आमच्या जय जवान जय किसान कृषि मंडळाची मुहूर्तमेड 2008 साली रोवली. तेव्हापासून आजपर्यंत मंडळाचे शेतकरी पुण्यात दर वर्षी होणार्या किसान प्रदर्शनास न चुकता भेट देतात. केवळ प्रदर्शन बगणे, हा उध्येस न ठेवता पुणे परिसरातील प्रगतशील शेतकर्यांशी चर्चा करून त्यांच्या शेताला भेट असा हा उपक्रम असतो .
2009 साली आम्ही विक्रम आवचट (ओतूर ता. जुन्नर जि . पुणे ) यांनी राबविलेल्या गटशेती उपक्रमाची माहिती प्रत्यक्ष भेटून समजून घेतली. त्यांच्या शेतातील इनलाईन ठिबक सिंचन पद्धत वापरुन यशस्वीपणे घेतलेली कांदा पीक बगुण कापशीशाटी या पद्धतीचे विचार मनात घोळायला लागले. याच विचारातून घनश्याम गीते याने पेप्सी ठिबक पद्धतीवर कपाशीची लागवड केली. यातून एकरी 18 क्विंटल उत्पादन हाती पडले . आमचाच अजून एक सहकारी अशोक बरहाते याने दोन गुंटे क्षेत्रामद्धे मिरचीचे 18 हजार रुपयाचे उत्पन्न मिळवले.
अशा या येशस्वीतेकडे नेहणार्या वाटचालीवर 2010 साली कृषि विभागाचे कृषि सहय्यक श्री मुकेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळातील 20 शेतकर्यांनी एस 9 कल्चर पासून सेंद्रिय खताचे डेपो बनून पिकाला त्याच खताचा वापर केला. त्यातून शेतकर्यांचे उत्पन्न वाढले. शिवाय खतासाठीचा अनावश्यक खर्च कमी झाला. श्री. महाजन यांच्या मार्गदर्शना खाली राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत 50 टक्के अनुदानात 50 पाठीवरील औषद फवारणी पम्प गाव पातळीवर वितरित करण्यात आले. त्याचाच जोडीला 50 टक्के अनुदान तत्वावर जिप्सन, झिंक व फेरस या सूक्ष्म अन्न द्रव्याचे कृषि विभागा मार्फत वाटप करण्यात आले.
2011 साली खत तुटवडा आसल्या कारणाने जिल्ला अधीक्षक कृषि अधिकारी श्री. गायकवाड साहेब यांच्या संकल्पनेतून (बांदावर खत) ही योजना राबविण्यात आली . यातच मंडळाच्या सहकार्याने गावात एम आर पी नुसार 70 टन खताचे वाटप करण्यात आले. जेणे करून खतच्या काळ्या बाजरास आळा बसला आणि शेतकर्यांचा त्रास कमी झाला.
जय जवान जय किसान कृषि मंडळास सन 2012 हे वर्ष सकारात्मक कलाटणी देणारे ठरले. या वर्षी इफ्को मार्फत 5 मार्च रोजी गाव पातळीवर मोफत माती परीक्षण शिबीर घेण्यात आले. महाराष्ट्र राज्य कृषि विभाग संचालित धान्य मोहत्सवात सहभागी होत मंडळाने शेवगा,ज्वारी व लसूण ही पिके थेट ग्राहंका साठी उपलब्द करून दिली. तदनंतर 2012 च्या मे महिन्यात जळगाव येतील लडडा अग्रो प्लास्ट यांच्याकडून 40 एकर कापूस पिकच्या क्षेत्रासाठी ठिबक सिंचन संचाचे सामूहिक खरेदी केली.
याच दरम्यान किसान दिनाचे औचित्य साधून इफ्को चे महाराष्ट्र प्रमुख श्री दलाल साहेब यांनी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करणार्या 10 शेतकर्यांना प्रोत्सान देण्यासाठी इफ्कोने हेक्टरी 10 हजार रुपये अनुदान वाटप केले. तालुका कृषि अधिकारी श्री पायघन यांनी ठिबक सिंचन वरील कापूस क्षेत्राची पाहणी केली. त्याची येशोगाथा ई टी व्ही वरील अन्नदाता कार्यकर्मात प्रदर्शित करण्यात आली. याचाच परिणाम म्हणून इफ्को भोपाल चे झोनल मॅनेजर श्री कुंडू सर यांनी सदधीच्या भेट देऊन कापूस पिकाची पाहणी केली.
