অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तांदुळाची कादिरमंगलम् जात

(तामिळनाडु राज्‍याच्‍या कावेरी खोरे क्षेत्रातील गावांतील श्री. एस. गोपाल यांच्‍याद्वारे विकसित)

ह्या प्रणालीचा विकास एसआरआय संकल्‍पना व पध्‍दतीचा वापर करून अशा प्रकारे करण्‍यात आला आहे ज्‍यायोगे कावेरी खोरे क्षेत्रातील हे स्‍थानिक परिस्थितीस अनुकूल ठरेल.

एसआरआय़ पद्धत वापरून शेती करणार्‍या शेतकर्‍यांची समस्या: अत्यंत कोवळे कोंब तीव्र ऊन व सतत वाहणारा वारा यामुळे सुकुन जातात.

त्‍यांच्‍या समस्‍यांचा संभावित उपाय: नर्सरीमधून आणल्‍यानंतर पहिल्‍या दोन आइवड्यांत कोवळ्या कोंबांना पांचाच्‍या गटात रोवावे ज्‍यायोगे त्‍यांना सूर्यप्रकाश वार्‍यापासून संरक्षण मिळेल. त्‍यानंतर दोन आठवड्यांनी त्‍यांचे पुन्‍हां एकल स्‍वरूपात पुनर्रोपण करावे म्‍हणजे तोपर्यंत ती एकटे तग धरून जगण्‍याएवढी बळकट झालेली असतात. ह्या पध्‍दतीमधील दोष: दुसर्‍या रोपणासाठी अतिरिक्‍त मजुरांची गरज लागणे, तथापि, शेतकर्‍यांना असे वाटते की वाढीव पीक जास्‍तीच्‍या मजुरीचा खर्च भरून काढील.

परिणाम: ह्या पध्‍दतीने घेतलेले पीक सरासरी 7.5 टन/हेक्‍टर होते.

पध्‍दतीमध्‍ये अनुसरलेले तंत्रशास्‍त्र

नर्सरीची तयारी

  • 12 दिवसांत चांगले कोंब मिळविण्‍यासाठी योग्‍य पाणीपुरवठा आणि निचर्‍याची सोय असलेली जागा.
  • 100 चौ. मीटरचे क्षेत्र तयार करावे. एका हेक्‍टरमध्‍ये लावणी करण्‍यासाठी फक्‍त एवढेच करायचे असते (फक्‍त 2.5 टक्के).
  • एका हेक्‍टरकरीता पुरेसे कोंब उगविण्‍यासाठी, 200 फूट लांब व 1 फूट रूंद अशा 300 गेज पॉलिथिन शीटची आवश्‍यकता असते.
  • बी पेरण्‍यासाठी 1 मीटर लांबी, 0.5 मीटर रूंदी व 4 सें.मी. उंचीच्‍या चौकटीची गरज असते.
  • दाब-माती किंवा इतर प्रकारच्‍या कंपोस्‍टने चौकट भरून टाकतात.
  • एका हेक्‍टरमध्‍ये पेरणी करण्‍यासाठी ऍझोस्पिरिलियम व फॉस्‍फोबॅक्टिरियम उपचारित 5 किलोग्राम अंकुरित बियाणाची गरज असते. ह्यांची लावणी 45 ग्राम प्रति कंपार्टमेंट प्रमाणे केली जाते आणि चाळलेल्‍या दाबमातीने हलकेच झाकून टाकले जाते.
  • पांचव्‍या दिवसापर्यंत दिवसांतून दोनदा पाण्‍याचा शिडकाव केला जातो.
  • 30 लीटर पाण्‍यात 150 ग्राम 0.5% स्‍प्रे यूरिया घोळून, 8व्‍या दिवशी शिडकाव करण्‍यात येतो.
  • 12 दिवसांच्‍या रोपांना, त्‍यांच्‍या मुळांसकट त्‍यांच्‍या बीजावरणातच ठेवून, मुख्‍य शेतामध्‍ये पुनर्रोपणासाठी नेतात.

