महाराष्ट्राच्या अर्थकारणात साखर उद्योगाचा मोठा वाटा आहे. त्याचमुळे या उद्योगाच्या गरजा लक्षात घेत, सहकार विभागांतर्गत एका स्वतंत्र साखर संचालनालयाची निर्मिती करण्यात आली. 1991-92 साली त्याला आयुक्तालयाचा दर्जा बहाल करण्यात आला. साखर उद्योग, ग्रामीण महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचा केंद्रबिंदु राहिला आहे. त्याचमुळे राज्याच्या सामाजिक, आर्थिक विकासात साखर आयुक्तालयाची भूमिका महत्त्वाची ठरते. साखर आयुक्तालय विकासाभिमुख आणि नियामक अशी दुहेरी भूमिका बजावते. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम,1960 अंतर्गत साखर आयुक्तांचे अधिकार आणि कर्तव्ये निबंधकाच्या समकक्ष आहेत.
कृषी क्षेत्रामध्ये शेतक-यांच्या उत्पन्नात साखर उद्योगाचा सिंहाचा वाटा असतो. साखर उत्पन्नाबाबत 33% उत्पादनासह जगात ब्राझील प्रथम क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ भारत 16%, चीन 9%, थायलंड 6%, मेक्सिको 4% तर, इतर देशांतील साखर उत्पन्नाचे एकत्रित प्रमाण 32% इतके आहे. देशात साखर उत्पादनाच्या क्षेत्रात महाराष्ट्राचा सर्वांत मोठा (35%) वाटा आहे. गेल्या 50 वर्षांत महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रांतर्गत साखर उद्योगाने कृषी अर्थकारणात मोठी मजल मारली आहे.
स्त्रोत : साखर आयुक्तालय महाराष्ट्र, पुणे
अंतिम सुधारित : 6/5/2020
सन १८८१ च्या फ़ेमीन कमीशनने शिफ़ारस केल्यानुसार जुर्...
मोठी गुंतवणूक करून एखादा कृषी प्रक्रिया उद्योग उभा...
जुलै-१९७० मध्ये क्रीडा व युवक सेवा या स्वतंत्र संच...
या भागात महाराष्ट्र राज्याविषयी माहिती दिली आहे.