অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सौ. चंद्रकलाबाईच्या कष्टाला कृषी विभागाची जोड

मौजे बच्छेरा, ता. पारशिवनी, जि. नागपूर हे गाव नागपूरपासून अवघे ५० कि.मी. अंतरावर असून हा भाग अतिदुर्गम समजला जातो. चक्रवर्ती हे कुटुंब मूळचे जबलपूर, मध्यप्रदेशचे असून व्यवसायानिमित ते मौजे बच्छेरा येथे स्थायिक झालेले आहे. उदरनिर्वाहासाठी त्यांनी कष्टातूनच नऊ एकर शेती घेतली.

शेतीच्या नफ्यातूनच मुलांचे शिक्षण सी. चंद्रकलाबाई यांना चार मुले असून एक मुलगा डॉक्टर व एक मुलगा वकील आहे. शेतीच्या उदरनिर्वाहातूनच मुलांना शिक्षण दिले. इतर दोन मुलांपैकी एक शेतीबरोबरच स्वतःचे ट्रॅक्टर भाड्याने देण्याचा व्यवसाय करतो. तर दुसरा मुलगा आईला शेतीकामात मदत करतो.

शेणखतासाठी व गोमूत्रासाठीच गाईंचे संगोपन

आज सी. चंद्रकलाबाई यांच्याकडे २० देशी गाई आहेत. यापासून मिळणा-या शेणाखताचा, गोमूत्राचा शेतीसाठी वापर केला जातो. गाईचे दूध कुटुंबासाठीच वापरले जाते व उरलेले दही, ताक, तूप बनवण्याकरीता वापरले जाते. दुधाची विक्री केली जात नाही.

मातीपासून मूर्ती बनविण्याचा व्यवसाय


सौ. चंद्रकलाबाई या व्यवसायाने कुंभार असून शेतीतील कामातून वेळ काढून रात्रीच्या वेळी सुध्दा पर्यावरण संवर्धनासाठी मातीपासून गणपती, शारदादेवी, महालक्ष्मी व दिवाळीसाठी पणत्या बनविण्याचा व्यवसाय करतात. त्यांच्या व्यवसायात त्यांचे पती श्री. रेवाराम चक्रवर्ती यांची मदत लाभते. या मूर्तीची विक्री नागपूरपर्यंत घरच्याघरुन होते. यातून मिळणारा पैसा ते घरच्या उदरनिर्वाहासाठी वापरतात.


कृषि विभागाचे लाभले सहकार्य

  1. शेततळे : राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत १०० टक्के अनुदानावर सन २oo९-१० मध्ये ३o × ३o × ३ मी. आकारमानाच्या शेततळ्याचा लाभ त्यांनी घेतला आहे. यामुळे पाण्याची शेततळ्यात साठवण करून शेतीला संरक्षित आोलीत केले जाते.
  2. रोहयो फळबाग लागवड : रोजगार हमी योजनेंतर्गत सन २oo८-०९ मध्ये १.५oहे. क्षेत्रावर ६ x ६ मी. अंतरावर ४१५ संत्रा झाडांची लागवड केली. सध्या ४१५ पैकी ३८o झाडे जिवंत आहेत. सन २०१३-१४ पासून नियमित फळधारणा होते. जास्त करून मृगबहारावर लक्ष केंद्रित केले जाते. कारण मृग बहार हा जास्त टिकाऊ आहे. मार्केटमध्ये या बहाराला दर सुध्दा जास्त मिळतो. आजपर्यंत खर्च वजा जाता संत्रा उत्पादनातून

कृषि सहायकाचा सल्ला ठरतो मोलाचा

कृषी सहायक श्री. आर.जी.नाईक व मंडळ कृषी अधिकारी, श्री. आर.एम.वसू हे वारंवार शेतावर भेटी देऊन मार्गदर्शन करतात.

आम्ही संत्रा बगीच्यासाठी बोडॉमिश्रण (मोरचूद १ किलो + चुना १ किलो + पाणी १० ली.) फक्त एकच वेळेस लावत होतो. पण कृषि सहायक यांनी सांगितल्यानुसार पावसाळा सुरू होण्यापूर्वी व पावसाळा संपल्यानंतर असे दोन वेळा बोडॉमिश्रण झाडांना नियमित लावत आहोत. त्यामुळे ब-याच प्रमाणात डिक्याचा प्रादुर्भाव कमी झाला आहे.

मागच्या वर्षी तुरीचे उत्पादन ब-यापैकी झाले व भावसुद्धा चांगला मिळाला. या अगोदर आम्ही तुरीला शेणखताव्यतिरिक्त कोणत्याही खताचा अवलंब करत नव्हतो, पण यावर्षी कृषि विभागाच्या सल्ल्यानुसार माती


परीक्षण करून खते, बीज प्रक्रिया करून पेरणी, पेरणीनंतर विरळणी, ३०-ते ४५ दिवसानंतर शेंडा खुडणे, रायझोबीएम, पीएसबी यांची ड्रचिंग, पांढ-या मुळाच्या वाढीसाठी ह्युमिक अॅसिड व पाण्यात विरघळणा-या (१९:१९:१९) खताचा वापर तसेच निंबोळी अर्काची पहिली फवारणी करत आहोत. तुरीची लागवड सध्या सलग ३ x ३ फूट अंतरावर केली आहे. पण तुरीच्या फुलावरील, शेंगावरील अवस्थेत फवारणीसाठी अडथळा निर्माण होत असल्यामुळे कृषि अधिकारी व कर्मचा-यांच्या सल्ल्यानुसार आम्ही पुढील वर्षी ५ × १ फूट अंतरावर तुरीची लागवड करणार आहोत. आंतरपीक म्हणून दोन तुरीच्या ओळीमध्ये ३ ओळी सोयाबीनच्या लागवड करणार आहोत. यामुळे फवारणीसाठी अडचण भासणार नाही. तुरीच्या मिळेल. असा आमचा मानस आहे.

शेतीशाळा व प्रशिक्षणातून होतो फायदा

आमचे शेत गावालगत असून शेतात हनुमान मंदिराचा मंडप

असल्यामुळे कृषि विभागार्फत सर्व शेतक-यांच्या सहमतीने शेतीशाळा व प्रशिक्षण कार्यक्रम शेतावर घेतले जातात. शेतीशाळेत निमअर्क, दशपर्णी अर्क बनविण्याबाबत प्रशिक्षण दिले जाते. त्याचा अवलंब शेतीव्यवसायात करतो. घरी देशी गाई असल्यामुळे दशपर्णी अर्कासाठी गोमूत्र व शेण सहज उपलब्ध होते. इतर शेतक-यांना गोमूत्र मोफत दिले जाते.

 

स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

 

अंतिम सुधारित : 7/12/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate