चंदन
चंदन : (हिं. सफेद चंदन, चंदल; गु. सुखड, सुखेत; क. श्रीगंधा, गंधा, अगरूगंधा; सं. चंदन, आनंदितम, मल्यज, गंधसार; इं. व्हाइट सँडलवुड ट्री; सँडल ट्री, लॅ. सँटॅलम आल्बम; कुल-सँटॅलेसी). ह्या परिचित वनस्पतीच्या वंशातील अनेक जातींची (सु. २५) झुडपे व वृक्ष भारतातील द्वीपकल्पी भाग, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व पॉलिनेशिया ते हवाई द्वीपसमूह आणि जुॲन फर्नांदिस बेटे (चिली) इ. प्रदेशांत आढळतात.