2012 या वर्षी निर्माण झालेली दुष्काळग्रस्त परस्थिती मंडळातील शेतकर्यांनी मोसंबीच्या बागा वाचविण्याच्या दृस्तीने उपाय योजना करताना जालना जिल्यातील जिरडगाव येथील श्री एकनाथ पाटील उडान यांच्या मोसंबी बागेतील प्लॅस्टिक आछ्यादनाची पाहणी केली. व त्याच धर्तीवर उपक्रम राबविण्या संबधी एकमत होऊन नाशिक येथून 40 मायक्रोनच्या प्लॅस्टिक ची खरेदी केली. याचा वापर गतील 8 हजार तर परिसरातिल 25 हजार झाडांसाठी करण्यात आला.
सदरील प्लॅस्टिक आच्छादन उपक्रमाची दखल घेत. राज्याचे फलोत्पादन संचालक श्री दिगंबर बकवाड साहेब ,राज्य कृषि आयुक्त श्री उमाकांत दांगट साहेब, केंद्रीय फलोत्पादन आयुक्त डॉ गोरखसिंग व मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ गोरे सर यांनी मंडळाच्या शेतकर्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. राज्य शासनाने याची दखल घेत 100 मायक्रोनची अट शिथिल करत ती 40 मायक्रोन केली. त्यामुळे शेतकर्यांना प्लॅस्टिक आच्छादन करणे सोपे व स्वस्त झाले.
सन 2013-14 या आर्थिक वर्षामध्ये मंडळाच्या 10 शेतकर्यांचे एन एच एम अंतर्गत 100 टक्के अनुदानात प्लॅस्टिक आच्छादित 10 शेततळ्याचे काम पूर्ण झाले आहे. त्याची पाहणी जिल्ला अधीक्षक कृषि अधिकारी श्री लोणारे साहेब आणि उपविभागीय कृषि अधिकारी श्री जोशी साहेब यांनी केली. सन 2013 च्या खरीप हंगामाचे गुडीपाडव्याच्या मूहर्तावर पीक नियोजन करण्यात आले.त्यात या वर्षी 100 एकर क्षेत्रावर ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून कापूस पीक घेण्याचा निर्धार करण्यात आला आणि तो पूर्णत्वास गेला.
सन 2013- 14 या वर्षामध्ये गंभीर दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी जय जवान जय किसान शेतकरी मंडळ देवगाव यांच्या बरोबरीने नाबार्ड-वॉटर – व शासन यांच्या भागीदारी कार्यकर्मा अंतर्गत 150 हेक्टर क्षेत्रावर कंपार्टमेंट बंढीगची कामे करण्यात आली. मुळस्थानी जलसंधारण या संकल्पानेमुळे जमिनीची धूप कमी होऊन जमिनीतले पाणी जमिनीत मुरल्यामुळे विहीरीची पाणी पातळी वाढण्यास मदत झाली. पुढील 5 वर्षात याठिकाणी सीमेंट बंधारे बांधण्याचा वॉटर संस्थेचा मानस आहे. ज्यामुळे येथील पाणी याच क्षेत्रात मुरण्यास मदत होणार आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होणार नाही.
आज पर्यंतच्या जय जवान जय किसान शेतकरी मंडळाच्या यशस्वी योगदाणा मुळे सर्वसाधारण शेतकर्यांची आर्थिक उन्नती झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून गावातील मातीच्या घराची जागा सिमेंटच्या पक्क्या घरांनी घेतली आहे . प्रत्येक शेतकर्यांजवळ दुचाकी मोटर सायकल दारात उभी आहे. कांही शेतकर्यांजवळ चार चाकी वाहनेसुद्धा आहेत. गावात ट्रॅक्टरचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढत आहे. तसेच सर्वसाधारण कुटुंबातील मुले इंजींनियर सारखे महागडे शिक्षण सहजरीत्या घेत आहेत.
शेतकरी मंडळाच्या सदस्यांनी पाण्याचे नियोजन करून एक आदर्श मोडेल कृषि विभागपुढे ठेवल्यामुळे या वर्षी राज्य शासनाच्या कोरडवाहु शासवत अभियाना अंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातून एकमेव आमच्या गावाची निवड करण्यात आलेली आहे.
आशय लेखक : विनायक तौर व दीपक जोशी, अध्यक्ष, शेतकरी मंडळ
अंतिम सुधारित : 6/3/2020
ही गोष्ट आहे अकोल्याच्या ज्योतीताईंची...! अकोला जि...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
सांगली जिल्ह्यातील कासेगाव (ता. वाळवा) येथील संपतर...
नैसर्गिक आपत्तीने अनेक वेळा दस्तक दिल्यानंतर आता र...