पुनर्रोपण

प्रथम पुनर्रोपण

शेताच्‍या कोपर्‍यातील 8 सेंट. इतका लहानसा भाग 12 दिवसांच्‍या कोंबांना लावण्‍यासाठी तयार केला जातो. पुढे एका हेक्‍टरमध्‍ये लावणी करण्‍यासाठी हे पुरेसे असतात.
  • ह्या लहानशा भागांत, दर उंचवट्यावर 4 ते 5 कोंब 15 सें.मी.च्‍या चौकोनी भागांत उंचवट्यांच्‍या मध्‍ये लावतात.
  • 15व्‍या दिवशी, 0.5% स्‍प्रे यूरियाचा शिडकाव केला जातो.
  • 28व्‍या दिवसापर्यंत, 25सें.मी. उंची व मुळांच्‍या सुदृढ वाढीसकट, तांदुळाच्‍या रोपांची चांगली वाढ झालेली असते.

द्वितीय पुनर्रोपण

  • 30व्‍या दिवशी, ही रोपे ह्या पहिल्‍या उंचवट्यांवरून काढून, वेगळी करून संपूर्ण मुख्‍य शेतामध्‍ये, प्रत्‍येक रोपामध्‍ये 20x20 सें.मी.च्‍या अंतरावर पसरविली जातात.
  • एका हेक्‍टरसाठी एका दिवसांत 15 मजूर हे काम करू शकतात.

दोनदा पुनर्रोपणाचे लाभ

  • कोंब चांगल्‍या प्रकारे वाढले आणि मृत्‍यु दर शून्‍य होतो.
  • कोंब चांगले वाढले असल्‍यामुळे खुरपणीची उद्भवते किंवा उद्भवतच नाही.
  • कोंब उंच असल्‍यामुळे, पहिल्‍या दिवसापासूनच ते पाण्‍यात तग धरून राहण्‍यास सक्षम असतात, ज्‍यायोगे पुरामुळे उगविणार्‍या तणाचे नियंत्रण केले जाते.
  • एकल कोंबांचे विलगीकरण सोपे असते.
  • रोपाची लावणी जलद होते, आणि 10व्‍या दिवसापासून कोनोवीडर वापरणे शक्‍य होते.
  • ह्या तंत्रासाठी कोणत्‍या ही विशिष्‍ट प्रकारच्‍या प्रशिक्षणाची गरज नाही कारण सगळी तयारी त्‍याच पध्‍दतीने केली जाते ज्‍याप्रमाणे शेतकरी सर्वसामान्य भातपिकांसाठी करतात.

तण व्यवस्थापन

द्वितीय लावणी नंतर 10व्‍या दिवशी, रोपांच्‍या रांगेच्‍या मधल्‍या जागेत आणि भोवती 3 ते 4 वेळा दोन्‍ही दिशांना जोराने कोनोवीडर चालवावे, ही एकच खुरपणी केल्‍याने दर हेक्‍टरी 10 मजूर दिवसांची बचत होते.

जलसिंचन

पाणी पुरवठा
एकदा माती कोरडी झाली की पाणी साठून राहू नये आणि माती ओलसर राहावी असे जलसिंचन करावे. ह्यामुळे जलसिंचनामध्ये 500 मि.‍मी. पर्यंत बचत होते.

खतांचा वापर

  • प्रथम, आधार डोस/मात्रा म्‍हणून फॉस्‍फोरस व पोटॅश खतांचा वापर केला जातो.
  • कोनोवीडिंग केल्‍यानंतर 15व्‍या दिवशी, 30 किलोग्राम यूरिया घालतात.
  • पुन्‍हा 30व्‍या दिवशी, हेक्‍टरी 30 किलोग्राम यूरिया घालतात.
  • 45 व्‍या दिवशी, हेक्‍टरी 30 किलोग्राम यूरिया 30 पोटॅश बरोबर घालतात.

टीप

ही माहिती कादिरमंगलम् गावांतून, राजेश कुमार व सौरव नायक, ज्‍यांना शेती विस्‍तार कर्मचारी म्‍हणून नेमण्‍यात आले आहे, यांनी दिली आहे. बी.एस.सी.स्‍नातक, श्री.एस.गोपाल यांच्‍या द्वारे विकसित करण्‍यात आलेली तांदुळाची सुधारित जात तामिळनाडु राज्‍याच्‍या कावेरी खोरे क्षेत्रासाठी उपयुक्‍त असल्‍याचा निर्वाळा त्‍यांनी दिला आहे.

 

स्त्रोत : Cornell International Institute for Food, Agriculture and Development (CIIFAD) at Cornell University in Ithaca, NY ( http://ciifad.cals.cornell.edu/ )

अंतिम सुधारित : 8/8/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate