आपल्याकडे मजूरटंचाई लक्षात घेता गहू, ऊस आदी पिकांमध्ये हार्वेस्टर येऊ लागले आहेत. अनेक शेतकरी त्यांचा वापर नियमित करू लागले आहेत. परदेशांतही अशा यंत्रांमध्ये सातत्याने नवे तंत्रज्ञान उपलब्ध होत असते.
स्पेन देशातील एका कंपनीने स्ट्रॉबेरी पिकातील काढणीयंत्र विकसित केले आहे. हे यंत्र दोन मीटर उंचीचे, सात मीटर लांबीचे आहे. त्याला २४ भुज्या आहेत. या भुज्यांच्या हालचाली "ऑप्टिक सेन्सर'ने दाखवलेल्या दिशेनुसार होतात.
रंग, फळाची बाह्य गुणवत्ता, फळाचा आकार, फळ पकडणारी भुजा व फळ यातील अंतर आदी विविध निकष लक्षात घेऊन हे रोबो यंत्र काम करते.
झाडाच्या फांदीला कोणतीही इजा होणार नाही या दृष्टीने रोबोच्या भुजांची रचना केली आहे.
यंत्राच्या समोरील कन्व्हेअर बेल्टमध्ये स्ट्रॉबेरी आल्यानंतर ती हाताने निवडणे व वेचणे शक्य होते. या पद्धतीने सुलभ पद्धतीने व स्वच्छतेच्या दृष्टीने फळाची काढणी करता येते.
दिवसाला १३ तास काम केल्यास हे यंत्र तीन दिवसांमध्ये दहा हेक्टर क्षेत्रावरील स्ट्रॉबेरीची काढणी करू शकते. फळांची अंतिम निवड वा प्रतवारी आणि त्याचे पॅकिंग करण्यासाठी चार व्यक्ती पुरेशा होऊ शकतात.
यंत्राद्वारे राहून गेलेल्या स्ट्रॉबेरीची वेचणी उर्वरित चार व्यक्तीं कडून होऊ शकते. आर्थिकदृष्ट्याही हे यंत्र किफायतशीर असल्याचे संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे. (वृत्तसंस्था)
---------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
या विभागात अंजीर या फळ पिकाविषयी माहिती दिली आहे.
मध्यम, ओलावा टिकवून ठेवणारी; परंतु पाण्याचा निचरा ...
जमिनीत वाढणाऱ्या खोडाच्या टोकास सु. १मी. लांब, बिन...
द्राक्षास सर्वाधिक दर मुंबई बाजारपेठेत डिसेंबरमध्य...