অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जी. आय. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया

जी. आय. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया

क. अर्ज आणि अर्जावर सही करणे

• भौगोलिक चिन्हांकन नोंदणीसाठीचा प्रत्येक अर्ज विहित नमुन्यात करावा. (जी. आय.- 1 ए ते आय डी) आणि त्यासोबत निश्चित करण्यात आलेले शुल्क  असावे. (रु. 5,000/-)

• अर्जदाराची किंवा त्याच्या एजंटची त्यावर सही असावी.

• केसच्या निवेदनाच्या (In Statement of Case) तीन प्रती असाव्यात. त्यासोबत पाच अतिरिक्त सादरीकरणेही असावीत.

ख. शुल्क

• शुल्क रोख स्वरूपात, मनीऑर्डर स्वरूपात, बँक ड्राफ्टद्वारे किंवा धनादेशाद्वारे भरता येऊ शकते.

• बँक ड्राफ्ट्स किंवा धनादेश असतील, तर ते क्रॉस्ड (रेखांकित) असावेत आणि भौगोलिक चिन्हांकन कार्यालयातील योग्य त्याच विभागातील नोंदणी अधिकार्याच्या (रजिस्ट्रारच्या) नावे काढलेले असावेत.

• भौगोलिक चिन्हांकन नोंदणीचे कार्यालय जिथे असेल, तिथल्याच शेड्यूल्ड बँकेद्वारे ते बँक ड्राफ्ट्स वा धनादेश काढले जावेत.

• जर शुल्काखेरीज किंवा अपु-या शुल्कासह कागदपत्रे दाखल केली गेली, तर ती कागदपत्रे दाखल केली गेली नाहीत असे समजले जाईल.

क. आकार

• सर्व अर्ज हे हिंदीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये टाईप केलेले, {लथोग्राफ केलेले किंवा {प्रंट केलेले (छापलेले) असावेत.

• जाडसर कागदाच्या एकाच बाजूला मोठ्या, सुवाच्च अक्षरात, ठळक अशा कायमस्वरूपी शाईने लिहिलेला मजकूर असावा.

• कागदाचा आकार सुमारे 33 बाय 20 सेंटिमीटर असावा आणि दोन्ही बाजूंना किमान 4 सेंटिमीटरचा समास सोडलेला असावा.

घ. कागदपत्रांवर सह्या

• कागदपत्रांवर पुढीलप्रमाणे सह्या घेतल्या जाव्यात.

- व्यक्तींची किंवा उत्पादकांची संघटना असेल, तर संघटनेच्या वतीने सही करण्याचा अधिकृत अधिकार असलेल्या व्यक्तीकडून सह्या घ्याव्यात.

- कायदेशीररीत्या स्थापन झालेली कोणतीही अधिकृत यंत्रणा, कोणतीही संघटना, कार्पोरेट समिती आदींचे मुख्य कार्यकारी अधिकारी/व्यवस्थापकीय संचालक किंवा स{चव/इतर मुख्य अधिकारी यांच्या सह्या घ्याव्यात.

- भागीदारी असेल, तर किमान एका भागीदाराच्या तरी सह्या असाव्यात.

• कोणत्या अधिकाराने संबंधित व्यक्ती कागदपत्रावर सही करत आहे, त्याविषयीची माहिती सहीखाली असावी.

• सह्यांसोबतच सही करणार्याचे नाव मोठ्या (कॅपिटल) अक्षरांत इंग्रजीमध्ये किंवा मोठ्या अक्षरांत हिंदीत लिहिलेले असावे.

ङ. व्यवसायाचे भारतातील मुख्य ठिकाण

• जी. आय.च्या नोंदणीसाठी केलेल्या प्रत्येक अर्जावर आपल्या व्यवसायाचे भारतातील मुख्य ठिकाण कुठे आहे, याचा उल्लेख असावा.

• उद्योगाच्या संचालक मंडळातील (कॉर्पोरेट बॉडीतील) लोकांची संपूर्ण नावे सांगावीत आणि त्यांचे राष्ट्रीयत्व सांगावे.

• आपल्या मायदेशी व्यवसायाचे मुख्यालय असलेल्या परदेशी अर्जदारांनी आणि व्यक्तींनी भारतातील सेवेसाठी भारतातील पत्ता द्यावा.

• तत्कालीन अमलात असलेल्या कोणत्याही कायद्याअंतर्गत किंवा नियमाअंतर्गत स्थापन झालेली कोणतीही कॉर्पोरेट समिती, संघटना किंवा अधिकारी यंत्रणा यांनी समाविष्ट देश किंवा नोंदणीचे स्वरूप यांपैकी जे काही लागू होत असेल; त्याची माहिती नमूद करावी.

च. नोंदणीसाठीच्या (कन्व्हेन्शनच्या) अर्जात पुढील गोष्टींचा समावेश असावा.

• करारबद्ध देशातील (convention country) भौगोलिक चिन्हांकन नोंदणी कार्यालयाचे (जिऑग्राफिकल इंडिकेशन्स ऑफिसच्या रजिस्ट्रीचे) किंवा समकक्ष अधिकार्याचे प्रमाणपत्र.

• भौगोलिक चिन्हांकनाचा तपशील, अर्जदार देश आणि पहिला अर्ज दाखल केल्याची तारीख किंवा तारखा.

• अर्जदाराने त्याच भौगोलिक चिन्हांकनासाठी आणि सर्व किंवा काही मालांसाठी केलेला करारबद्ध देशातील (convention country) तो पहिलाच अर्ज असावा.

• विदेशी अर्ज दाखल केल्याची तारीख, अर्ज दाखल करण्यात आलेला (करणारा) करारबद्ध देश (convention country), उपलब्ध असल्यास अनुक्रमांक या सर्वांचा समावेश असलेले निवेदन अर्जासोबत असावे.

छ. अर्जामधील वापरकर्त्याचे निवेदन

भौगोलिक चिन्हांकनाची नोंदणी करण्यासाठी करण्यात आलेल्या अर्जामध्ये प्रतिज्ञापत्रासह वापरकर्त्याचे निवेदन समाविष्ट असावे.

ज. अर्जातील माहिती

प्रत्येक अर्ज हा विहित नमुन्यातील अर्जाद्वारेच (नमुन्यातच) केला जावा आणि त्यात पुढील गोष्टींचा समावेश असावा.

• विशिष्ट गुणधर्मांच्या, लौकिकाच्या किंवा इतर गुणवैशिष्ट्यांच्या साहाय्याने उत्पादित माल हा मूळच्या संबंधित प्रदेशातील असल्याचे भौगोलिक चिन्हांकनाद्वारे ठरवणे कसे शक्य आहे याविषयीचे निवेदन.

• भौगोलिक चिन्हांकनाशी संबंधित असलेल्या मालाच्या वर्गाच्या तीन प्रमाणित प्रती.

• परिसराचा किंवा क्षेत्राचा भौगोलिक नकाशा.

• भौगोलिक चिन्हांकन शब्दांचे किंवा लाक्षणिक घटकांचे किंवा दोन्हींविषयींचे तपशील.

• संबंधित मालाच्या उत्पादकांचे प्रस्तावास सुरुवातीला विरोध करण्याजोगे असलेले प्रस्तावित तपशिलाचे {नवेदन. यामध्ये ज्याच्या आधारावर निवेदन तयार करण्यात आले असेल, त्या मालांच्या सर्व उत्पादकांच्या सामूहिक संदर्भाचाही समावेश असेल.

• अर्जासोबत असलेल्या निवेदनात पुढील बाबींचा समावेश असावा:

- कोणताही नोंदणीकृत व्यक्तिसमूह किंवा उत्पादक संघटना किंवा अधिकृत यंत्रणा आपण उत्पादकांच्या हिताचे प्रतिनिधित्व कसे करत आहोत, याबाबतचा उलगडा करणारे शपथपत्र.

- मालामध्ये विशिष्ट गुणधर्म, लौकिक किंवा इतर विशेष गुणधर्म असल्याचे त्याच्या भौगोलिक मुळामुळे स्पष्ट होत असल्याचे दर्शवणारी भौगोलिक निदर्शकाच्या वापरासाठीची मानांकित प्रमाणे किंवा उद्योग मानांकने यांचे तपशील. यामध्ये मानवी सर्जनशीलता असेल किंवा इतर गुणधर्म असतील, तर त्यांचाही समावेश असावा.

- उत्पादकांनी किंवा मालाची निर्मिती करणार्या कारागिरांनी त्या मालाचा दर्जा, त्याची गुणवत्ता, एकात्मता, त्याचे उत्पादनातील सातत्य आणि त्याची इतर विशेष गुणवैशिष्ट्ये जपली आहेत, याची खातरी देण्यासाठी वापरात आणलेल्या पद्धतीचे तपशील द्यावेत.

- संबंधित क्षेत्र, विभाग किंवा स्थान यांच्या नकाशांच्या तीन प्रमाणित प्रती जोडाव्यात.

- उत्पादन घेण्यात किंवा वस्तु{नर्मितीत अंतर्भूत असलेल्या खास मानवी कौशल्याचे तपशील किंवा भौगोलिक वातावरणाचा आगळेवेगळेपणा किंवा भौगोलिक चिन्हांकनाशी संलग्न असलेले इतर स्वाभाविक गुणधर्म यांचे तपशील द्यावेत.

- संबंधित मालांच्या उत्पादकांच्या हिताचे प्रतिनिधित्व करणारी व्यक्तींची संघटना किंवा संस्था किंवा अधिकारी यंत्रणा यांचे पूर्ण नाव द्यावे आणि त्यांचा पत्ता द्यावा.

तपासणी रचनेचे तपशील

चिन्हांकनासाठीच्या उत्पादनाचे साधर्म्य दुसर्या चिन्हांकित उत्पादनाच्या नावाशी असल्यास नोंदणीकृत भौगोलिक चिन्हांकनाच्या अर्जात नमूद करण्यात आलेले भिन्नत्व दर्शवणारे घटक आणि संरक्षणात्मक उपाययोजनांचे तपशील यांचा विचार केला जाईल.

झ. अर्जाची पोहोचपावती देणे

• कोणत्याही मालाच्या संदर्भातील भौगोलिक चिन्हांकन नोंदणीच्या कोणत्याही अर्जाची नोंदणी अधिकार्याकडून (रजिस्ट्रारकडून) पोहोचपावती दिली जाईल.

• त्यानंतर अधिकृतपणे एखाद्या अर्जाचे पुन्हा एखादे अतिरिक्त सादरीकरण केले गेल्यास या पोहोचपावतीमुळे एक सादरीकरण परत दिले जाईल.

स्रोत: http://www.ipindia.nic.in/ या संकेतस्थळावरील अंशात्मक माहितीचा मुक्त अनुवाद.

माहिती स्रोत: वनराई

अंतिम सुधारित : 6/6/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate