অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कृषी पर्यटनस्थळांची निर्मिती

परिचय

ठिकाण पर्यटनस्थळ म्हणून प्रसिध्द होण्यास बराच कालावधी लागतो. त्याचबरोबर पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्या स्थळांची काही वैशिष्ट्र्वेदेखील असावी लागतात. आज महाराष्ट्रातील वेरूळ, अजिंठा येथील लेण्यांतील शिल्पे व चित्रे यांना जागतिक पातळीवर प्रसिद्धी प्राप्त झालेली आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे शिल्पांचे सौंदर्य होय. पायाभूत सुविधा सर्वसाधारणपणे पर्यटनासाठी बाहेर पडणा-या प्रत्येक व्यक्तिच्या प्रवास, निवास, भोजन, करमणूक व इतर सुविधा मिळवण्याबाबत काही किमान अपेक्षा आणि गरजा असतात. पर्यटकाने पर्यटनस्थळावर घालविलेल्या वेळेव्यतिरिक्त इतर वेळेस यापैकी कोणत्यातरी सेवेची आवश्यकता असतें.

अशा प्रकारे पर्यटनस्थळांची प्रसिद्धी व अर्थशास्त्र अशा सेवांच्या समाधानकारक उपलब्धतेवर ब-याच प्रमाणावर अवलंबून असते. म्हणूनच निसर्गसौंदर्य धार्मिक महत्व किंवा अन्य कारणांमुळे एखाद्या ठिकाणचे महत्व फार मोठे असले तरी पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध नसल्यास अशा ठिकाणाला फारशी प्रसिद्धी मिळत नाही. यातूनच पर्यटनस्थळावरील पायाभूत सेवांचे महत्व तुम्हाला समजेल. साधारणपणे पर्यटनस्थळांचा विकास होण्यासाठी पुढील पायाभूत सुविधांची आवश्यकता असते.

  1. वाहतुकीच्या सोयीसुविधा
  2. निवास व भोजन सुविधा
  3. मनोरंजनाचीं साधने/सेवा
  4. संपर्कसेवा
  5. इतर पुरक सुविधा- त्यापैकी काही सुविधा पुढीलप्रमाणे.
  • प्रागण परिसर वेिकास
  • पाणी व दृक्षांची नैसर्गिकता
  • नैसर्गेिक जलखोत (तलाव, अोद्धे, नाले, नर्दी इ.)
  • परिसर मार्गदर्शक व मार्गदर्शक सूचना

कृषी पर्यटनस्थळांचे प्रकार

कृषि पर्यटनस्थळांचे काही वैशिष्ट्चे असतात आणि त्यानुसार त्यांचे वेगवेगळे प्रकारदेखील पडतात. काही ठिकाणांना भेट देण्यामागे जर धार्मिक हेतू अधिक प्रमाणावर असतील तर त्या ठिकाणाला धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. तसेच थंड हवेचे ठिकाण, समुद्रकिना-यावरील ठिकाण, ब्रफॉंवरील खेळांसाठी प्रसिध्द ठिकाण अशी विविध प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण पर्यटनस्थळे आपणास माहिती आहेत.

अशा सर्व प्रकारच्या पर्यटनस्थळांचे महत्व बहुधा रिकाम्या वेळातील अथवा करमणूकीच्या दृष्टीने असते. मात्र कृषि पर्यटन स्थळांच्या प्रकारांचा विचार करताना करमणूक किंवा मनोरंजनासहू ज्ञान माहिती पुरविणारे स्थळ असादेखील मुद्दा लक्षात घ्यावा लागतो आणि हेच कृषि पर्यटनाचे वैशिष्ट्य़ होय. कृषि पर्यटनाचे प्रकार त्यावरून पडतात.

माहितीप्रधान पर्यटनस्थळ

आपल्या देशात जवळपास प्रत्येक राज्यामध्ये कृषि विद्यापीठ तसेच अन्य कृषि संशोधन शिक्षणसंस्था आहेत. महाराष्ट्रामध्ये तर चार कृषेि विद्यापीठे आहेत. ही चार कृषि विद्यापीठे राज्याच्या चार विभागाअंतर्गत काम करतात. त्या-त्या विभागाची वैशिष्ट्चे आणि गरजांनुसार तेथे कृषेि संशोधन, शिक्षण व विस्ताराचे काम चालते. विद्यापीठाच्या मुख्यालयाला भेट दिल्यामुळे कृषिविषयक सर्व संबंधित घटकांची माहिती उपलब्ध होऊ शकते.

कार्यक्षेत्रातील प्रदेशासाठी उपयुक्त असलेल्या पिकांबद्दलचे नविन संशोधन कार्यदेखील कृषि विद्यापिठांमध्ये सुरू असते. असे संशोधन करण्यासाठी योग्य ठिकाणी संशोधन केंद्रे स्थापन केलेली आहेत. त्याचबरोबर राज्यातील विविध कृषि हवामान विभागामध्ये कृषेि संशोधनाद्धारें निर्माण झालेले संबंधित विषयाचे नविन ज्ञान वा माहितीं विविध माध्यमांद्वारे सर्वसामान्य शेतक-यांना उपलब्ध करून दिली जाते.

ज्या व्यक्तिंना कृषि क्षेत्रातील नविन तंत्रज्ञानाची वा प्रगतीची माहिती आवश्यक आहे. अशा व्यक्ती कृषि विद्यापीठे वा संशोधन केंद्रांना भेट देतीलच, परंतु मनोरंजनासाठी पर्यटन करणा-या व्यक्तिंनादेखील त्या ठिकाणच्या आसपासच्या कृषि संशोधन केंद्राला भेट दिल्यास त्यांना समाधान मिळेल. उदा. शिर्डीला जाणा-या पर्यटकांना थोडी सवड काढून राहुरीच्या कृषि विद्यापीठास भेट देता येईल.

महाबळेश्वरला जाणा-या पर्यटकांना गहू गैरवा संशोधन केंद्र बघता येईल. हा काहीसा दुर्लक्षित प्रकार असला तरी पर्यटन व्यावसायिकांना

करमणूकीचे पर्यटनस्थळ

करमणूक अथवा विरंगुळा हे पर्यटनाचे काही प्रमाणात महत्वाचे उद्दिष्ट असते. आज वाढत्या शहरीकरणामुळे मनुष्य निसर्गापासून दुरावत चालला आहे. अशा परिस्थितीमध्ये अनेकदा फावल्या वेळेमध्ये पुन्हा निसर्गाच्या

सानिध्यात काही काळ राहावे, असे अनेकजनांना वाटते. त्यासाठी गिरीस्थान वा समुद्रकिना-यावर काही दिवस राहणे हा एक जुना लोकप्रिय प्रकार आहे. आवश्यक अशा पायाभूत सुविधा निर्माण करून अशा प्रकारे कृषेि पर्यटनस्थळदेखील विकसित करता येईल.

एखाद्या शेतावर किंवा फळबागेमध्ये विश्रांती व भोजनाच्या सोयी उपलब्ध करुन देणे तसेच तेथे पूर्णपणे नैसर्गिक वातावरण राखून ठेवणे किंवा तेथे येणाया पर्यटकांना अस्सल ग्रामीण अनुभव मिळवून देणे (उदा. ग्रामीण पद्धतीचे जेवण. बैलगाडीची सफर, हुरडापार्टी इ.) अशा उपक्रमांद्वारे पर्यटकांचे मनोरंजन होवून त्याद्वारे संयोजकांना उत्पन्नदेखील मिळेल. पुणे शहराच्या आसपास काही ठिकाणी असे उपक्रम सुरु झाले आहेत. त्यांना चांगला प्रतिसाददेखील असल्याचे दिसून येते. अशा प्रकारे पर्यटन, करमणूक आणि निसर्गसानिध्य अशा विविध प्रकारांनी करमणूक पर्यटनस्थळ उपयुक्त असते.

पर्यटनस्थळांचे व्यवस्थापन


पर्यट्न हा उद्योग असल्याने इतर उद्योगांप्रमाणेच त्यांचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करणे आवश्यक असते. त्यामध्ये अनेक प्रकारच्या सेवासुविधांचा समावेश होतो. हे आपणास माहित आहे. व्यवस्थापनाच्या दृष्टीने काही महत्वाच्या बाबींची माहिती पुढील तक्त्यात दिली आहे.

निवास/भोजन /खानपान वाहतूक /प्रवास मनोरंजन /करमणूक इतर /पूरक
हॉटेल, लॉज, वेिश्रामधाम, उद्मश्रेणी हॉटेल,साधारण हॉटेल, वैशिष्ट्यपूर्ण हॉटेल,घरगुती हॉटेल , भोजनालय , फास्टफूड केंद्र
वेिमान, रेल्वे, बस, जहाज खाजगी वाहून उपलब्धता, प्रवास दौरा मार्गदर्शन , यात्रा / सहल आयोजन , वैयक्तिक सहली
स्थलदर्शन, जलक्रेिडा गोल्फ/मैदानी खेळ,व्हिडीओ पार्लर ,फिटनेस सेंटर
भेटवस्तूंचे दुकान, आरोग्य सुविधा, चलन विनिमय, संपर्कसुविधा ,टपालकुरियर (फोन /फॅक्स)इंटरनेटइत्यादी

पर्यटनासंबंधित सेवांचे चार प्रमुख विभागामध्ये वर्गीकरण करता येऊ शकते. हे वरील तक्त्यावरून आपल्या लक्षात येईल. त्याप्रत्येकाबद्दल आपण थोडक्यात माहिती স্নাল ক্লািস্তয়া, निवास/भोजन/खानपान सेवा हा विभाग सर्वात महत्वाचा समजला जातो. पर्यट्कांच्या आर्थिक कुवतीनुसार तसेच त्यांच्या गरजांनुसार ठराविक पद्धतीची निवास व भोजन सुविधा उपलब्ध करुन देणे, ही पर्यटनस्थळ व्यवस्थापनातील महत्वाची बाब आहे.

वाहतूक/प्रवास सुविधांचा व्यवस्थापनाची गरज सर्व टप्प्यांवर असते. त्यामध्ये प्रामुख्याने प्रवासाच्या सुरुवातीचे व परतीचे आरक्षण यांचा समावेश होतो. तसेच स्थलदर्शनाच्या वेळेला आवश्यकतेनुसार स्थानिक प्रवास/ वाहतूकीच्या सोयी उपलब्ध करून देणे, याचादेखील समावेश होतो. मनोरंजन/ करमणूकीसाठी विविध खेळ. स्थलदर्शक यांचा समावेश होतो.

पर्यटनसेवांमधील ही एक उपयुक्त सेवा आहे. पर्यटकांना उपलब्ध असलेल्या वेळेमध्ये जास्तीतजास्त ठिकाणे बघता यावीत व त्याचा ताणदेखील जाणवणार नाही, असे कौशल्यपूर्ण नियोजन या सेवेसाठी आवश्यक असते. इतर पूरक सुविधेमध्ये खरेदीची ठिकाणे, चलन विनिमय, संपर्कसेवा यांसारख्या सेवा अंतर्भूत असतात. अशाप्रकारे कृषि पर्यटनस्थळांच्या निर्मितीमध्ये मुलभूत सेवा-सुविधांचा व विविध घटकांचा समावेश आपणास करता येईल.


स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

 

अंतिम सुधारित : 8/8/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate