गडचिरोली जिल्ह्यात जंगलाचे ७८ टक्के क्षेत्र असून बांबू मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असल्याने वनविभागातर्फेत अगरबत्ती प्रकल्प जिल्ह्यात राबविण्यात येत आहे .मार्च २०१२ पर्यंत वनविभागाने गडचिरोली जिल्ह्यात ८ गावात ८ प्रकल्प सुरु झालेले आहेत. सदर प्रकल्पात प्रती युनिट २० महिलांना रोजगार देण्यात येत असून प्रती महिला २५००-३००० रुपये मासिक उत्पन्न मिळत आहे. यापूर्वी सदर युनिट संयुक्त वनव्यवस्थापन समितीद्वारे राबविण्यात येत असल्याने गावस्तरीय वाद निर्माण झाले व प्रकल्पात अडचणी येऊ लागल्या. तसेच वनविभागाने सहयोगिनीद्वारे गावातील महिला निवडून त्यांना रोजंदारीवर सेंटर वर काम करीत होते. वन विभागकडून मशीन खरेदी व सर्व व्यवस्थापन निधी JFM समितीच्या खात्यात जमा होत असल्याने सर्व नफा JFM समितीला मिळत होता.
गडचिरोली अगरबत्ती प्रकल्पात असलेल्या ४२ गावांपैकी ३० गावात माविमचे व RNGO चे काम आहे. व उर्वरित १३ गाव CMRC च्या क्लस्टर्स मध्ये येत असल्याने मा.मुख्य वनरक्षक प्रादेशिक यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्याप्रमाणे त्यांनी प्रथम वर्षी माविक कार्यरत ४२ गावात अगरबत्ती सेंटर सुरु करण्याचे लक्ष्य आहे. लाईव्हलिहुड घटकात प्रोड्यूसर गट निर्मिती चे लक्ष असल्याने महिला आर्थिक विकास महामंडळाकडून प्रोड्यूसर गट तयार करण्यात आला. व त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्याकरिता वनविभागाकडून ५००० रुपये प्रती गट स्थापनेकरीता वनविभागाकडून ४२ गटाकरिता २,१०,००० रुपये प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये १००० रुपये CMRC चा नफा असून उर्वरित ४००० रुपये गट स्थापना व सनियंत्रण करिता खर्च करण्यात येणार आहे. तसेच प्रती सेंटर २० महिला प्रमाणे ८४० महिलांना रोजगार प्राप्त होईल .
प्रत्येक सेंटरवर एक सुपरवायजरची नेमणूक करण्यात येईल व त्याचे मानधन ४००० रुपये असेल. जिल्हा पातळीवर १ लेखापाल असेल त्याचे मानधन रुपये ६००० असेल. सदर पदे माविम मित्र मंडळातील पुरुषांना मिळणार असून हि सर्व प्रक्रिया वनविभागामार्फत होणार आहे व अगरबत्ती प्रकल्प CMRCद्वारे राबविण्यात येत असून गावातील CRP द्वारे चालविण्यात येईल.
ये प्रमाणे ४२ सेंटर करिता २१,०००/- रुपये उत्पन्न प्राप्त त्यामधून १००० रु. प्रती सेंटर नफा होईल व वनविभागामार्फत मोठे कृती संगम सध्या होणार आहे. जिल्ह्यात लाख लागवडी करिता सुद्धा प्रस्ताव प्रक्रिया सुरु आहे.
२. लोक संचलित साधन केंद्राला गटाकडून नियमित सेवा शुल्क प्राप्त होईल.
३. लोक संचलीत साधन केंद्र मधील महिलांना नियमित रोजगार प्राप्त होईल.
४. १२ लोक संचलीत साधन केंद्र मध्ये ४२ सेंटर करिता ८ प्रति सेंटर प्रमाणे ३ कोटी ३६ लाख रुपये प्रोड्यूसर गटाला वनविभागाकडून प्राप्त होईल.
५. विमा, आर.डी. या योजनामार्फत मायक्रोफायनान्स घटकाचे लक्ष्य पूर्ण होण्यास मदत होईल.
६. गावातील CRP चा विकास साधण्याची संधी प्राप्त होईल.
सदयःस्थिती एकूण ५ गावात अगरबत्ती प्रकल्प सुरु झालेले असून त्यामध्ये महिला बचत गटात १०१ सभासद सहभागी झाले आहेत. प्रत्येक महिला प्रति दिवस १५ ते १७ किलो अगरबत्ती तयार करते. त्याकरिता त्यांना १० रुपये प्रति किलो प्रमाणे मजुरी प्राप्त होते. तसेच युनिटला होणारा फायदा वर्षाच्या शेवटी वाटप करण्याचे नियोजित आहे.
संपूर्ण युनिट सुरळीत चालविण्याकरिता व बाजारपेठाकरिता वनविभागाने व्हिलेज स्टोअर संस्था, मुंबई येथील कन्सल्टंन्ट श्री. विपुलकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. व त्यांच्यामार्फत ४० बॅग याप्रमाणे १०१ महिलांचे सरासरी १५ख़ीळ प्रति दिवस प्रमाणे १५१५ किलो प्रति दिवस अगरबत्ती कंपनीला पाठविण्यात येते.
लेखक: श्रीमती. कांता मिश्रा, मविम, गडचिरोली
स्त्रोत: आपले आदर्श गाव
अंतिम सुधारित : 1/29/2020
कुशल व्यवस्थापन, तरुण नेतृत्व, प्रभावी योजना यामधू...
वर्धा येथील अभियंता विनोद राजगुरे हीच अंबाडी शेतकऱ...
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...
गणेश घोरपडे यांनी जिल्ह्यातील सातारा, वाई आणि खंडा...