्लेखनिय कार्य केलेल्या कलाकारांना भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. या पुरस्काराचे स्वरूप व निकष खालीलप्रमाणे आहेत.

पुरस्काराचे स्वरुप

पुरस्कारात खालील बाबींचा समावेश आहे. (अ) रु. ५ लाख रोख (ब) शाल व श्रीफळ (क) स्मृत चेन्ह व मानपत्र

पुरस्काराचे क्षेत्र :- शास्त्रीय गायन व शास्त्रीय वादन

पुरस्कारासाठी पात्रता

१. शास्त्रीय गायन व वादन क्षेत्रात प्रदीर्घकाळ उल्लेखनीय कार्य केलेले मान्यवर.


अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

स्रोत : पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 5/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate