1) बागेला 15 लिटर प्रति झाड प्रति दिवस याप्रमाणे पाणी द्यावे.
2) बाग तणमुक्त ठेवावी. बागेतील पानफुटवे काढत राहावे.
3) बागेतील रोगट फळे काढून नष्ट करावीत.
4) फळ पोसण्यासाठी पुरेशी हवा व सूर्यप्रकाश मिळावा म्हणून ज्या बागांमध्ये फांद्यांची घनता जास्त असेल, तेथे फांद्यांची विरळणी करावी.
1) बागेतील फळांवर बॅक्टेरिअल ब्लाइट, बुरशीजन्य ठिपके व रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास स्ट्रेप्टोमायसीन (0.5 ग्रॅ./ लि.) + कॉपर ऑक्सिक्लोराईड (77 टक्के डब्लू.पी.) दोन ग्रॅम प्रति लिटर + निंबोळी बियांची भुकटी 50 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात संयुक्तिक फवारणी करावी.
2) खोड पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास अशा अळीच्या खोडांवरील छिद्रांमधील भुसा सुईने काढून, त्यात दोन मि.लि. डायक्लोरव्हॉस प्रति लिटरचे द्रावण सिरिंजने सोडावे व ते छिद्र ताबडतोब चिखलाने बंद करावे.
1) बागेला 15 लिटर प्रति झाड प्रति दिवस याप्रमाणे पाणी द्यावे.
2) बाग तणमुक्त ठेवावी व बागेतील पानफुटवे काढत राहावेत.
3) बागेला एकदा कुळवाची पाळी द्यावी.
1) बागेत बॅक्टेरिअल ब्लाइट रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास (0.5 टक्के) बोर्डेक्स मिश्रणाची फवारणी करावी.
2) मावा, फुलकिडी या किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास वरील फवारणीच्या आठ दिवसांनंतर इमिडाक्लोप्रिड (17.8 टक्के एस.एल.) 0.3 मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
आंबिया बहर विचारात घेता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत छाटणी पूर्ण करावी. छाटणी करताना खालील बाबी विचारात घ्याव्यात.
1) बागेची छाटणी धारदार निर्जंतुक कात्रीने करून घ्यावी.
2) छाटणी करताना झाडांचा आकार, फांद्यांची घनता विचारात घेऊनच छाटणी करावी.
3) पेन्सिल व रिफिलच्या आकाराच्या फांद्या तशाच ठेवून उपफांद्यांचे शेंडे छाटावेत.
4) मुख्य खोडावरील / फांदीवरील एक ते दोन इंच लांबीचे एकेरी काटे व सोटफाटे काढून टाकावेत.
5) छाटणीसाठी रोगट / तेलकट रोगग्रस्त बाग छाटून आलेले मजूर किंवा कात्री निरोगी बागेत वापरू नये.
6) छाटणी झाल्यानंतर सर्व कचरा लगेचच उचलून बागेच्या बाहेर नेऊन जाळावा.
7) आडवी व उभी अशा दोन फणांच्या व एक कुळवाची पाळी करावी.
8) ज्या बागांमध्ये वारंवार रस शोषणाऱ्या पतंगांचा प्रादुर्भाव होतो. अशा बागांमध्ये आंबिया बहर उशिरा धरू नये.
9) शिफारस केलेल्या खतांची मात्रा झाडापासून 30 ते 45 सें.मी. अंतरावर वर्तुळाकार माती उकरून त्यात टाकावी.
10) नत्राची मात्रा दोन ते तीन टप्प्यांत द्यावी. पहिली मात्रा 21 ते 30 दिवसांच्या अंतराने विभागून द्यावी.
11) सूक्ष्म अन्नद्रव्य (जस्त, लोह, मॅग्नेशिअम, बोरॉन) झाडाच्या वयानुसार 25 ते 50 ग्रॅम प्रति झाड याप्रमाणे शेणखतासोबत मिसळून द्यावे. गांडूळ खत अर्धा ते एक किलो प्रति झाड, तसेच निंबोळी पावडर 500 ग्रॅम प्रति झाड या प्रमाणात द्यावे.
12) खते टाकून झाल्यावर लगेचच मातीने झाकून घ्यावी. बागेला हलके पाणी देऊन नियमितपणे ओलिताचे पाणी चालू करावे.
13) फळांना चकाकी येण्यासाठी, फळ काढणीच्या एक महिना आधी कॅल्शिअम नायट्रेट 12.5 किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात 15 दिवसांच्या अंतराने दोन वेळा ठिबकमधून सोडावे.
14) महिन्यातून एकदा खुरपणी करावी, तसेच मुख्य खोडावर आलेले पानफुटवे (वॉटरशूट) काढत राहावे.
1) प्रत्येक झाडाच्या छाटणीनंतर, कात्री सोडिअम हायपोक्लोराईट 2.5 मि.लि. प्रति लिटर पाण्याच्या या द्रावणात बुडवून निर्जंतुक करून घ्यावी.
2) छाटणी झालेल्या प्रत्येक फांदीवर छाटलेल्या जागी दहा टक्के बोर्डेक्सची पेस्ट लावावी.
3) पानगळ करून घ्यावी.
संपर्क ः 0217 - 2374262
श्री. चौधरी, 9623444380
राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
सांगली जिल्ह्यातील कासेगाव (ता. वाळवा) येथील संपतर...
नैसर्गिक आपत्तीने अनेक वेळा दस्तक दिल्यानंतर आता र...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
ही गोष्ट आहे अकोल्याच्या ज्योतीताईंची...! अकोला जि...