जागतिक पशुवैद्यक संघटनेचे प्रमुख ध्येय म्हणजे पशू आरोग्य, देशभाल, त्याचबरोबरीने मानवी आरोग्याबाबत जागृती आणणे. त्यासाठी संशोधनाच्या माध्यमातून योग्य उपचार पद्धतीचा विकास, औषधेनिर्मितीवर भर देण्यात आला आहे. येत्या काळात पशू आरोग्य आणि संगोपनाच्या दृष्टीने पशुवैद्यक नवीन नियमावली तयार करीत आहेत. त्याचबरोबरीने जागतिक पशू आरोग्य संघटनेच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, संशोधन आणि संस्थेची कार्यपद्धती याबाबतही विशेष नियमावली तयार होत आहे.
दर वर्षी एप्रिल महिन्याचा शेवटचा शनिवार हा जगभरात पशुवैद्यक दिन म्हणून साजरा केला जातो. इंग्लंडमधील प्रा. जॉन गमजी यांनी 14 ते 18 जुलै 1863 मध्ये जर्मनीमधील हॅम्बुर्ग येथे युरोपमधील पशुवैद्यकांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये आंतरराष्ट्रीय पशुवैद्यक कॉंग्रेसची स्थापना झाली. या कॉंग्रेसचे पुढे जागतिक पशुवैद्यक संघटनेमध्ये रूपांतर झाले. ही संघटना जगभरातील पशुवैद्यकांचे प्रतिनिधित्व करते. जगभरातील 90 राष्ट्रीय पशुवैद्यक संघटना आणि 12 जागतिक पशुवैद्यक संघटना या संघटनेशी जोडलेल्या आहेत. या दिवशी विशेष कार्यक्रमांच्या माध्यमातून पशुवैद्यकांना विशेष गुणवत्ता पारितोषिकांने सन्मानित करण्यात येते.
जनावरे ही आपल्या शेती, संस्कृती आणि आरोग्याचा आधार. पशुपालनाने खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला आर्थिक ताकद दिली. गेल्या काही वर्षांत मानवी आरोग्याबाबत जग जसे जागरूक झालेय,त्याचप्रमाणे आपल्याकडे असणाऱ्या जनावरांचे आरोग्य, आहार, त्यांचा सांभाळ याबाबत जागरुकता आली आहे. जसे आपण डॉक्टरांना आपल्या घरचाच सदस्य मानतो, त्याच पद्धतीने पशुपालक आणि पशुवैद्यकाचे संबंध असतात. त्यातूनच पशुपालक आपल्या गोठ्यातील जनावरांच्या आरोग्याबाबत निर्धास्त असतो. त्यामुळे यंदाच्या जागितक पशुवैद्यक दिनाचे घोषवाक्य आहे "जनावरांची योग्य देखभाल'. या घोषवाक्याच्या माध्यमातून पशुवैद्यकाचे जनावरांच्या आरोग्याच्या दृष्टीने कसे महत्त्वाचे स्थान आहे हे अधोरेखित होते.
जागतिक पशुवैद्यक संघटनेचे प्रमुख ध्येय म्हणजे पशू आरोग्य, देशभाल, त्याचबरोबरीने मानवी आरोग्याबाबत जागृती आणणे. त्यासाठी संशोधनाच्या माध्यमातून योग्य उपचार पद्धतीचा विकास, औषधेनिर्मितीवर भर देण्यात आला आहे. येत्या काळात पशू आरोग्य आणि संगोपनाच्या दृष्टीने पशुवैद्यक नवीन नियमावली तयार करीत आहेत. त्याचबरोबरीने जागतिक पशू आरोग्य संघटनेच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, संशोधन आणि संस्थेची कार्यपद्धती याबाबतही विशेष नियमावली तयार होत आहे.
सन 2015 मध्ये 32 वी जागतिक पशुवैद्यक कॉंग्रेस तुर्की देशाची राजधानी इस्तंबूलमध्ये होणार आहे.
जागतिक पशुवैद्यक संघटनेमध्ये 80 हून अधिक देशांतील पशुवैद्यक संघटनांचा सहभाग आहे. त्याच बरोबरीने विभागनिहाय, विषयनिहाय संघटनांचाही सहभाग आहे. या माध्यमातून जगभरातील पशुवैद्यक क्षेत्रातील संशोधन, शिक्षण आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण केली जाते. जनावरे, तसेच लोकांच्या आरोग्याचे रक्षण हे या संघटनेचे प्रमुख ध्येय आहे. जागतिक पशुवैद्य संघटना ही जागतिक अन्न संघटना, जागतिक आरोग्य संघटना यांच्या बरोबरीने विविध उपक्रमांत सहभागी असते.
- फाऊझी किचरीड,
अध्यक्ष, जागतिक पशुवैद्यक संघटना
स्त्रोत : अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...
हि चित्रफित दूरदर्शन सह्यादी वाहिनीने तयार केली आह...
उन्हाळ्यातील वाढत्या तापमानाकडे दुर्लक्ष करून चालण...
गाईपेक्षा म्हशींना उष्णतेचा त्रास जास्त होतो. उष्ण...