शेतीला सर्वात मोठा उपद्रव उंदीर आणि उंदीरवर्गीय प्राण्यांपासून म्हणजेच रोडंट्सपासून होतो – विशेषतः पावसाळ्यानंतर.
कर्नाटकच्या तुमकूर जिल्ह्यातले श्री. अरूण कुमार ह्यांनी एक पर्यावरणपूरक पिंजरा बनवला आहे.
ह्या पिंज-याची तार (बाइंडिंग वायर) बांबूच्या एका जुन्या टोपलीच्या चारही टोकांना बांधलेली असते आणि तिचे दुसरे टोक एका प्लास्टिकच्या धाग्याला बांधलेले असते. प्लास्टिकचा हा दोरा नारळाच्या एका झावळीला जोडलेला असतो. ही झावळी वरखाली करता येते. बांबूच्या ह्या टोपलीत एक मिटणारा पिंजरा ठेवून त्याला खोब-याचा एक तुकडा जोडतात.
उंदीर खोब-याचा हा तुकडा खायला येतात आणि पिंज-यात सापडून मरतात. मेलेले उंदीर बाहेर काढून जमिनीत पुरले जातात. ह्या रीतीने ३-४ उंदीर मारता येतात.अर्थात हा काही कायमस्वरूपी उपाय नव्हे कारण मेलेल्या उंदरांच्या शरीरातून काही विशिष्ट गंध (फेरोमॉन) सोडले जातात ज्यामुळे इतर उंदरांना सावधानतेचा इशारा मिळून ते तिकडे फिरकत नाहीत.
श्री. कुमार ह्यांनी बनवलेल्या पिंज-याची किंमत सुमारे.३०-३५ रूपये आहे.
श्री. एस आर अरुणकुमार शेट्टिकेरे, चिक्कनैकनहाळि,
जिल्हा तुमकूर - 572226,
दूरभाष: 08133 – 269564, मोबाइल: 09900824420
स्रोत - द हिंदू
अंतिम सुधारित : 1/30/2020
उस महाराष्ट्रातील एक महत्वाचे नगदी पिक आहे. कटिबंध...
सार्वजनिक आरोग्य व इतर सर्व अविनाशक उद्योगांच्या उ...
हवामानातील बदलामुळे दुष्काळ,गारपीट, थंडी या रूपांन...
सन २००५-०६ साली फलोत्पादन क्षेत्राच्या सर्वकष विका...