অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कीड - व्यवस्थापन करणे


आंध्रप्रदेशच्याप खम्मम जिल्ह्याचतील पुनुकुला गांवाने पाच वर्षांच्यान काळात (1999-2003) स्व्त:ला कीटकनाशकांच्या वापरापासून प्रयत्नपूर्वक मुक्ता कसे केले त्या ची ही गोष्ट1 आहे. आज हे ग्रामीण लोक रासायनिक कीटकनाशकांचा वापर कदापि करीत नाहीत – ते आपल्या् तसेच इतरही जिल्ह्यांतील शेतकर्‍यांना ह्याच मार्गाने जाऊन आपले जीवन सुधारण्या्ची प्रेरणा देत आहेत. पंचायतीने कीटकनाशक-मुक्त राहण्यानचा संकल्प सोडला आहे.

पुनुकुला

पुष्ककळ वर्षापासून पुनुकुलामध्येि प्रामुख्यााने कापसाचे पीक घेण्यापत येत आहे. हे एकच पीक असे आणि पिकाचे संरक्षण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांचा वापर होत असे. ह्यामुळे पुष्कणळशा समस्या् उद्भवल्याश: विषप्रयोग होण्याच्या बाबी समोर आल्यास, ज्या मुळे लोकांना कायमचे अपंगत्व आले आणि आरोग्य:सेवेसाठी खूप पैसा खर्च करावा लागला. आणखी एक समस्या म्हसणजे कीटकनाशकांच्याो खरेदीसाठी लोकांनी कर्ज घेतलेले होते. ह्या कर्जांमुळे शेतीचे पैशाचे गणित नियंत्रणाच्याच बाहेर गेले.

परिवर्तनाची सुरुवात

1999 मध्ये ‘सिक्युअर’ (सोशियो-इकॉनॉमिक एण्ड. कल्चवरल अपलिफ्टमेंट इन रूरल एनव्हांयरमेंट) ह्या स्थानिक अ-शासकीय संस्थे ने, तेथील खेडुतांशी त्यां च्या् जीवनाबाबत विश्लेषण केले. त्यांसच्याऍ शेतीशी संबंधित पुष्कमळशा समस्याय विश्लेषणात सामोर्‍या आल्या ज्यालमध्ये गुंतवणुकीसाठी भांडवलाकरता आधार नसणे, दर वर्षी वाढत जाणारा खर्च, विपणनासाठी आधार नसणे, कर्जबाजारी असणे इत्यावदींचा समावेश होता. कापसाच्याा शेतीमध्येी कीटकनाशकांचा वापर केल्‍याने उद्वभवणार्‍या समस्या लक्षात येताच संस्थेाने कीटकनाशकांचा वापर न करता (NPM) शेती करण्या्च्यान पध्देतीवर काम करण्या चा निर्णय घेतला. NPM प्रकल्पाशची अंमलबजावणी हैदराबाद येथील वर्ल्ड‍ सॉलिडॅरिटी सस्टेयनेबल ऍग्रिकल्चलर विंगच्या तांत्रिक आणि वित्तीय सहाय्यासह करण्याात आले. (आता ह्या संस्थेाला सेंटर फॉर सस्टेलनेबल ऍग्रिकल्चणर म्हआणतात).

प्रारंभिक संभ्रम

जेव्हांक सिक्युअरच्याप लोकांनी शेतकर्‍यांशी आपल्याम नॉन-पेस्टिसिडल (अ-कीटकनाशक) तंत्रज्ञानासह संपर्क साधला, तेव्हां शेतकरी संभ्रमात पडले. ‘ज्या‍ कडुलिंबाने मी रोज दात घासतो तो कडुलिंब अत्यंरत प्रभावी विषानेदेखील न मरणार्‍या कीटकांचे नियंत्रण करेल ह्यावर मी कसा काय विश्वांस ठेवू’ अशी शंका श्री. हेमला नायक ह्यांनी सुरूवातीला व्याक्तस केली. पण, हळू-हळू लोकांना फरक जाणवू लागला.

यशाचा गोड आस्वाद

पहिल्या वर्षाच्यान शेवटी, NPM पध्द‍तीचे सकारात्मक परिणाम स्पष्ट झाले. 2001-02 मध्येक, पुनुकुलातील आठ शेतकर्‍यांनी, 6.4 हेक्टर भूभागात कापसाच्या् पिकासाठी कीटकनाशक मुक्तआ व्युवस्थाकपनाचा अंगीकार केला. पारवा वाटाण्‍याच्याी बाबतीत, 3 शेतकर्‍यांनी 7 हेक्टरमध्ये असे केले होते. दुसर्‍या वर्षांपर्यंत, पहिल्या वर्षीच्याा शेतकर्‍यांनी मिळविलेले उत्तम परिणाम आणि शेतातील यश पा‍हता, आणखी शेतकर्‍यांनी ह्या प्रयत्नात हातमिळवणी केली. शेतकर्‍यांना इतर जिल्ह्यां मध्येत दौर्‍यांवर नेण्यायत आले. गावांत आणखी जास्ते प्रशिक्षण-कार्यशाळांचे आयोजन करण्या त आले. हळू-हळू बातमी पसरली, आणि त्या‍बरोबरच, एक दृढ विश्वास उदयास आला की रासायनिक कीटकनाशकांपासून मुक्ति मिळविणे हाच एक मार्ग आहे.

