भारतीय स्वातंत्र्यापासून महाराष्ट्र हे देशाच्या कृषी व औद्योगिक विकासाचे उर्जास्त्रोत आहे. देशातील सर्वात श्रीमंत व प्रगतशील राज्यांमध्ये गणला जाणारा महाराष्ट्र, राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला चालना देणारे राज्य असून परकीय गुंतवणुकीसाठी प्रधान्याने निवडले जाते. देशाच्या दहा टक्क्यांहून कमी क्षेत्रफळ व लोकसंख्या असलेले या राज्याचे राष्ट्रीय स्थूल उत्पादनामधील योगदान १२.४% इतके आहे.
भारतीय कृषी क्षेत्रातील महाराष्ट्राचे योगदान महत्वपूर्ण आहे. प्रामुख्याने कृषिप्रधान अर्थव्यवस्था असणाऱ्या या राज्याची २/३ लोकसंख्या शेती व शेतीपूरक व्यवसायांमध्ये गुंतलेली आहे. देशातील ४४.३% सिंचनाखालील क्षेत्राच्या तुलनेत महाराष्ट्रातील लागवडीखालील एकूण क्षेत्राच्या १८.९% क्षेत्र सिंचनाखाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या द्रष्ट्या व सर्वसमावेशक धोरणांमुळे विकासाला चालना मिळाली असून राज्य प्रगतीपथावर आहे.
महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाची स्थापना १५ डिसेंबर १९६५ रोजी कंपनी कायदा १९५६ नुसार झाली. स्थापनेपासूनच कंपनीनेने शेतकरी बांधवांना कृषी उत्पादन वाढीसाठी सदैव सामर्थ्य दिले आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी खते, कीटकनाशके, कृषी अभियांत्रिकी अवजारे व पशुखाद्य गरजेनुसार वेळेत व वाजवी दरामध्ये उपलब्ध व्हावे हे या महामंडळाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
कंपनी दाणेदार मिश्र खतांच्या (एन.पी.के.) उत्पादनामध्ये कार्यरत असून रसायनी (जि.रायगड), पाचोरा (जि.जळगाव), नांदेड, वर्धा आणि कोल्हापूर येथे महामंडळाचे खतांचे कारखाने आहेत. अकोला व लोटे (जि.रत्नागिरी) येथे महाराष्ट्र इनसेक्टिसाईडस् लिमिटेड ही महामंडळाची गौण कंपनी असून येथे कीटकनाशकांचे सुत्रीकरण व उत्पादन केले जाते.
स्वतःची खते व कीटकनाशके 'कृषीउद्योग' या 'ब्रँड नेम' खाली उत्पादित करून विकण्याव्यतिरिक्त इतर नामवंत उत्पादकांची पूरक उत्पादने देखील महामंडळाद्वारे स्वतःच्या १५०० वितरकांच्या विस्तीर्ण 'डीलर नेटवर्क' द्वारे महाराष्ट्रभर वितरित करण्यात येतात.
कंपनीचे स्वतःचा संशोधन व विकास विभाग असून या विभागाने अत्यंत उपयुक्त व ग्राह्यता लाभलेली बहु-उद्देशीय कृषी अवजारे विकसित केली आहेत. 'कृषीवेटर' हे ट्रॅक्टर संचलित अवजार त्यांपैकीच एक आहे. नविन विकसित अवजारे व चांगल्या व सुधारित रचनांची अवजारे तपासण्यासाठी व त्यांच्या विक्रीसाठी कंपनी सतत राज्यातील कृषी विद्यापीठे व केंद्रीय संस्थांच्या संपर्कात असते. चिंचवड, पुणे कंपनीचा कृषी-अभियांत्रिकी कारखाना आहे.
चिंचवड, पुणे व यवतमाळ येथे कंपनीचे पशुखाद्य उत्पादन कारखाने असून पौष्टिक पशुखाद्यांची निर्मिती व वितरण केले जाते. आवश्यकतेनुसार पशुखाद्य उत्पादनांमध्ये संयोजन अथवा बदल देखील कर्ता येतील.
कंपनीच्या नागपूर येथील कारखान्यामध्ये फ्रूट ज्यूसेस, स्क्वॅशेस, सिरप्स, जॅमस्, केचप्स्, इ. उत्पादने 'नोगा' या 'ब्रँड नेम' खाली तयार केळी जातात.
कंपनीचे मुख्यालय मुंबई येथे असून रत्नागिरी, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, पुणे औरंगाबाद, नांदेड उस्मानाबाद अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि ठाणे येथील तेरा विभागीय कार्यालायांद्वारे राज्यभर कामकाज चालते.
केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयाद्वारे महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाची महाराष्ट्र राज्याची 'स्टेट नोडल एजन्सी' म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्याची 'स्टेट नोडल एजन्सी' या नात्याने महामंडळ, अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या योजनांचा लाभ घेण्यास पात्र उद्योजकांद्वारे मंत्रालयाकडे करण्यात येणाऱ्या प्रस्तावांची तपासणी करून त्याबाबत शिफारस करते. त्याबरोबरच, महामंडळाद्वारे उद्योजकांना प्रकल्प तयार करणे, जागा निवडणे, इ. बाबींमध्ये सहकार्य केले जाते. लहान व मध्यम अन्न प्रक्रिया प्रकल्पांना सामाईक पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी बुटीबोरी, नागपूर येथे महामंडळाने 'फूड पार्क' विकसित केले आहे. मुंबई येथे फुलांचे लिलाव गृह विकसित करण्यासाठी महामंडळ प्रयत्नशील आहे.
महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ
स्त्रोत : मराठी
अंतिम सुधारित : 9/1/2020
नगर जिल्ह्यातील बलभीम पठारे यांना पारंपरिक पीक पद्...
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
प्रगतिशील शेतकरी कुलदीप राजाराम राऊत यांनी विदर्भा...