इंग्लंड येथील ‘युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट अँगलिया’ येथील संशोधकांनी फळमाशीची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी जनुकीय सुधारित फळमाश्या प्रसारित करण्याविषयी संशोधन केले आहे. सध्या नियंत्रित वातावरणात झालेल्या चाचण्या यशस्वी झाल्या असून, हा स्वस्त, कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक उपाय ठरणार असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
जगभरातील ३०० लागवडीखालील व जंगली फळे, भाज्यांवर मेडिटेरेनन फ्रूट फ्लाय ही माशी प्रादुर्भाव करते. ही जगभरातील फळबागांतील सर्वांत मुख्य कीड झाली आहे. सध्या या किडीच्या नियंत्रणासाठी जैविक घटक, विविध प्रकारचे सापळे व कीडनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. तसेच किडीच्या नियंत्रणासाठी निर्बीज नर कीटकांचे प्रसारण (त्याला इंग्रजीमध्ये ‘स्टराईल इन्सेक्ट टेक्निक’ एसआयटी असे म्हटले जाते.) केले जाते. त्याविषयी माहिती देताना ‘युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट अँगलिया’ येथील संशोधक डॉ. फिलीप लेफ्टविच म्हणाले, की फळमाशीच्या जंगली नर माश्यांना इराडिएशन पद्धतीने निर्बीज केले जाते. त्यामुळे मादीशी यशस्वी फलन क्रिया कमी होऊन फळमाश्यांची संख्या नियंत्रणात राहते. त्यातही ऑक्सिटेक माश्यांचे प्रसारण करण्याचा पर्याय अँगलिया विद्यापीठामध्ये अभ्यासासाठी घेतला होता.
संशोधक डॉ. फिपी लेफ्टविच यांनी सुचविलेले लिंबूवर्गीय फळझाडांचा समावेश असलेले आठ मीटर आकाराचे सुरक्षित हरितगृह क्रिट विद्यापीठाच्या प्रक्षेत्रामध्ये तयार करण्यात आले होते. त्यामध्ये ऑक्सिटेक फळमाश्या सोडून त्यांच्या परिणामांचा अभ्यास केला. त्याचे निष्कर्ष चांगले मिळाले आहेत.
-----------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
तापमानवाढ आणि आर्द्रतेत घट झाल्यास उसावरील खोडकिडी...
डाळिंब पिकामध्ये बॅक्टेरिअल ब्लाइट, मर (फ्युजॅरिय...
ढगाळ हवामानामुळे मावा किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची...
निसर्गाला समजून घेऊन वेळोवेळी शेत निरीक्षण करीत रा...