या माहितीपटात श्री. दादासाहेब सावंत, रा. जोहारवाडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर यांनी त्यांच्या घरालगत एक हौद बनवून त्यामध्ये पावसाचे तसेच सांडपाण्याचे पाणी साठवून त्यांच्या शेतातील ९० संत्र्यांच्या झाडानां पाणी पुरविले यामुळे सद्य दुष्काळी स्थितीत देखील त्यांच्या शेतातील सर्व संत्र्याच्या झाडांना कुठलीही झळ पोहोचली नाही तसेच ती चांगली जोपासली गेली आहेत. या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे दर पंधरा दिवसांना सिंचनासाठी १०,००० ली. लागणारे पाणी जे त्यांना विकत घ्यावे लागले असते, त्यांचा तो खर्च वाचला आहे.
हा माहितीपट वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट यांनी तयार केला आहे.
कालावधी २:०८ मिनिटे
स्त्रोत - वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 10/7/2020
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील साधारण...
पाण्याचा ताण पडत असल्यास उभ्या ऊस पिकातील खालची पक...
ठिबकद्वारा पाण्यात विरघळणारी खते दिल्यास खतांचे नु...
पारंपरिक सिंचन पद्धतीची कार्यक्षमता वाढविण्यासाठी ...