गोल्डन बांबूचा उपयोग घरामध्ये किंवा बागेमध्ये शोभेसाठी म्हणून मोठ्या प्रमाणात होतो, तसेच शेतामध्ये किंवा इमारतीभोवती कुंपण करण्यासाठीदेखील वापर करता येतो. लागवड व्यवस्थापन योग्य प्रकारे केले तर त्यापासून चांगले उत्पादन मिळू शकते.
गोल्डन बांबू (Phyllostachys aurea) हा सर्वसाधारण बांबूप्रमाणे जलद वाढणारा गवताचा प्रकार आहे. त्याच्या शोभिवंत दिसण्यामुळे लवचिक व दणकट गुणधर्मामुळे त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. याबरोबरच त्याचा उपयोग सुरक्षेसाठी आणि शोभिवंत ताटी म्हणूनसुद्धा होतो. तापमान, पर्जन्यमान, समुद्रसपाटीपासूनची उंची, जमिनीचा प्रकार या बाबींवर या गोल्डन बांबूची भौगोलिक व्याप्ती अवलंबून असते.
उष्ण व दमट हवामानात त्याची चांगली वाढ होते, परंतु सरासरी 1000 मि.लि. पाऊसमान आणि पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन आवश्यक आहे. राज्यामध्ये बांबूच्या ज्या वेगवेगळ्या जाती आढळतात, त्यामध्ये मानवेल, कोंड्यामेल, कटांग, मानगा, चिवळी आणि गोल्डन बांबू म्हणजे पिवळा बांबू यांचा समावेश होतो. त्यांपैकी गोल्डन बांबूचा उपयोग घरामध्ये किंवा बागेमध्ये शोभेसाठी लागवड म्हणून मोठ्या प्रमाणात होतो.
गोल्डन बांबूला 10 ते 12 वर्षांनंतर फुलोरा येत असल्यामुळे त्यांची अभिवृद्धी बियांपासून व कंदापासून करता येते. बियांपासून अभिवृद्धी करताना रोपे दोन प्रकारे करता येतात. 1. गादीवाफ्यात बी पेरून, 2. पॉलिथिन पिशवीत बी लावून. या बांबूची लागवड करताना लागवडीचे अंतर प्रामुख्याने लागवडीचा हेतू समोर ठेवून करावे.
सर्वसाधारण बांबूप्रमाणे जर शेतामध्ये लागवड करावयाची असेल तर 3 द 3 मीटर अंतर ठेवावे, परंतु लागवड जर शोभेच्या कुंपणासाठी किंवा बागेमध्ये इमारतीच्या कडेने करावयाची असेल तर साधारणत: 1 द 1 फूट अंतरावर करावी.
गोल्डन बांबूच्या मागणीनुसार रोपांची निर्मिती करावी. कारण रोपवाटिकेमध्ये जेव्हा बियांपासून रोपनिर्मिती केली जाते तेव्हा सहा महिने किंवा एक वर्षे वयाचे रोप लागवडीसाठी वापरले जाते.
एक वर्षानंतर कंदाची पॉलिथिन पिशवीत होणारी वाढ व वाढणारी मुळे यांचा विचार करता रोपाची लागवड एक वर्षाच्या आतच करावी.
- 02426-243252
(लेखक वनशेती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत आहेत.)
स्त्रोत - अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
जंगले ही मृद्संधारण, हवामान, पाणी उपलब्धता, दुष्क...
तुती रोपवाटिकेसाठी पाण्याचा योग्य निचरा होणारी जमी...
तुती हे बहुवर्षीय पीक आहे. हलकी, मध्यम व भारी अशा ...
चिंचवृक्ष अनेक प्रकारच्या जमिनीत उगवतो. काळ्या मात...