2002-03 पर्यंत, एनपीएमचा (नॉन पेस्टिडियल मॅनेजमेंट) वापर भातशेती, पारवा वाटाणा, कापूस व मिरची यांसारख्यां पिकांवर करण्याणत आला. ह्यात सहभाग घेणार्‍या शेतकर्‍यांची संख्याव 59 पर्यंत पोचली, ज्यांलचे क्षेत्र 58 हेक्टर होते. वाढलेली एकूण मिळकत पाहून शेतकर्‍यांना समाधान वाटले. 2003-04 मध्येा, पुनुकुला आणि पुल्लााईगुडम गावांमध्येू एनपीएम कापसाचे क्षेत्र 480 हेक्टर झाले, ज्याेमध्ये पुनुकुलाच्याी एकूण कापूस शेती क्षेत्राचा समावेश झाला.

मिरच्यां च्यात बाबतीत, कीटकनाशकांच्या0 वापर सतत न केल्या्मुळे मिरच्यांीच्या गुणवत्तेत प्रचंड सुधारणा झाली आणि म्ह्णून, बाजारांत उत्पाादनास अत्युच्चा मूल्यत प्राप्तय झाले.

प्रभाव

2004-05 मध्ये , लागोपाठ दुसर्‍या वर्षी कोणी ही कीटकनाशक विक्रेत्या कडे फिरकले ही नाही. ग्राम पंचायतीने आपला गांव कीटकनाशक मुक्तल असल्यारचे जाहीर केले व गावांला असेच ठेवण्यांचा संकल्पा घेतला. गावांतील शेतकर्‍यांना एक-दोन वर्षांच्या् काळांतच कर्जमुक्त होणे शक्य झाले. आणि कर्जाचे ओझे उतरल्यातनंतर, शेतकरी जास्तीनत जास्तो पर्यावरण मैत्रीपूर्ण पध्द तींचा अवलंब तसेच आणखी पिकांवर ह्या पध्द‍तीचा वापर करू इच्छित आहेत. शेतांमध्ये् पुन्हांं एकदा पर्यावरणीय समतोल आढळला आहे. शेतकर्‍यांच्याम आरोग्या त सुधारणा झाली आहे. पुनुकुलामध्येर 2004 साली स्त्रियांच्यात गटाने कडुलिंबाच्याच बिया दळण्या साठी एक क्रशिंग मशीन युनिट खरेदी केले आहे. पंचायतीच्या4 माध्य माने सेंटर फॉर वर्ल्डड सॉलिडॅरिटीच्याि मदतीने हे शक्यन झाले, ज्या्ने गुंतवणुकीसाठी अनुदान मिळवून दिले. ही मशीन चालविण्याळमधून दोन स्त्रियांना पूर्णवेळ रोजगार मिळतो.

ह्या पध्दनतीचा वेगवान प्रसार

पुनुकुला मध्ये , पुल्ला ईगुडेम येथील 120 शेतकर्‍यांसह 174 शेतकरी इतरांना नवीन कीटकनाशक व्य्वस्था पन पध्दुतींच्या मूळ तत्त्वाबाबत आणि त्यांंपासून त्यांहना कसा काय फायदा होत आहे हे समजावून सांगण्या्त फार लवकर तयार झाले.

गांव

एकर

सरासरी पीक

दर हेक्टरच्या शेतीसाठी होणारा सरासरी खर्च

दर हेक्टरपासून प्राप्तस होणारी एकूण सरासरी मिळकत

पुनुकुला व पुल्लातईगुडेम

480 हेक्टा.

30 क्विं./हेक्टा.

Rs. 21408/हेक्टा.

Rs.52593/हेक्टे.

जी .व्हीह. रामनजानेयुलू आणि झाकिर हुसेन
सेंटर फॉर सस्टेीनेबल ऍग्रिकल्चभर, 12-13-445, स्ट्रीट नंबर 1 तारनाका, सिकंदराबाद- 500 017, आंध्रप्रदेश, भारत.

स्त्रोत : LEISA India, Vol 8-2

अंतिम सुधारित : 4/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate