राणा कुंभ
राणा कुंभ : (कार. सु. १४३३ – ६८), गुहिलोत वंशातील एक पराक्रमी आणि कलाभिज्ञ राजा. त्याच्या जन्ममृत्युंच्या तारखा उपलब्ध नाहीत. मोकल हा त्याचा पिता. त्याच्या खुनानंतर तो मेवाडच्या गादीवर आला. त्याचा उल्लेख राणाकुंभ, कुंभकर्ण, कुंभवर्ण इ. भिन्न नामांतरांनी करतात.