कुंपणासाठी झाडांची समतल पद्धतीने लागवड करताना कमी उताराच्या किंवा सपाट शेतात खड्डे किंवा सऱ्या काढून लागवड करतात.
वरंबा पद्धतीमध्ये सर्वसाधारण उताराच्या शेतात आडव्या पद्धतीने शेताच्या धुऱ्याच्या बाजूने नाली खोदून निघालेल्या मातीचा दोन ते अडीच फूट उंच बांध घालून बांधावर रोपांची लागवड करावी. नालीमध्ये प्रत्येक दहा मीटरवर 70 सें.मी.चा भाग खोदकाम न करता तसाच राहू द्यावा. त्यामुळे पावसाचे पाणी नालीमध्ये जमा होईल, तेथेच मूलस्थानी जमिनीत मुरेल. त्यामुळे ओलावा जास्त दिवस टिकून राहील. सजीव कुंपणासाठी लावलेल्या झाडांची वाढ चांगली होईल.
ज्या शेताला कुंपण घालावयाचे आहे, अशा शेताच्या सीमेचे चुना टाकून मार्किंग करावे. शेताच्या भोवती ओळीत एक मीटर अंतरावर 1.5 x 1.5 x 1.5 फूट अंतरावर खड्डे तयार करावेत. खड्डे उन्हाळ्यात चांगले तापू द्यावे. मे महिन्यात खड्ड्यांत एक घमेले कुजलेले खत, पालापाचोळा, शेतातील वरची माती याद्वारे खड्डे भरून घ्यावेत. खड्ड्यातील खत-माती मिश्रणात शिफारशीत मात्रेमध्ये कीटकनाशकाची पावडर मिसळावी.
चांगला पाऊस पडल्यानंतर खड्ड्यांमध्ये रोपे लावावीत किंवा बिया टोकाव्यात. सजीव कुंपणासाठी केतकी (अगेव्ह), विलायती बाभूळ, निरगुडी, करवंद, सागरगोटा, बांबू, मेहंदी, शिकेकाई, चिलार ही झाडे लावावीत. संपर्क - 02358 -283655
वनशास्त्र महाविद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी
माहिती संदर्भ : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
करवंद हे काटेरी व सदापर्णी झुडूप अॅपोसायनेसी कुला...
करवंद हे एक अत्यंत काटक व दुर्लक्षित झुडूपवर्गीय प...
बांबूपासून सुमारे साडेतीनशे प्रकारच्या विविध कलाकृ...
करवंद हे एक अत्यंत काटक व दुर्लक्षित झुडूपवर्गीय प...